कांजूरमार्ग पूर्व विभागातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी ईशान्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी कांजुरमार्ग पोलिस ठाण्याचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांची कांजुरमार्ग पोलिस ठाणे येथे मंगळवार, (ता.6) ऑगस्ट रोजी भेट घेतली असून विभागातील वाढत्या गुन्हेगारीवर तसेच सायबर क्राईम रोखण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने विभागात जनजागृती करता येईल यावर चर्चा केली. यावेळी
ईशान्य मुंबई जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) उपाध्यक्ष अजितकुमार पिसाळ, वाॅर्ड अध्यक्ष 111 जीवन कांबळे, मुंबई विभागीय सरचिटणीस गणेश मुळेपाटील, वाॅर्ड क्रमांक 111 चे युवक अध्यक्ष अनिल पुजारी
वाॅर्ड क्रमांक 117 चे युवक अध्यक्ष जीतू खोत, युवक वाॅर्ड अध्यक्ष 111 समिर तरडे, विद्यार्थी वाॅर्ड अध्यक्ष 111 विक्रम भाकरे, विद्यार्थी वाॅर्ड अध्यक्ष 117 रीगन मेंन्डोझा, अल्पसंख्यांक वाॅर्ड अध्यक्ष 117 मधुकर जाधव , बाबुराव डोंगरे, दिलीप शिंदे, हिराजी निंबाळकर, अनिल तळगावकर, प्रविण मिसळे, धनाजी कांबळे, सुयश जेधे, कल्पेश सुकाळे, देव जगदाळे, नागेश इंगळे, , नीलेश गुजर, आकाश येडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते, उपस्थित होते.