मुंबई, ऑक्टोबर २०२३: कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल/कोटक) ने आज नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्विसेस लिमिटेड (एनईएसएल) सोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगांतर्गत एनईएसएलच्या व्यासपीठावर बँकेचे पहिले इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी (ई-बीजी) जारी करण्यात येईल.
हा सहयोग ट्रेडच्या डिजिटायझेशनला सक्षम करतो, ज्यामुळे बँक गॅरंटीजच्या कागदपत्र-आधारित इशुअन्स दूर होण्यास मदत होत आहे.डिजिटायझेशनमध्ये इशुअन्स,सुधारणा, क्लोजर, डिजिटल स्टॅम्पिंग आणि साइनिंग (स्वाक्षरी करणे) यांचा समावेश आहे. ज्यामुळे कागदपत्र-आधारित प्रक्रियेसाठी लागणाऱ्या २ ते ३ कामकाज दिवसांच्या तुलनेत काही तासांमध्ये गॅरंटी टर्नअराऊंड टाइम (टीएटी)ची सेवा मिळते. ई-बीजी प्रमाणीकरणासंदर्भातील जोखीम देखील कमी करते.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष व होलसेल बँकिंग प्रमुख परितोष कश्यप म्हणाले, ”कोटक महिंद्रा बँक ग्राहकांना सोयीसुविधा व सुलभ बँकिंग सेवा देण्याप्रती अग्रस्थानी आहे. आमच्या ट्रेड ग्राहकांना ई-बीजी सेवा प्रदान करण्याकरिता एनईएसएलसोबतचा सहयोग कर्जदाता व जारीकर्ता यांच्या अविरत पेपरवर्क, विविध सत्यापन टप्पे अशा अनेक समस्यांना दूर करतो. ग्राहक-केंद्रितपणा व नाविन्यतेवरील आमच्या फोकसने आम्हाला आमच्या बँकिंग सेवांमध्ये डिजिटल परिवर्तनाचा लवकर अवलंब करण्यास सक्षम केले आहे. आम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये प्रदान करणारी सर्व उत्पादने व सेवांमध्ये ग्राहकांचा अनुभव वाढवण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि ई-बीजी ही त्यापैकी एक सेवा आहे.”
एनईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी देबज्योती रे चौधरी म्हणाले, ”ई-बीजी आमच्या ट्रेड फायनान्सच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणते आणि बँकिंग सेवांच्या डिजिटायझेशनमधील महत्त्वाचा टप्पा आहे. ई-बीजी इशुअन्ससाठी,तसेच इन्वोकेशन सारख्या बँकिंग गॅरंटीच्या इतर जीवन चक्र इव्हेण्ट्ससाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करते. त्वरित मेसेजिंगच्या युगामध्ये ई-बीजी लाभार्थींसाठी विश्वसनीय व डिजिटल स्वरूपात इशुअन्सवर उपलब्ध असल्याची बाब उल्लेखनीय आहे.”
एनईएसएल – डिजिटल डॉक्यूमेंट्स एक्झिक्युशन (डीडीई) तंत्रज्ञानाच्या मदतीने लाभार्थी रिअल-टाइममध्ये एनईएसएल पोर्टलवर डिजिटली जारी केलेल्या बँक गॅरंटीज पाहू शकतात. डिजिटल स्वरूपातील ई-बीजी इशुअन्स गॅरंटी जारी करणाऱ्या बँकेकडून स्वतंत्र प्रमाणीकरणाची गरज दूर करते, ज्यामुळे अर्जदार व लाभार्थीचे अतिरिक्त प्रयत्न/वेळ कमी होतो. तसेच, एनईएसएलचे केंद्रीय भांडार आवश्यकतेनुसार जारी केलेल्या बँक गॅरंटीज परत मिळवणे सोयीस्कर बनवते आणि गैरवापराच्या शक्यता कमी करते.