maharashtraprimenews
ठळक बातम्या
HealthPublic InterestSocial causeआरोग्यठळक बातम्यापुरस्कारमहाराष्ट्रमुंबईहेल्थ

आरोग्य योद्ध्यांना मिळाले नवे व्यासपीठ – HIFAA मध्ये प्रथमच डॉक्टर्ससोबत नर्स, वॉर्ड बॉय आणि अँब्युलन्स ड्रायव्हर्सचा सन्मान

मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये HIFAA (Healthcare Iconic Fashion and Awards) या ऐतिहासिक आणि भावनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जिथे प्रथमच केवळ डॉक्टरच नव्हे तर नर्स, वॉर्ड बॉय, अँब्युलन्स ड्रायव्हर्स आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही त्यांच्या आरोग्य सेवेसाठी गौरवण्यात आले.

या आगळ्या उपक्रमामागे होते डॉ. बिस्वजित मंडल यांचे दूरदर्शी विचार, ज्यांनी आरोग्य व्यवस्थेत डॉक्टरांसोबतच इतर कर्मचाऱ्यांचं महत्त्वही अधोरेखित केलं. कोविड-१९ महामारीदरम्यान या फ्रंटलाइन वॉरियर्सनी अपवादात्मक धैर्य आणि समर्पण दाखवलं, मात्र त्यांना अपेक्षित सन्मान मिळालेला नव्हता.

या भव्य सोहळ्यात विविध स्तरांवरील आरोग्य कर्मचारी केवळ सन्मानितच झाले नाहीत, तर त्यांना रॅम्पवर वॉक करण्याची संधीही देण्यात आली – जी त्यांच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि सामाजिक ओळखीला चालना देणारा क्षण ठरला.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते माजी गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, आणि सेलिब्रिटी पाहुणे म्हणून ‘आशिकी’ फेम अभिनेते राहुल रॉय आणि सुप्रसिद्ध फिटनेस गुरू मिक्की मेहता उपस्थित होते. नानावटी मॅक्स हॉस्पिटलचे ट्रस्टी सचिन नानावटी यांचीही विशेष उपस्थिती होती.

मिक्की मेहता म्हणाले, “आरोग्य कर्मचार्‍यांना अशा व्यासपीठावर सन्मानित करणे हा एक अत्यंत प्रेरणादायक आणि उदात्त उपक्रम आहे.” पिंटू मंडल यांच्या समर्पणामुळेही हा कार्यक्रम यशस्वी झाला.

कार्यक्रमात कर्करोग, हृदयविकार आणि प्रदूषण यांसारख्या आरोग्य विषयांवर जागरूकता निर्माण करणाऱ्या चर्चा झाल्या.

उपस्थित असलेले प्रमुख डॉक्टर होते –
डॉ. राहुल बाजपेयी, डॉ. रमाकांत देशपांडे, डॉ. संतोष पांडे, डॉ. शंकर सावंत, डॉ. कुमुद पटेल, डॉ. प्रवीण खळे, डॉ. अली ईरानी आणि डॉ. वैदेही तामण. मुंबईबाहेरून आलेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. सत्यजित बोस (दुर्गापूर) आणि डॉ. प्रकाश शेल्वन (चेन्नई) यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

डॉ. बिस्वजित मंडल म्हणाले, “डॉक्टर्स रुग्णांच्या संपर्कात थोडा वेळ असतात, पण नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर स्टाफ सर्वाधिक वेळ रुग्णांसोबत असतो. त्यामुळे त्यांचाही सन्मान होणे तितकेच आवश्यक आहे.”

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री, अँकर आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या एकता जैन यांनी केलं आणि त्यांनी कार्यक्रमात उत्साह आणि भावना भरल्या.

सेलिब्रिटी अतिथी राहुल रॉय यांनी अनेक अपवादात्मक व्यक्तींना पुरस्कार दिले. त्यांच्या बहिणीने मंचावर येऊन सांगितले की, ब्रेन स्ट्रोकनंतर डॉक्टरांनी राहुल यांना जीवनदान दिले. अजूनही त्यांना बोलण्यात अडचण होते, पण त्यांची जिद्द आणि डॉक्टरांचे योगदान हे एक उदाहरण आहे.

कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचाही गौरव करण्यात आला, ज्यात मियाम चॅरिटेबल ट्रस्टच्या नीतू जोशी, फ्लोरियन फाउंडेशनच्या अर्चना जैन, BMC चे राजू सकट, इक्बाल ममदानी, सी गार्डियनचे सुनील कनोजिया, प्रकाश गिडवानी यांचा समावेश होता.

मेडहा मांजरेकर यांनी अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासाठी पुरस्कार स्वीकारताना सांगितले, “ते एक लढवय्ये आहेत. त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली. मी आणि माझी मुलगी सई यांनी त्यांची काळजी घेतली.”

HIFAA हा केवळ पुरस्कार समारंभ नसून एक सामाजिक चळवळ आहे, जी आपल्याला खरी नायके कोण आहेत हे सतत आठवून देते – डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय आणि अँब्युलन्स ड्रायव्हर्स जे निःस्वार्थपणे रुग्णसेवा gv करतात.

