मुंबई, २ सप्टेंबर २०२४: टीमलीज एडटेकने नुकतेच जारी केलेल्या ‘करिअर आऊटलुक रिपोर्ट एचवाय२ (जुलै – डिसेंबर २०२४)’मधून निदर्शनास आले की ७२ टक्के नियोक्त्यांचा आगामी महिन्यांमध्ये फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा विचार आहे. भारतातील ६०३ हून अधिक कंपन्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर या अहवालामधून नवीन पदवीधरांसाठी रोजगार बाजारपेठेतील सकारात्मक ट्रेण्ड निदर्शनास येतो.
७२ टक्के हायरिंग विचारामध्ये गेल्या सहामाहीच्या तुलनेत ४ टक्के वाढ आणि २०२३ मध्ये याच कालावधीच्या तुलनेत ७ टक्के वाढ दिसून येते. यामधून नवीन टॅलेंटसाठी रोजगार क्षेत्रात हळूहळू वाढ होत असल्याचे निदर्शनास येते. ”यामधून नियोक्त्यांमधील वाढता आत्मविश्वास दिसून येतो आणि कर्मचारीवर्गात प्रवेश करणाऱ्या नवीन टॅलेंटसाठी बहुमूल्य संधी मिळते,” असे टीमलीज एडटेकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू रूज म्हणाले.
या अहवालामधून निदर्शनास येते की ई-कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप्स, इंजीनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिटेल या फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा विचार करणाऱ्या टॉप तीन इंडस्ट्रीज आहेत, जेथे या क्षेत्रांमधील अनुक्रमे ६१ टक्के, ५९ टक्के आणि ५४ टक्के नियोक्ते रिक्रूटचे नियोजन करत आहेत. ज्यानंतर ६० टक्क्यांसह मुंबई आणि ५४ टक्क्यांसह चेन्नई यांचा क्रमांक आहे.
रोजगार पदांसंदर्भात फुल स्टॅक डेव्हलपर, एसईओ एक्झिक्युटिव्ह, डिजिटल सेल्स असोसिएट आणि यूआय/यूएक्स डिझाइनर ही फ्रेशर्ससाठी सर्वात इन-डिमांड पदे म्हणून उदयास आली आहेत. नियोक्ते विशेषत: सायबरसिक्युरिटी, क्लाऊड कम्प्युटिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये कौशल्ये असलेल्या उमेदवारांचा शोध घेत आहेत. हा अहवाल उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहयोगाच्या वाढत्या महत्त्वावर देखील प्रकाश टाकतो. ७० टक्के नियोक्ते अनुभवात्मक अध्ययनासह अभ्यासक्रम सुधारित करण्याचा सल्ला देतात, तर ६२ टक्के नियोक्ते उद्योग गरजांनुसार शिक्षण देण्यासाठी उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील सहयोगाचे समर्थन करतात. तसेच, पदवी प्रशिक्षणार्थीना स्थिर मागणी दिसत आहे.
मॅनुफॅटयुरिंग इंडस्ट्री २५ टक्के नियोक्ते पदवी प्रशिक्षणार्थीना नियुक्त करण्याच्या नियोजनासह अग्रस्थानी आहे , ज्यानंतर १९ टक्क्यांसह इंजीनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि ११ टक्क्यांसह कन्स्ट्रक्शन अँड रिअल इस्टेट यांचा क्रमांक आहे. शहरांमध्ये बेंगळुरू पदवी प्रशिक्षणार्थींना नियुक्त करण्याचा विचार करणाऱ्या २५ टक्के नियोक्त्यांसह अग्रस्थानी आहे, ज्यानंतर २१ टक्क्यांसह चेन्नई आणि १६ टक्क्यांसह मुंबई यांचा क्रमांक आहे.
टीमलीज एडटेकच्या एम्प्लॉयेबिलिटी बिझनेसचे प्रमुख व सीओओ जयदीप केवलरमानी म्हणाले, ”फ्रेशर नियुक्ती विचारामध्ये जुलै-डिसेंबर २०२३च्या तुलनेत ७ टक्क्यांची वाढ, तसेच विविध क्षेत्रांमधील वाढत्या मागणीमधून रोजगार बाजारपेठेत प्रबळ रिकव्हरी दिसून येते. पदवीधरांसाठी याचा अर्थ असा की, इन-डिमांड डिजिटल कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासोबत विविध अध्ययन अनुभव अंगिकारल्यास या विकसित होत असलेल्या क्षेत्रामध्ये त्यांच्या संभाव्य करिअर प्रगतीला मोठ्या प्रमाणात गती मिळू शकते.”