“पुरस्कार विजेते एक्सप्लोरर आणि फिल्ममेकर रेझा पकरावन यांनी अरेबियन पेनिन्सुला मधील अज्ञात ठिकाणांचा शोध घेत अकल्पित काम केले आहे
एक्सप्लोरर रेझा पकरावन हा जगाच्या दूरच्या कोपऱ्यातील अज्ञात ठिकाणांच्या शोध मोहिमांसाठी प्रसिद्ध असून, आता तो अरेबियन पेनिन्सुला मध्ये त्याच्या टीम सोबत अज्ञात प्रवासाला डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कवरी+ वर प्रसारित होणारी नवीन मालिका “हिडन फ्रंटियर्स: अरेबिया” या कार्यक्रमातून सुरवात करणार आहे. हा कार्यक्रम १३ मे रोजी रात्री दार सोमवार आणि मंगळवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.
जगातील सर्वात मायावी रहस्ये उलगडण्याच्या उत्कटतेने प्रेरित होऊन, रझाने या क्षेत्रात प्रवेश केला. अरबी पेनिन्सुला मधील कधीही न जाण्याची आणि मानवी डोळ्यांनी पहिल्यांदा पाहिलेली ठिकाणे शोधण्यासाठी रेझाला मोठ्या शारीरिक आव्हानांना समोर जावं लागतं. अज्ञात प्रदेशात गायब होणाऱ्या प्रजाती आणि जीवन पद्धती, प्राचीन रहस्यांचा शोध घेते रेझा हा प्रवास सुरु ठेवणार आहे.
संपूर्ण सीझनमध्ये, ओमान, इराण, बाहरेन आणि सौदीमधील हिडन जागा एक्सप्लोर करा रेझा आणि त्याच्या साहसी तज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या टीमसह. या मालिकेचा प्रत्येक भाग ऍडव्हेंचर आणि साहस यांचा अनुभव प्रेक्षकांना देईल यात शंकाच नाही.
डिस्कव्हरी चॅनेल आणि डिस्कवरी+ वर प्रसारित होणाऱ्या हिडन फ्रंटियर्स: अरेबिया या कार्यक्रमाबद्दल उत्साह व्यक्त करताना रेझा पकरावन म्हणाला, “नवीन ठिकाणे शोधणे ही माझी आवड आहे, परंतु आता माझ्या हिडन फ्रंटियर्स या कार्यक्रमामुळे, हा माझा संपूर्ण उद्देश बनला आहे. आपल्या जगात, दुर्गम ठिकाणं अस्तित्वात आहेत जे गूढतेने आच्छादलेले आहेत आणि त्यांचा शोध घेण्याची वाट पाहत आहेत. ही रहस्ये उलगडणाऱ्या प्रवासाचा भाग मला बनता आलं याचा मला आनंद आहे. पुढे काय असेल हे न कळण्याचा उत्साह हा एक अतुलनीय थरार आहे. भारतातील दर्शक आता त्यांच्या स्क्रीनद्वारे माझ्या मोहिमेत सामील होऊ शकतात याचा मला आनंद आहे
*तेव्हा पाहायला विसरू नका ‘हिडन फ्रंटिअर्स: अरेबिया’. पहिला भाग १३ मे रोजी रात्री ९ वाजता पहा डिस्कवरी चॅनल आणि डिस्कवरी+वर*