Related posts

*एनओव्‍हीएसी ३.०: क्‍लीअरट्रिपच्‍या फ्लॅगशिप ट्रॅव्‍हल सेलचे आकर्षक डिल्‍ससह पुनरागमन* सर्वात मोठा समर ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस् व हॉलिडे पॅकेजेसवरील अद्वितीय डिल्‍ससह परतला आहे! राष्‍ट्रीय, २० मार्च २०२५: समर ट्रॅव्‍हल सीझन जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप ही फ्लिपकार्ट कंपनी आपल्‍या बहुप्रतिक्षित #NationOnVacation (एनओव्‍हीएसी) सेलच्‍या तिसऱ्या एडिशनसह परतली आहे. २० मार्चपासून सुरू होत असलेला हा ९-दिवसीय ट्रॅव्‍हल महोत्‍सव फ्लाइट्स, हॉटेल्‍स आणि इतर पॅकेजेसवर सर्वात मोठ्या सूट देतो, ज्‍यामुळे ग्राहक अद्वितीय दरांमध्‍ये त्‍यांचे स्‍वप्‍नवत व्‍हेकेशन्‍स बुक करू शकतात. वर्दळीच्‍या प्रवास महिन्‍यांदरम्‍यान विमानभाडे दर किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढण्‍याची अपेक्षा असताना क्‍लीअरट्रिप ग्राहक बुकिंग वर्तणूकीमधील परिवर्तनाचे नेतृत्‍व करत आहे, तसेच प्रवाशांना आधीच प्रवास योजना आखण्‍यास आणि दरांमध्‍ये वाढ होण्‍यापूर्वी सर्वोत्तम भाडेदरांचा आनंद घेण्‍यास प्रेरित करत आहे. एनओव्‍हीएसी ३.० सह क्‍लीअरट्रिप उद्योग नवप्रवर्तक म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ करत आहे, तसेच किंमतीमधील पारदर्शकता, किफायतशीरपणा आणि स्थिर प्रवास पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक-केंद्रित नाविन्‍यतेप्रती कटिबद्ध क्‍लीअरट्रिपने ‘क्‍लीअरचॉईस’ उपक्रमांतर्गत आपल्‍या ऑफरिंग्‍ज वाढवत आहे, ज्‍यामुळे प्रवाशांना उत्तम बुकिंग स्थिरतेचा लाभ घेता येईल. क्‍लीअरचॉईस प्‍लस व क्‍लीअरचॉईस मॅक्‍ससह ग्राहक त्‍यांच्‍या बुकिंग्‍जमध्‍ये बदल करू शकतात किंवा संपूर्ण रिफंडसह रद्द करू शकतात, ज्‍यामुळे एअरलाइन बुकिंग रद्दीकरणासाठी कोणतेही शुल्‍क आकारले जाणार नाहीत. मिंत्रा आणि फ्लिपकार्ट लॉयल्‍टी सदस्‍यांना देखील क्‍लीअरिट्रिप व फ्लिपकार्ट ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्म्‍सवर विशेष सूट व ऑफर्सचा आनंद घेता येईल. या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत क्‍लीअरट्रिपचे चीफ ग्रोथ अँड बिझनेस ऑफिसर अनुज राठी म्‍हणाले, “क्‍ली‍अरट्रिप ट्रॅव्‍हल किंमत मॉडेल्‍समध्‍ये नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आगामी महिन्‍यांमध्‍ये विमानभाडे दर मोठ्या प्रमाणात वाढण्‍याची अपेक्षा असताना एनओव्‍हीएसीचे हे एडिशन प्रवाशांना सर्व स्‍तरावर पुढे राहण्‍यास मदत करण्‍याची आमची पद्धत आहे. आधीच नियोजन करत ग्राहक किंमत वाढीच्‍या अनिश्चिततेला टाळू शकतात आणि विनासायासपणे, किफायतशीर व उत्‍साहाने प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.” प्रमुख ऑफर्स: ● ९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत फ्लाइट्स ● ५९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट्स ● २४९९ रूपयांपासून सुरू होणारे लक्‍झरी हॉटेल्‍स (४- व ५-स्‍टार) ● बस बुकिंग्‍जवर जवळपास ४० टक्‍के सूट ● हॉटेल बुकिंग्‍जवर ३० टक्‍के ते ८० टक्‍के सूट ● मिंत्रा इनसाइडर आयकॉनसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस प्‍लस ● फ्लिपकार्ट व्‍हीआयपीसाठी १ रूपयामध्‍ये क्‍लीअरचॉईस मॅक्‍स सर्व ऑफर्स उपलब्धतेच्या अधीन आहेत आणि मर्यादित कालावधीसाठी वैध आहेत. मूल्य पारदर्शकतेला प्राधान्‍य देत एनओव्‍हीएसी ३.० चा भारतातील प्रवाशांच्‍या ट्रिप प्‍लॅनिंग करण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे. लवकर बुकिंग करून प्रवासी किंमत वाढ टाळू शकतात, अधिक स्थिरता मिळवू शकतात आणि त्यांच्या पैशाचे अधिक मूल्य मिळवू शकतात. गेल्‍या वर्षी बुकिंग्‍जमध्‍ये ८० टक्‍के वाढीसह मिळालेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादानंतर क्‍लीअरट्रिप ग्राहक-केंद्रित ट्रॅव्‍हल सोल्‍यूशन्‍स डिझाइन करण्‍याप्रती समर्पित आहे. एनओव्‍हीएसीचे तिसरे एडिशन विविध प्रवाशांसाठी उपलब्‍धता आणि किफायतशीरपणामध्‍ये अधिक वाढ करण्‍यास सज्‍ज आहे.

Shivani Shetty

रिकांत पिट्टी यांची रिग्रिप, शक्‍ती वीअरेबल्‍स आणि वास्‍तू घीमध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

En guide til oplevelser hos MrGreen

cradmin

Leave a Comment