maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एरिओवेदासह लाइफसेलचा स्किनकेअर क्षेत्रात प्रवेश

मुंबई, ८ ऑगस्ट २०२४: भारतातील पहिली स्टेम सेल बँक आणि निदान, जेनेटिक तपासण्या व गर्भधारणेपूर्व देखभालीतील आघाडीची कंपनी लाइफसेल आता एरिओवेदा लॉन्च करून माता-शिशुच्या स्किनकेअर जगतात क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. या लॉन्चमध्ये या ब्रॅंडने विविध उत्पादने सादर केली आहेत, जी खास करून गरोदर महिला, नुकत्याच माता झालेल्या महिला आणि नवजात शिशु यांच्यासाठी तयार करण्यात आली आहेत. शुद्धता, क्षमता आणि सुरक्षा यांच्या दर्जात कोणतीही तडजोड न करता बनवलेली ही उत्पादने वर्तमान नियमांना धक्का देतात. नैसर्गिक घटकांच्या पुनरुत्पादक शक्तींचा कुशल उपयोग करून ही कंपनी सेल्युलर सायन्स समर्थित दृष्टिकोन प्रदान करते, आणि विशुद्ध स्किनकेअरकडे कशा दृष्टीने पाहिले पाहिजे हे दाखवून देते.

गरोदर महिला आणि नुकत्याच माता झालेल्या महिलांच्या संदर्भात स्ट्रेच मार्क्स, पिग्मेन्टेशन, पुरळ आणि त्वचा रुक्ष होण्याच्या समस्या, तर नवजात शिशुच्या बाबतीत एक्झिमा, डायपर रॅश आणि बाळाच्या टाळूवर डाग पडणे (क्रेडल कॅप) यांसारख्या समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी या कंपनीची संकल्पना करण्यात आली होती. ही कंपनी शिशु-माता समूहाला ज्या त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यावर उपाययोजना प्रदान करते.

एरिओवेदाच्या सह-संस्थापक तरु मयूर म्हणाल्या, “इडब्ल्यूजी (EWG) अभ्यासातून उघड झाले आहे की, एका शिशुच्या नाळेच्या रक्तात २००+ रसायने आढळून आली, जी त्याच्या मातेच्या माध्यमातून आली होती. याचा अर्थ असा की, शरीराच्या आत आणि बाहेर जे काही होत असते, म्हणजे अगदी आपण जी स्किनकेअर उत्पादने वापरतो, त्याचा शिशुच्या निरोगी वाढीवर आणि विकासावर परिणाम होत असतो. या अवलोकनानंतर एरिओवेदासारख्या स्किनकेअर ब्रॅंडची नितांत आवश्यकता आहे, ज्यामध्ये नैसर्गिक घटक आणि प्रगत सेल्युलर टेस्टिंग पद्धती यांचे मिश्रण करून उत्पादनांच्या सुरक्षिततेची आणि परिणामकारकतेची खातरजमा करण्यात येते. आमची उत्पादने दाखल करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे की, आमचे ग्राहक आमच्याकडे त्यांच्या जीवनातील एका सुंदर टप्प्यातील विश्वसनीय साथीदार म्हणून बघतील.”

लाइफसेलद्वारा मान्यता प्राप्त प्रयोगशाळांमध्ये विकसित केलेल्या मानवी त्वचा-पेशींवरील १०+ सेल्युलर चाचण्यांमधून त्यांची उत्पादने पसार होतात. यामध्ये त्वचेच्या पेशींवर उत्पादनाच्या घटकांचा विषारीपणा तपासण्यासाठी सायटोटॉक्सिसिटी टेस्ट, इएलआयएसए टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कॉस्मेटिक उत्पादनाची सुरक्षा तपासण्यासाठी अॅंटी-इरिटेशन टेस्ट, हाडांच्या निर्मितीस मदत करण्याची या उत्पादनांची क्षमता तपासण्यासाठी बोन फॉरमेशन अॅसे, त्वचेच्या पेशींवर या उत्पादनांचा जखम भरून काढण्यातला प्रभाव तपासण्यासाठी सेल-मायग्रेशन अॅसे, स्किन-केअर उत्पादनांची परिणामकारकता तपासण्यासाठी आरटी-पीसीआरटेक्नॉलॉजीच्या मदतीने केली जाणारी अॅंटी-एजिंग टेस्ट आदींचा समावेश आहे.

Related posts

एचडीएफसी लाइफचा मेट्रोपोलिस आणि कॉलहेल्थसह त्रिपक्षीय सहयोग

Shivani Shetty

गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment