* राष्ट्रीय, जुलै २२, २०२४: माझा हा कोका-कोला इंडियाचा स्वदेशी मँगो बेव्हरेज ब्रँड भारतातील आवडत्या फळाला, तसेच ब्रँड चालना देत असलेल्या दिलदारीच्या उत्साहाला मानवंदना देत आहे. रविवारी दुपारच्या वेळी कुटुंबासोबत एकत्र मेजवानीचा आनंद घेण्यापासून सोशल गॅदरिंग्जपर्यंत माझाने नेहमी जुन्या आठवणींना जागृत केले आहे, ज्यामुळे अस्सल ज्यूसी आंब्यांचा स्वाद घेण्यासोबत नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत.
अस्सल हापूस आंब्यांपासून तयार करण्यात आलेल्या माझाच्या प्रत्येक बॉटलमध्ये या फळाचे सार समाविष्ट आहे, ज्यामधून पिढ्यानपिढ्या आंबाप्रेमींना आवडणाऱ्या फ्लेवरचा आस्वाद मिळतो. ब्रँड आंब्याचा सीझन नसताना देखील आंब्यांचा स्वाद देण्याप्रती समर्पित आहे, जेथे हा वर्षभर आंबाप्रेमींना आंब्याचा स्वाद देतो. याच कारणामुळे माझा म्हणजे अस्सल आनंद असे सर्वांचे मत आहे. या नावाचा हिंदीमध्ये अर्थ ‘आनंद’ असा होतो, ज्यामधून प्रत्येक थेंबामधून आनंदी, रिफ्रेशिंग स्वादाची खात्री मिळते.
१९७६ मध्ये स्थापना झाल्यापासून माझा व्यक्तींच्या जीवनातील खास क्षणांमध्ये लोकप्रिय सोबती बनला आहे. पण, गेल्या काही वर्षांमध्ये ब्रँडने आपल्या अर्थपूर्ण मोहिमांच्या माध्यमातून आंब्यांच्या स्वादामध्ये सामावलेल्या उद्देशाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रवास देखील सुरू केला आहे. माझाच्या ‘दिलदारी’ मोहिमा दिलदारीच्या कालातीत तत्त्वासह आंब्यांचा अद्वितीय स्वाद देतात, ज्यामधून आपल्याला साध्या नात्यांमधील खासियतीची आठवण होते.
मँगो डे आणि माझाच्या वारसाबाबत सांगताना कोका-कोला इंडिया येथील विपणनाचे संचालक अजय कोनाले म्हणाले, “माझा ब्रँडपेक्षा अधिक आहे, ते पेय आहे, जे लाखो भारतीयांना आनंद देते. पाच दशकापासून हा ब्रँड व्यक्तींना अस्सल आंब्यांचा स्वाद देत आहे. यंदा मँगो डे निमित्त कोका-कोला इंडिया अर्थपूर्ण व हृदयस्पर्शी संबंधांना चालना देत सकारात्मकतेचा प्रसार करण्यासाठी माझाचा उद्देश ‘दिलदारी’ला साजरे करत आहे.”
रिफ्रेशिंग सिपचा आस्वाद घेताना लक्षात ठेवा की माझा जीवन, प्रेम आणि आपण शेअर करणाऱ्या गोड क्षणांचे सेलिब्रेशन आहे.