भारत २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करत असताना आम्ही असाधारण यशांना प्रकाशझोतात आणत आहोत, ज्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदणी करत भारताच्या क्रीडा वारसाला नव्या उंचीवर नेले आहे. संपूर्ण देश सणाप्रमाणे प्रत्येक विजयाला साजरे करत असताना आम्ही अथक मेहनत घेण्यासह उत्तम कामगिरी करत इतिहास रचलेल्या आपल्या अॅथलीट्सच्या गौरवास्पद कामगिरीला उजाळा देत आहोत. नवीन जागतिक विक्रम रचण्यापासून भावी पिढ्यांना प्रेरित करण्यापर्यंत भारतीय अॅथलीट्स सतत सर्वोत्तमतेच्या मर्यादांना दूर करत आहेत आणि आता ३३व्या पर्वामध्ये असलेल्या भारतातील पहिल्या रेकॉर्ड बुकमध्ये स्थान मिळवले आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् या प्रेरणादायी टप्प्यांना साजरे करते, तसेच आपल्या देशाच्या क्रीडाप्रती आवडीच्या पैलूला व्यापून घेते आणि लाखो वाचकांच्या मनात निर्धाराची भावना जागृत करते.
आमच्यासह सामील व्हा, जेथे आम्ही नवीन पर्व सादर करण्यासोबत इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव कोरलेल्या, भारतातील टॅलेंटची क्षमता व्यक्त करणाऱ्या अद्वितीय उत्साहाला दाखवणाऱ्या क्रीडा सर्वोत्तमतेची
झलक सादर करत आहोत.
• *आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज*
सी.ए. भवानी देवी २०२३ मध्ये कांस्य पदक जिंकून आशियाई तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय तलवारबाज ठरली.
• *एशियन गेम्स – नेमबाजीमध्ये महिला खेळाडूने जिंकलेली सर्वाधिक पदके*
तेलंगणातील १८ वर्षांची पिस्तूल नेमबाज ईशा सिंग एशियन गेम्स २०२३ मध्ये जिंकलेल्या पदकांच्या बाबतीत सर्वात यशस्वी अॅथलीट ठरली. तिने एकूण चार पदके जिंकली: महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि २५ मीटर एअर पिस्तूल (वैयक्तिक), १० मीटर एअर पिस्तूल (वैयक्तिक), व १० मीटर एअर पिस्तूल (सांघिक) स्पर्धेत तीन रौप्यपदक. तिच्या या अतुलनीय कामगिरीने देशातील युवा खेळाडूंसाठी एक नवा बेंचमार्क निर्माण केला आहे.
• *एकाच क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा*
विराट कोहली २०२३ मध्ये ७६५ धावांसह एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने २००३ मध्ये सचिन तेंडुलकरचा यापूर्वीचा ६७३ धावांचा विक्रम मोडला.
• *एशियन गेम्समधील स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली जोडी*
दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल सिंग संधू ही एशियन गेम्स २०२२ मध्ये स्क्वॅशमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली जोडी ठरली.
• *डायमंड लीग – लाँग जम्पमधील पोडियम स्थानांमध्ये प्रथम स्थान*
केरळचा लांब उडी मारणारा मुरली श्रीशंकरने डायमंड लीग स्पर्धेत पोडियम फिनिश मिळवणारा पहिला भारतीय लांब उडीपटू बनून इतिहास घडवला. पॅरिस डायमंड लीग २०२३ मध्ये त्याने ८.०९ मीटरच्या प्रभावी झेपसह तिसरे स्थान पटकावले. या यशामुळे तो डिस्कस थ्रोअर विकास गौडा आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यासोबत डायमंड लीगमध्ये टॉप-थ्री स्थान मिळवणाऱ्या काही भारतीयांपैकी एक आहे.
• *सर्वात लांब बकासन*
उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील वीरेंद्र विक्रम सिंग (जन्म २ डिसेंबर १९५४) यांनी १६ मे २०२२ रोजी एम.पी.पी इंटर कॉलेज, बलरामपूर येथे सायंकाळी ६.१० वाजल्यापासून सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत ५ मिनिटे बकासन (क्रेन पोझ) केले.
• *सर्वात तरुण जागतिक चॅम्पियन – तिरंदाजी*
किशोरवयीन तिरंदाज अदिती स्वामी विश्वचषक युगातील (२००६ नंतर) वयाच्या १७व्या वर्षी बर्लिन, जर्मनी येथे जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकून आतापर्यंतची सर्वात तरूण सीनियर वर्ल्ड चॅम्पियन ठरली.
• *सर्वात वेगवान जीक्यू मोहीम – गट – महिला*
सुक्रती सक्सेना, रुपम देवेदी, स्वरांजली सक्सेना आणि अपाला राजवंशी यांनी ६ दिवस १४ तास ५ मिनिटांत ६,२६३ किमी अंतर कापून गोल्डन क्वॉड्रिलॅटरल (जीक्यू) मोहीम पूर्ण केली. त्यांनी १० मे २०२३ रोजी रात्री १.३५ वाजता इंडिया गेट, नवी दिल्ली येथून त्यांची मोहीम सुरू केली आणि १६ मे २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वाजता सुब्रतो पार्क एअर फोर्स स्टेशन, नवी दिल्ली येथे मोहिम पूर्ण केली.
• *अॅडव्हेंचर (डब्ल्यूआर): महासागराचे सात आव्हान पूर्ण करणारे जगातील सर्वात तरुण व्यक्ती*
महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रभात कोळी (जन्म २७ जुलै १९९९) वयाच्या २३व्या वर्षी १ मार्च २०२३ रोजी महासागराचे सात आव्हान पूर्ण करणारा जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरला. त्याने ८ तास ४१ मिनिटांत खराब हवामानात न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिण बेटांमधील कुक सामुद्रधुनी पार करत आव्हान पूर्ण केले. तो तेनझिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड (२०१८) चा प्राप्तकर्ता देखील आहेत.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसच्या सल्लागार संपादक आणि हॅचेट इंडियाच्या प्रकाशक वत्सला कौल बॅनर्जी म्हणाल्या, ”लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् देशाच्या क्रीडा उत्साहाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासोबत यशस्वी कामगिरींना नवीन आकार दिलेल्या भारतातील अॅथलीट्सच्या अविश्वसनीय प्रवासांना सन्मानित करत आहे. प्रत्येक विक्रमामध्ये चिकाटी व आवडीची गाथा सामावलेली आहे, जी वाचकांना मोठे स्वप्न पाहण्यास आणि मर्यादांना दूर करण्यास प्रेरित करते.”
कोका-कोला कंपनी येथील इंडिया व साऊथ-वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिटमधील हायड्रेशन, स्पोर्टस् अँड टी कॅटेगरीच्या विपणनाच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, ”लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमधील या यशस्वी टप्प्यांना साजरे करण्यामधून आपल्या अॅथलीट्सचा असाधारण निर्धार दिसून येतो. त्यांच्या यशामधून प्रबळ आठवण करून दिली जाते की, अवधान व प्रयत्नासह मोठे यश संपादित करता येते आणि हे तत्त्व सक्रिय, आरोग्यदायी जीवनशैलींना पाठिंबा देण्याप्रती आमच्या मिशनशी दृढपणे संलग्न आहे.”
लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् २०२४ मध्ये या अविश्वसनीय गाथांबाबत अधिक एक्स्प्लोअर करा आणि देशाच्या क्रीडा वारसाला आकार देत असलेल्या असाधारण कामगिरींचा अनुभव घ्या: https://www.amazon.in/LIMCA-BOOK-RECORDS-Hachette-India/dp/9357318453