maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

जुलैमध्ये नोक-यांच्या मागणीत १२% वाढ: नोकरी जॉबस्‍पीक

मुंबई, ८ ऑगस्ट २०२४: नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स हा भारतातील व्‍हाइट कॉलर हायरिंगचा आघाडीचा निर्देशांक जुलै २०२४ मध्‍ये २८७७ पॉइण्‍ट्सपर्यंत वाढला, ज्‍याने जुलै २०२३ च्‍या तुलनेत वार्षिक १२ टक्‍क्‍यांची उल्‍लेखनीय वाढ आणि जून २०२४ च्‍या तुलनेत तिमाही-ते-तिमाही ११ टक्‍के वाढ नोंदवली. बहुतांश क्षेत्रांनी उत्तम दोन-अंकी वाढीची नोंद केली, जेथे फार्मा/बायोटेक (२६ टक्‍के), एफएमसीजी (२६ टक्‍के), रिअल इस्‍टेट (२३ टक्‍के) आणि एआय-एमएल (४७ टक्‍के) अग्रस्‍थानी होते. पण, लक्षात घेण्‍यासारखी बाब म्‍हणजे काही उत्तम कामगिरीचे श्रेय जुलै’२३ च्‍या प्रभावित बेसला जाऊ शकते, जेथे आयटी क्षेत्राच्‍या समस्‍यांमुळे निर्देशांकामध्‍ये असामान्‍य घसरण दिसण्‍यात आली.

फार्मा, रिअल इस्‍टेट आणि एफएमसीजी २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह अग्रस्‍थानी:

फार्मा/बायोटेक क्षेत्राने वार्षिक २६ टक्‍के वाढ नोंदवली, जेथे बडोदा (६१ टक्‍के) आणि हैदराबाद (२९ टक्‍के) यांनी वाढीला चालना दिली. फार्मामधील प्रमुख पदे जसे सेल्‍स अँड बिझनेस डेव्‍हलपमेंट आणि प्रोक्‍यूरमेंट अँड सप्‍लाय चेन यासाठी हायरिंगमध्‍ये ४२ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली. तसेच एफएमसीजी क्षेत्रातील हायरिंगमध्‍ये २६ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍यामध्‍ये बेंगळुरू (५२ टक्‍के) आणि कोलकाता (४३ टक्‍के) अग्रस्‍थानी होते; तसेच एफएमसीजीमधील मार्केटिंग व कम्‍युनिकेशन पदांमध्‍ये ५७ टक्‍क्‍यांची वाढ झाली. रिअल इस्‍टेट क्षेत्रामधील हायरिंगमध्‍ये देखील प्रबळ २३ टक्‍क्‍यांची वाढ निदर्शनास आली, ज्‍यामध्‍ये दिल्‍ली-एनसीआर (+५१ टक्‍के) आणि हैदराबाद (+२८ टक्‍के) अग्रस्‍थानी होते.

एआय-एमएल क्षेत्राने आपली प्रबळ गती कायम ठेवली:

आयटी क्षेत्राने जुलै’२३ च्‍या तुलनेत जुलै’२४ मध्‍ये १७ टक्‍क्‍यांची उत्तम वाढ केली. दरम्‍यान, एआय-एमएल क्षेत्राने उल्‍लेखनीय ४७ टक्‍के वार्षिक वाढीसह आपली प्रबळ कामगिरी कायम ठेवली. कोलकाता (३८ टक्‍के) आणि पुणे (३० टक्‍के) या विस्‍तारीकरणासाठी मोठे योगदानकर्ते होते, ज्‍यामधून एआय-एमएलसाठी वाढती मागणी दिसून येते. पदांसंदर्भात हायरिंगमध्‍ये मोठी वाढ मशिन लर्निंग इंजीनिअर्स, डेटा सायण्टिस्‍ट्स, बीआय मॅनेजर्स आणि प्रॉडक्‍ट मॅनेजर्स या पदांसाठी दिसून आली.

जीसीसी हायरिंगसंदर्भात दिल्‍ली व हैदराबाद अग्रस्‍थानी:

ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी)मध्‍ये वार्षिक १२ टक्‍के वाढ दिसण्‍यात आली, जेथे दिल्‍ली-एनसीआर (३२ टक्‍के) आणि हैदराबाद (२९ टक्‍के) येथे हायरिंग सर्वाधिक होती. विशेषत: कन्‍सल्टिंग फर्म्‍स आणि अकाऊंटिंग अँड फायनान्‍समधील वाढ सर्वाधिक होती, जी अनुक्रमे ५१ टक्‍के व ३७ टक्‍के होती.

चमकदार कामगिरी करणारी प्रादेशिक शहरे:

गुजरात यासंदर्भात अग्रस्‍थानी होते, जेथे राजकोट, जामनकर आणि बडोदा यांनी अनुक्रमे ३९ टक्‍के, ३८ टक्‍के व २५ टक्‍के वाढीची नोंद केली. हैदराबाद आदरातिथ्‍य (७६ टक्‍के), विमा (७१ टक्‍के), बीपीओ (५२ टक्‍के) आणि ऑईल अँड गॅस (४४ टक्‍के) अशा विविध प्रमुख उद्योगांमध्‍ये रोजगार निर्मितीसाठी प्रमुख हब ठरले. विजयवाडा आणि विशाखापटणमने अनुक्रमे १३ टक्‍के व १४ टक्‍क्‍यांच्‍या उत्तम वाढीची नोंद केली आहे.

अनुभव स्तरांमध्‍ये मोठी वाढ:

२०२४ मध्‍ये पहिल्‍यांदाच, सर्व अनुभव स्तरांमधील हायरिंगमध्‍ये सकारात्‍मक वाढ निदर्शनास आली. विशेषत: काही काळासाठी खूप कमी झालेल्‍या नवीन हायरिंगमध्‍ये वार्षिक ७ टक्‍क्‍यांची प्रेरणादायी वाढ दिसण्‍यात आली. दोन क्षेत्रे फायनान्‍स (२८ टक्‍के) आणि वैद्यकीय (२२ टक्‍के) यांनी फ्रेशरच्‍या रोजगार बाजारपेठेतील या रिकव्‍हरीमध्‍ये योगदान दिले आहे.

नोकरीचे चीफ बिझनेस ऑफिसर डॉ. पवन गोयल म्‍हणाले, “हायरिंग क्रियाकलापमध्‍ये प्रबळ १२ टक्‍के वाढ या आर्थिक वर्षासाठी बहुप्रतिक्षित, प्रेरणादायी चिन्‍ह आहे. या वर्षातील हा पहिला महिना आहे, जेथे आम्‍हाला सकारात्‍मक वाढ दिसण्‍यात आली आहे. खरेतर ही वाढ सेक्‍युलर असून क्षेत्रे व भौगोलिक क्षेत्रांपलीकडील आहे, ज्‍यामुळे अत्‍यंत प्रेरणादायी आहे. या व्‍यापक, सकारात्‍मक परिवर्तनामुळे भारतातील व्‍हाइट-कॉलर रोजगार बाजारपेठेच्‍या प्रगतीची संभाव्‍य सुरूवात होऊ शकते.”

Related posts

मुलांसाठी भारतातील पहिले व सर्वात सुरक्षित स्‍मार्ट ‘एनेबल टॅब’ लाँच

Shivani Shetty

सिक्‍युराइट एक्‍सडीआरला मिळाले एव्‍ही-टेस्‍ट सर्टिफिकेशन

Shivani Shetty

IMDb द्वारे आजवरच्या सर्वोत्तम 250 भारतीय चित्रपटांची नावे जाहीर

Shivani Shetty

Leave a Comment