maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

IMDb द्वारे 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा

मुंबई, भारत— 23 जुलै 2024— IMDb (www.imdb.com), ह्या मूव्हीज, टीव्ही‌ आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज 2024 च्या सर्वांत लोकप्रिय (आजवरच्या) व उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतिक्षीत भारतीय चित्रपटांच्या नावांची घोषणा केली. काय शोधावे व काय बघावे, ह्यासाठी IMDb वर येणार्‍या जगभरातील IMDb च्या दर महिन्यामधील 25 कोटींहून अधिक विझिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजवर ह्या याद्या आधारित आहेत.

वर्षातील आत्तापर्यंत क्र. 1 वर असलेल्या कल्की 2898- एडी चे दिग्दर्शक नाग अश्विन ह्यांनी म्हंटले, “IMDb यादीमध्ये येणे हा आमच्या संपूर्ण टीमसाठी मोठ्या आनंदाची‌ व गौरवाची बाब आहे. मला वाटते की, जगभरातील प्रेक्षकांचे प्रेम त्याद्वारे आम्हांला मिळत आहे. त्यामुळे आम्हांला आमच्या मर्यादांच्या पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.”

2024 मधील आत्तापर्यंत क्र. 2 वरील भारतीय चित्रपट असलेल्या मंजुमेल बॉयजचे दिग्दर्शक चिदंबरम ह्यांनी म्हंटले, “मंजुमेल बॉयज ही मैत्रीची व सर्व्हायव्हलची‌ रोमांचक गाथा आहे व विपरित परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याची जागतिक थीम त्यामध्ये आहे. चित्रपटाची व्हिज्युअल प्रकारे सादर केलेली कहाणी भाषांच्या सीमांच्या पलीकडे जाते व कहाणी जगभरातील प्रेक्षकांपुढे उलगडते. हा चित्रपट माझ्या हृदयाशी अतिशय जवळचा आहे आणि श्रोत्यांचा त्याला मिळणारा प्रतिसाद व प्रेम मला खरोखर नतमस्तक करते. ह्या बहुमानासाठी मी IMDb ला धन्यवाद देतो व इतके प्रेम व आपुलकी दिल्याबद्दल जगभरातील दर्शकांबद्दल मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. ह्या चित्रपटातील जादू जीवंत करणार्‍या संपूर्ण कलाकार व सहकार्‍यांचे परिश्रम व मेहनतीचा हा पुरावा आहे.”

“IMDb च्या डेटावरून असे दिसते की, भारतातील व जगभरातील दर्शकांना नावीन्यपूर्ण व परिणाम घडवून आणणार्‍या चित्रपटांची भुरळ पडत आहे. 2024 मधील (आत्तापर्यंतचे) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी आहेत व त्यात पाच हिंदी चित्रपट आहेत, तीन मल्याळम व दोन तेलुगू चित्रपट आहेत. भाषा कोणतीही असली तरी थरारक कहाण्यांकडे प्रेक्षक आकर्षित होत असल्याचा हा पुरावा आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडिया ह्यांनी म्हंटले. “पुढे जाणार्‍या भागांची मोठी मागणी दाखवणार्‍या सर्वांत बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी पाच हे प्रसिद्ध फ्रँचायजीचे सीक्वेल्स किंवा भाग आहेत व त्यामध्ये पुष्पा: द रूल – पार्ट 2 (क्र. 1), वेलकम टू द जंगल (क्र. 3), सिंघम अगेन (क्र. 6), भूल भुलैया 3 (क्र. 7), आणि स्त्री 2 (क्र. 10) हे आहेत.”

2024 मधील सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपट (आत्तापर्यंतचे)
1. कल्की 2898 – एडी
2. मंजुमेल बॉयज
3. फायटर
4. हनुमान
5. शैतान
6. लापता लेडीज
7. आर्टीकल 370
8. प्रेमालू
9. आवेशम
10. मुंज्या
भारतामध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 पर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांमधील हे असे असे चित्रपट आहेत ज्यांना किमान 10,000 व्होटस मिळाले आहेत व ज्यांचे IMDb युजर रेटींग 6 किंवा त्याहून अधिक आहे आणि ही शीर्षके IMDb ग्राहकांसाठी सातत्याने लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या 25 कोटी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार ही शीर्षके प्रसिद्ध ठरली आहेत.

उरलेल्या वर्षातील सर्वांत बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट
1. पुष्पा: द रूल- पार्ट 2
2. देवारा पार्ट 1
3. वेलकम टू द जंगल
4. द ग्रेटेस्ट ऑफ ऑल‌ टाईम
5. कंगुवा
6. सिंघम अगेन
7. भूल भुलैया 3
8. थंगालन
9. औरों में कहा दम था
10. स्त्री 2

उरलेल्या वर्षामध्ये रिलीज होण्याचे नियोजन असलेल्या भारतीय चित्रपटांमध्ये, ही शीर्षके 1 जानेवारी 2024 ते 10 जुलै 2024 मध्ये सातत्याने IMDb ग्राहकांमध्ये लोकप्रिय होती व जगभरात IMDb वर असलेल्या कोट्यवधी मासिक व्हिजिटर्सच्या वास्तविक पेज व्ह्यूजनुसार हे निर्धारित झाले.

उल्लेखनीय आहे की, दीपिका पदुकोन, दिशा पटानी आणि अजय देवगण हे ह्या दोन्ही याद्यांशी‌ संबंधित आहेत. पदुकोन आणि पटानी कल्की 2898- एडी मध्ये आहेत तर पदुकोन फायटरमध्येसुद्धा आहे. देवगन शैतानमध्ये आहे. पदुकोन आणि देवगन पहिल्यांदाच ह्या वर्षी रिलीज होणार्‍या सिंघम अगेनमध्ये एकत्र काम करताना दिसतील. पटानीच्या येणार्‍या रिलीजेसमध्ये वेलकम टू द जंगल आणि कंगुवा हे आहेत.

2024 मधील (आत्तापर्यंतच्या) सर्वांत प्रसिद्ध भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा.

उरलेल्या वर्षामधील सर्वांत बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हा व्हिडिओ पाहा व पूर्ण यादी इथे वाचा.

IMDb ग्राहक ह्या व लक्षावधी अन्य प्रसिद्ध चित्रपट व वेब सिरीजना त्यांच्या व्यक्तिगत वॉचलिस्टमध्ये https://www.imdb.com/watchlist इथे जोडू शकतात. ते काय बघत आहेत, ह्यावर ट्रॅक करण्यासाठी IMDb वॉचलिस्टच्या फीचरमुळे ग्राहक सहजपणे त्यांना ज्या बघायच्या आहेत त्या मूव्हीज व वेब सिरीजची एक व्यक्तिगत यादी सहजपणे तयार करू शकतात. ग्राहक त्यांच्या वॉचलिस्टला IMDb रेटिंग, प्रसिद्धी व इतर प्रकारे सॉर्टही करू शकतात.

Related posts

नेस्ले इंडिया साजरी करत आहे प्रोजेक्ट हिलदारीची पाच वर्षे

Shivani Shetty

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Shivani Shetty

कोटककडून फक्‍त यूएई प्रवाशांसाठी फाल्‍कन फॉरेक्‍स कार्ड लाँच

Shivani Shetty

Leave a Comment