नवी दिल्ली, मे ९, २०२४ – जीई ऐरोस्पेसने नुकतेच जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनच्या लाँचची घोषणा केली, जेथे कंपनी नवीन चॅप्टरला साजरे करत आहे, जो मागील जीई फाऊंडेशनच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या वारसाला पुढे घेऊन जातो. जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनचे परोपकारी धोरण आणि उपक्रम जीई ऐरोस्पेस समुदायांमधील कंपनीचे तत्त्व ‘टू लिफ्ट पीपल अप’ची पूर्तता करण्यास मदत करतील, तसेच कर्मचारीवर्ग विकास, आपत्कालीन मदतकार्य आणि जीई ऐरोस्पेस कर्मचाऱ्यांचे प्रयत्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतील.
दक्षिण आशियामध्ये जीई ऐरोस्पेस फाऊंडेशन स्थानिक सहयोगींसोबत काम करत वंचित समुदायांकरिता आपत्कालीन मदतकार्य, शिक्षण व आरोग्यसेवेसंदर्भात साह्य करत राहील. दक्षिण आशियाला गेल्या १० वर्षांमध्ये फाऊंडेशनशी संबंधित एकूण १.२ दशलक्ष यूएस डॉलर्स मिळाले आहेत, ज्यामध्ये अनुदान व संबंधित प्रोग्रामिंगचा समावेश आहे. यामुळे बेंगळुरू, पुणे आणि दक्षिण आशियाच्या इतर भागांमधील प्रभावित समुदायांना फायदा झाला आहे.
”जीई ऐरोस्पेस आम्ही राहण्यासह कार्य करत असलेल्या समुदायांना पाठिंबा देण्याची, तसेच प्रबळ करण्याची जबाबदारी घेते,” असे जीई ऐरोस्पेसचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. लॉरेन्स कल्प ज्युनिअर म्हणाले. ”लाँच करण्यात आलेली जीई ऐरोस्पेस फाऊंडेशन स्थानिक समुदायांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यास आणि जागतिक आघाडीची ऐरोस्पेस कंपनी म्हणून आमच्या अद्वितीय कौशल्याचा फायदा घेत भविष्याकरिता प्रबळ कर्मचारीवर्ग विकसित करण्यास मदत करेल. आम्हाला सकारात्मक प्रभावाचा १०० वर्षांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा अभिमान वाटतो आणि मी जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनला आगामी अनेक वर्षे आमूलाग्र बदल घडवून आणत राहताना पाहण्यासाठी उत्सुक आहे.”
फाऊंडेशनचे उपक्रम तीन मुलभूत क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतील आणि २०३० पर्यंत नवीन प्रोग्रामिंगमध्ये २२ दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करतील. कंपनीकडून विविध प्रयत्न केले जातील, जसे उत्पादन व अभियांत्रिकी उद्योगांमध्ये प्रबळ व वैविध्यपूर्ण कर्मचारीवर्ग विकसित केला जाईल, जागतिक प्रभावामध्ये परिणामकारकता दाखवलेल्या मानवतावादी व समुदाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली जाईल आणि जगभरात कर्मचारी सहभाग वाढवण्यात येईल.
”आम्हाला प्रबळ भावी कर्मचारीवर्ग, आपत्कालीन मदतकार्य आणि कर्मचारीवर्गामध्ये वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासह परोपकारी पाठिंब्याच्या या भावी चॅप्टरला पाहताना अत्यंत अभिमान वाटत आहे,” असे जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघन थर्लो म्हणाले. ”आम्ही जगभरातील आमच्या कार्यास समर्थन देणाऱ्या समुदायांचा विस्तार करण्यास आणि अधिक वैविध्यपूर्ण व कुशल उद्योगाच्या विकासाला गती देण्यास उत्सुक आहोत.”
नेक्स्ट इंजीनिअर्स आणि एसटीईएम शिक्षण
फाऊंडेशनने नेक्स्ट इंजीनिअर्सचा (Next Engineers) विस्तार करण्यासाठी २०३० पर्यंत २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. नेस्क्ट इंजीनिअर्स हा इंजीनिअरिंगमध्ये तरूण कर्मचारीवर्गाची वाढ करण्याप्रती कार्य करणारा जागतिक उपक्रम आहे, जो शाळेपासून कॉलेजपर्यंतच्या शिक्षणामधील तफावत दूर करत आहे. नेक्स्ट इंजीनिअर्स उपक्रम आतापर्यंत जवळपास १८,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनने आज घोषणा केली की, फाऊंडेशन २०२८ पर्यंत यशस्वी सिनसिनाटी उपक्रमाचा विस्तार करेल. फाऊंडेशनने वॉरसॉ, पोलंडसह चार अतिरिक्त शहरांमध्ये नेक्स्ट इंजीनिअर्स उपक्रमाचा विस्तार करण्यात येण्याची देखील घोषणा केली, तसेच आगामी वर्षांमध्ये विस्तार करण्यात येणाऱ्या अतिरिक्त साइट्सची घोषणा करण्यात येईल.
कर्मचारीवर्ग विकास
एव्हिएशन व उत्पादन कर्मचारीवर्गाची वाढती मागणी पाहता जीई ऐरोस्पेस फाऊंडेशन आम्ही राहण्यासोबत कार्यरत असलेल्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये कर्मचारीवर्ग विकास उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स दान करेल.
आपत्कालीन मदतकार्य आणि मानवतावादी प्रयत्न
जीई ऐरोस्पेसचे कर्मचारी, तंत्रज्ञान आणि इतर संसाधनांचा फायदा घेत फाऊंडेशनने आपत्कालीन मदतकार्य व मानवतावादी प्रयत्नांसाठी २ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूकीची घोषणा केली, ज्यामध्ये आपत्कालीन मदतकार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ओळखली जाणारी एव्हिएशन एअरलिंक (Airlink) सोबतच्या सहयोगांतर्गत १ दशलक्ष डॉलर्सचा समावेश आहे.
मॅचिंग गिफ्ट्स उपक्रम
फाऊंडेशनला कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक परोपकारी प्रयत्नांना वाढवण्यास प्रेरित करणारा मॅचिंग गिफ्ट्स (Matching Gifts) उपक्रम आणि जगभरातील पात्र जीई ऐरोस्पेस कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्पर्धात्मक स्कॉलरशिप्स प्रदान करणारा स्टार अवॉर्ड्स (STAR Awards) उपक्रम सुरू ठेवण्याचा देखील अभिमान वाटतो. जीईने १९५४ मध्ये कॉर्पोरेट मॅचिंग गिफ्ट्सची संकल्पना आणली आणि तेव्हापासून दान व मॅचिंगने १.५ बिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. स्टार अवॉर्ड्स (STAR Awards) उपक्रमाने १९८४ मध्ये सुरू झाल्यापासून १५,००० हून अधिक पुरस्कारांच्या माध्यमातून २१ दशलक्ष डॉलर्सहून अधिक आर्थिक साह्य केले आहे.
२ एप्रिल २०२४ रोजी स्वतंत्र सार्वजनिक कंपनी म्हणून जीई ऐरोस्पेस लाँच केल्यानंतर जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे. जीई ऐरोस्पेस फ्लाइटच्या भविष्याला नव्या उंचीवर घेऊन जात आहे.