maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कार्ड पेमेंट्सची सुविधा देणारे ‘पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स’ लॉन्च

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३: भारतातील आघाडीची पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी ब्रॅण्‍ड पेटीएमने त्‍यांचे नवीन इनोव्‍हेशन – कार्ड साऊंडबॉक्‍सच्‍या लाँचची घोषणा केली. यासह कंपनीने आपल्‍या ‘टॅप अॅण्‍ड पे’ सुविधा असलेल्‍या आयकॉनिक साऊंडबॉक्‍सच्‍या माध्‍यमातून व्‍यापाऱ्यांना सर्व व्हिसा, मास्‍टरकार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस व रूपे नेटवर्कमध्‍ये मोबाइल व कार्ड पेमेंट्स स्‍वीकारण्‍यास सक्षम केले आहे. यामुळे व्‍यापाऱ्यांना त्‍यांचा व्‍यवसाय वाढवण्‍यास मदत होईल.

पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स व्‍यापाऱ्यांसाठी दोन समस्‍यांचे निराकरण करते – कार्ड पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासह ११ भाषांमध्‍ये सर्व पेमेंट्ससाठी त्‍वरित ऑडिओ अलर्ट्स मिळणे. या साऊंडबॉक्‍समध्‍ये बिल्‍ट-इन ‘टॅप अॅण्‍ड पे’ कार्यक्षमता आहे. व्‍यापारी या साऊंडबॉक्‍सच्‍या माध्‍यमातून जवळपास ५,००० रूपयांपर्यंतचे कार्ड पेमेंट्स स्‍वीकारू शकतात. हे मेड इन इंडिया डिवाईस ४जी नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटीसह सक्षम आहे, ज्‍यामधून जलद पेमेंट्स अलर्ट्स मिळतात. ४ वॅट स्‍पीकरसह पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍स सुस्‍पष्‍टपणे पेमेंट अलर्ट्स देते. या साऊंडबॉक्‍समध्‍ये पाच दिवसांपर्यंत कार्यरत राहणारी बॅटरी आहे.

पेटीएमचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, “पेटीएम भारतातील लघु व्‍यवसायांसाठी नाविन्‍यता आणण्‍यामध्‍ये, त्‍यांच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवांसंदर्भातील समस्‍यांचे निराकरण करण्‍यामध्‍ये नेहमी अग्रस्‍थानी आहे. आज पेटीएम कार्ड साऊंडबॉक्‍ससह आम्‍ही या सेवेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहोत. आमच्‍या निदर्शनास आले आहे की, व्‍यापाऱ्यांना व ग्राहकांना पेटीएम क्‍यूआर कोडसह मोबाइल पेमेंट्सप्रमाणे सुलभपणे कार्ड पेमेंट्स स्‍वीकारता येण्‍याच्‍या सुविधेची गरज आहे. लाँच करण्‍यात आलेले कार्ड साऊंडबॉक्‍स दीर्घकाळापर्यंत व्‍यापाऱ्यांच्‍या दोन गरजा – मोबाइल पेमेंट्स व कार्ड पेमेंट्सना एकत्र करेल.”

Related posts

ईवायव्हीएने १ दशलक्ष स्‍कॅन्‍सचा टप्पा गाठला

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

Shivani Shetty

भारतभरातील तसेच सहमतीने निश्चित अन्य प्रदेशांतील ग्राहकांपर्यंत आरोग्य विज्ञान न्युट्रास्युटिकल पोर्टफोलिओ पोहोचवण्यासाठी नेस्ले इंडिया आणि डॉ. रेड्डीज यांच्यातर्फे जॉइंट व्हेंचरची स्थापना

Shivani Shetty

Leave a Comment