मुंबई, ४ सप्टेंबर २०२४: इंटरॅक्टिव्ह डिस्प्ले सोल्युशन्स पुरवणारी आघाडीची कंपनी मॅक्सहबने नवी उत्पादने सादर करून आपल्या उत्पादन श्रेणीचा विस्तार केला आहे. कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रात संवाद व समन्वयात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने ही नवी उत्पादने तयार करण्यात आली आहेत.
या नवीन श्रेणीतील एक्स७ सीरिज इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल्स (आयएफपी) खासकरून कॉर्पोरेट वापरासाठी डिझाईन करण्यात आली आहेत. बिझनेस मीटिंग्स प्रभावी व्हाव्यात यासाठी आवश्यक अत्याधुनिक क्षमता यामध्ये आहेत. यु३ सीरिज देखील यावेळी सादर करण्यात आली, यातील इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल्स शिक्षण क्षेत्रासाठी तयार करण्यात आली आहेत, जी संवादात्मक व सर्वांना सामावून घेणाऱ्या शिक्षण अनुभवांना प्रोत्साहन देतात.
या इंटरॅक्टिव्ह डिस्प्लेच्या बरोबरीने मॅक्सहबने युसी पी३० हा उच्च गुणवत्तापूर्ण पीटीझेड (पॅन-टिल्ट-झूम) कॅमेरा देखील सादर केला, जो प्रोफेशनल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये वापरण्यासाठी अतिशय योग्य आहे. कंपनीने मायक्रोसॉफ्ट टीम्स रूम्ससाठी एकात्मिक सोल्युशन्स देखील प्रदर्शित केली जी एकमेकांपासून दूर राहून काम करत असलेल्या व्यक्तींमधील समन्वय वाढवतात. याशिवाय यावेळी अत्याधुनिक एलईडी डिस्प्ले सोल्युशन्स दाखवण्यात आली, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्वोत्तम व्हिज्युअल सुस्पष्टता मिळते, विविध प्रोफेशनल कामांसाठी ती वापरता येतात.
मॅक्सहब इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री पंकज झा यांनी सांगितले, “मुंबईमध्ये आमची सर्वात नवी उत्पादने सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कॉर्पोरेट आणि शैक्षणिक क्षेत्रात संवाद आणि समन्वय यामध्ये प्रगती घडवून आणण्याप्रती मॅक्सहबची बांधिलकी ही नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक उत्पादने दर्शवतात. आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान उत्पादने, सुविधा सादर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
विविध व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांच्या नवनवीन गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादने, सुविधा पुरवण्यासाठी मॅक्सहब सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या नवीन उत्पादनांमधून दिसून येते.