maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोटककडून फक्‍त यूएई प्रवाशांसाठी फाल्‍कन फॉरेक्‍स कार्ड लाँच

कोटक फाल्‍कन कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांना पर्यटन स्‍थळे, साहसी खेळ, खरेदी, डायनिंग आणि अद्वितीय अनुभवांवर १०० हून अधिक ऑफर्स मिळतील

यूएईला प्रवास करणाऱ्या महत्त्वाकांक्षी भारतीयांसह पहिल्‍यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्‍या गरजांची पूर्तता करत हे कार्ड जवळपास २०,००० रूपये बचत देते

मुंबई, सप्टेंबर २०२४ – कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (‘केएमबीएल/कोटक’) आज युनायटेड अरब एमिरेट्स (यूएई)ला प्रवास करणाऱ्या भारतीयांच्‍या वाढत्‍या आकडेवारीसाठी सिंगल करण्‍सी प्रीपेड फॉरेक्‍स कार्ड ‘कोटक फाल्‍कन कार्ड’ लाँच केले. कोटक फाल्‍कन कार्डची खासियत म्‍हणजे सुरक्षितता व सोयीसुविधा आणि जवळपास २०,००० रूपयांची* एकूण बचत, ज्‍यामुळे ते महत्त्वाकांक्षी भारतीयांचे लक्ष वेधून घेते.

यूएईमधील पेमेंट्ससाठी कोटक फाल्‍कन कार्डचा वापर करणाऱ्या प्रवाशांना १०० हून अधिक पर्यटन स्‍थळे, साहसी खेळ, खरेदी, डायनिंग आणि अद्वितीय अनुभवांमध्‍ये त्‍वरित सूट मिळतील. अतिरिक्‍त फायद्यांमध्‍ये पूरक विमा संरक्षण, २४*७ रिलोड सर्विस, त्‍वरित रिफंड आणि विनासायास कार्ड रिप्‍लेसमेंटचा समावेश आहे.

मुंबईतील ग्‍लोबल फिनटेक फेस्‍ट येथे कोटक महिंद्रा बँकेच्‍या हेड अफ्लूएण्‍ट, एनआरआय, बिझनेस बँकिंगचे अध्‍यक्ष व मुख्‍य विपणन अधिकारी रोहित भासिन, मर्क्‍युरी पेमेंट्स सर्विसेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी मुझफ्फर हमीद आणि एनपीसीआयचे मान्‍यवर यांच्‍या हस्‍ते कोटक फाल्‍कन कार्डचे अनावरण करण्‍यात आले.

यूएई आधुनिकता व लक्‍झरीचा उत्‍साहवर्धक आनंद देते. हा देश एकीकृत आर्थिक व डिजिटल पेमेंट सिस्‍टमसह भारताचा तिसरा सर्वात मोठा ट्रेडिंग सहयोगी आहे. ज्‍यामुळे २०२३ मध्‍ये २.४६ दशलक्षहून अधिक रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दुबईला भेट दिली, याबाबत आश्‍चर्य करण्‍यासारखे नाही^. बातमी अहवालानुसार हे कोणत्‍याही देशामधील सर्वोच्‍च प्रमाण आहे. व्‍यापक भारतीय समूह, देशासाठी अनेक शहरांमधून थेट फ्लाइट्स आणि पहिल्‍या परदेशी ट्रिपसह आंतरराष्‍ट्रीय प्रवासासाठी वाढती महत्त्‍वाकांक्षा या कारणांमुळे दरवर्षी अधिकाधिक भारतीय यूएईकडे आकर्षित होत आहेत.

रोहित भासिन म्‍हणाले, ”महत्त्वाकांक्षी भारतीयांसाठी सर्वात पसंतीची बँक असण्‍यावरील आमच्‍या फोकसचा भाग म्‍हणून आम्‍हाला विशेषत: यूएई प्रवाशांसाठी लक्षवेधक मूल्‍य तत्त्‍व – कोटक फाल्‍कन कार्ड लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. सिंगल करण्‍सी प्रीपेड फॉरेक्‍स कार्ड यूएईला प्रवास करणाऱ्या भारतीयांच्‍या वाढत्‍या आकडेवारीसाठी, तसेच पहिल्‍यांदाच प्रवास करणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांसाठी अद्वितीय ऑफरिंग आहे, तसेच त्‍यांना यूएईमध्‍ये केलेल्‍या पेमेंट्सवर सुरक्षितता व सोयीसुविधा आणि विश्रांतीचा आनंद घेण्‍यासाठी केलेल्‍या पेमेंट्सवर उत्तम बचत देते.”

मुझफ्फर हमीद म्‍हणाले, ”कोटक फाल्‍कन कार्ड सक्षम करत मर्क्‍युरी सर्वसमावेशक पेमेंट्सप्रती आमच्‍या दृष्टिकोनाला पुढे घेऊन जात आहे. आम्‍ही यूएईमधील रूपेची उपस्थिती विस्‍तारित करण्‍यासाठी एनपीसीआय इंटरनॅशनल आणि कोटक महिंद्रा बँकेसोबत सहयोग करत आहोत, आर्थिक सेवा अधिक सुलभ करत आहोत, ज्‍यामधून व्‍यापक बाजारपेठेसाठी पेमेंट्सचे लोकशाहीकरण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

कोटक फाल्‍कन कार्ड पुढील दोन महिन्‍यांमध्‍ये ग्राहकांसाठी उपलब्‍ध असेल.
अनु. क्र. मर्चंट श्रेणी ऑफर
१ स्‍काय दुबई एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस ३० टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
२ दुबई फ्रेम एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस १० टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
३ हॉट एअर बलून राइड एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस हॉट एअर बलून राइडवर ४० टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
४ टॉप बुर्ज खलिफा एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस १५ टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
५ यास वॉटर वर्ल्‍ड एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस ३० टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
६ फेरारी वर्ल्‍ड थीम पार्क एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस २५ टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
७ दुबई गार्डन ग्‍लो एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस २५ टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
८ दुबई अॅक्‍वारियम अँड अंडरवॉटर झू एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस २०टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
९ म्‍युझियम ऑफ द फ्यूचर एंटरटेन्‍मेंट अँड एक्‍स्‍पेरिअन्‍सेस १० टक्‍के सूटचा आनंद घ्‍या
१० रमदा हॉटेल अँड सूट्स बाय विंध्‍यम जेबीआर डायनिंग लंच/डिनर/इंटरनॅशनल बफेटवर बाय १ गेट १ फ्री

Related posts

विजय सेल्सच्या ख्रिसमस आणि एंड ऑफ न्यू इअर सेलला सुरुवात

Shivani Shetty

ईडीकडून पेटीएमची कोणत्‍याही प्रकारची चौकशी नाही, महसूल सचिवांकडून पुष्‍टी

Shivani Shetty

कबड्डीची गरज परत येते: दबंग दिल्ली क.सी. ने ४ वर्षांनंतर राजधानीत उत्साह फुंकलंय

Shivani Shetty

Leave a Comment