maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

बीएलएस इंटरनॅशनलद्वारे आर्थिक वर्ष २०२५ची उल्‍लेखनीय सुरुवात

मुंबई, ७ ऑगस्ट २०२४: बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लिमिटेड या सरकार व नागरिकांसाठी विश्‍वसनीय जागतिक तंत्रज्ञान-सक्षम सेवा सहयोगी कंपनीने ३० जून २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी आपल्‍या एकत्रित आर्थिक निकालांची घोषणा केली.

कामगिरी आणि अलिकडील अपडेट्सबाबत सांगताना बीएलएस इंटरनॅशनल सर्विसेस लि.चे संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. शिखर अग्रवाल म्‍हणाले, ”कंपनीने वर्षाच्‍या प्रबळ शुभारंभाची नोंद केली आणि प्रबळ कामगिरी केली, जेथे तिमाहीदरम्‍यान एकत्रित महसूल व ईबीआयटीडीएमध्‍ये अनुक्रमे २८.५ टक्‍के आणि ६६.३ टक्‍क्‍यांची वाढ झाली. या वाढीचे श्रेय व्हिसा अँड कॉन्‍सुलर व्‍यवसायाला जाते, ज्‍याने आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या तिमाहीत वार्षिक ३५.९ टक्‍के महसूल वाढ आणि वार्षिक ७०.९ टक्‍के ईबीआयटीडीए वाढ नोंदवली. आमचा जागतिक स्‍तरावर बाजारपेठ हिस्‍सा वाढवण्‍याप्रती केंद्रित दृष्टिकोन, तसेच उद्योगामधील प्रबळ अनुकूल परिस्थितींनी विभागाच्‍या विकासाला योगदान दिले आहे.

विविध ठिकाणी सहयोगी-संचालितवरून स्‍वयं-व्‍यवस्‍थापित केंद्रांमध्‍ये रूपांतरित होत आमच्‍या व्हिसा व्‍यवसाय कार्यसंचालनांना अधिक कार्यक्षम करण्‍याप्रती सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांनी आम्‍हाला उच्‍च ईबीआयटीडीए मार्जिन संपादित करण्‍यास सक्षम केले. व्हिसा अँड कॉन्‍सुलर व्‍यवसायाच्‍या ईबीआयटीडीए मार्जिनमध्‍ये आर्थिक वर्ष २४ च्‍या पहिल्‍या तिमाहीमधील २३.३ टक्‍के आणि आर्थिक वर्ष २४ च्‍या चौथ्‍या तिमाहीमधील २०.८ टक्‍क्‍यांवरून २९.३ टक्‍क्‍यांसह वार्षिक ६०० बीपीएस व तिमाही-ते-तिमाही ८५० बीपीएसची वाढ दिसण्‍यात आली.

नुकतेच, आम्‍ही आयडीएटीएमध्‍ये १०० टक्‍के हिस्‍स्याचे संपादन पूर्ण करत मोठा टप्‍पा गाठला आहे, तसेच आम्‍ही आयडीएटीएच्‍या व्‍यवसाय कार्यसंचालनांना बीएलएससोबत एकीकृत करण्‍याप्रती काम करत आहोत. आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या तिमाहीदरम्‍यान आम्‍ही भारतातील सर्वात मोठी कर्ज वितरण व प्रक्रिया कंपनी आदिफिडेलिस सोल्‍यूशन्‍स कं. लि. सोबत ५५ टक्‍के नियंत्रित हिस्‍सा संपादित करण्‍यासाठी निर्णयात्‍मक शेअर परचेस अॅग्रीमेंट देखील केली. हे संपादन चालू असलेल्‍या तिमाहीदरम्‍यान पूर्ण होण्‍याची अपेक्षा आहे आणि आमचा विश्‍वास आहे की यामुळे आमच्‍या लास्‍ट माइल बँकिंग कव्‍हरेजमध्‍ये वाढ होईल आणि आमच्‍या डिजिटल व्‍यवसायांतर्गत व्‍यापक क्रॉस-सेलिंग संधी उपलब्‍ध करून दिल्‍या जातील.

Related posts

मुंबई व पुणे शहरात प्रिमिअम घरांसाठी मागणीमध्‍ये मोठी वाढ: प्रॉपटायगर

Shivani Shetty

क्विक हील फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम

Shivani Shetty

कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज ०.८८ टक्के इतका निश्चित मासिक व्याजदर, त्याच दिवशी वितरण, फोरक्लोजिंगच्या पर्यायांचीही ऑफर एका मल्टिमीडिया जाहिरात अभियानाद्वारे कर्ज उत्पादन बाजारात आणली जात आहे

Shivani Shetty

Leave a Comment