मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३: सेन्स स्मार्ट टीव्ही या समकालीन तंत्रज्ञान-संचालित टेलिव्हिजन ब्रॅण्डने नुकतेच भारतातील स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्टवरील लक्षणीय विक्री कामगिरीची घोषणा केली. ब्रॅण्डच्या अॅव्हरेज सेलिंग प्राइस (एएसपी) मध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे, जेथे यूएचडी व क्यूएलईडी मॉडेल्ससाठी उत्स्फूर्त मागणीमुळे ही वाढ शक्य झाली. ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी ब्रॅण्डने आपल्या उत्पादन लाइन-अपमध्ये वाढ केली आहे आणि आता ३२ इंचापासून ६५ इंचापर्यंत टेलिव्हिजन्सची व्यापक श्रेणी देत आहे, ज्यामध्ये १५ विभिन्न एसकेयूंचा समावेश आहे. या विस्तारीकरणामधून ग्राहकांची मोठ्या स्क्रिन आकाराच्या मॉडेल्सप्रती वाढती रूची दिसून येते.
ब्रॅण्डच्या लोकप्रियतेमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीचे श्रेय नाविन्यता आणि अद्वितीय उत्पादन ऑफरिंग्जची डिलिव्हरी करण्याप्रती अविरत कटिबद्धतेला जाते. सेन्स स्मार्ट टीव्हीने आधुनिक, तंत्रज्ञान-प्रेमी ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या व्यापक सर्वोत्तम वैशिष्ट्यांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुलभूत ग्राहकवर्गासह आपले संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि ब्रॅण्ड रिकॉल वाढवण्यासाठी सेन्सने वास्तविक जीवनात पती-पत्नी असलेले बॉलिवुड कलाकार रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांच्यासोबत सहयोग केला आहे, त्यांना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स म्हणून नियुक्त केले आहे. ही डायनॅमिक जोडी डायनॅमिक मिलेनियल व्यक्तींसोबत संलग्न होण्याच्या, तसेच बाजारपेठेत दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याच्या ब्रॅण्डच्या दृष्टीकोनाशी परिपूर्ण संलग्न आहे.
सेन्सच्या संचालक विधी जैन म्हणाल्या, “आम्हाला फ्लिपकार्टवरील लक्षणीय उपलब्धीचा आनंद होत आहे. या यशामधून ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण डिझाइन व अपवादात्मक मूल्य प्रदान करण्याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते. आम्ही ग्राहकांचे त्यांनी दाखवलेला विश्वास व पाठिंब्यासाठी आभार व्यक्त करतो, तसेच आम्ही टेलिव्हिजन उद्योगामधील स्तर उंचावण्याप्रती समर्पित आहोत.”