maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील ९८ टक्‍के व्‍यवसाय प्रमुख जलदपणे एआयचा अवलंब करत आहेत, पण कुशल टॅलेंट सापडणे आव्‍हानात्‍मक ठरत आहे: लिंक्‍डइन

भारत, फेब्रुवारी २७, २०२५:* दोन वर्षांमध्‍ये जनरेटिव्‍ह एआय चर्चेच्‍या विषयावरून व्‍यवसायासाठी आवश्‍यक बनले आहे, जेथे भारतभरातील प्रमुख जनरेटिव्‍ह एआयच्‍या क्षमतेचा अवलंब करत आहेत. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइन (LinkedIn)ने केलेल्‍या नवीन संशोधनानुसार, भारतातील ९८ टक्‍के व्‍यवसाय प्रमुख म्‍हणतात की, २०२५ मध्‍ये ते त्‍यांच्‍या कंपन्‍यांना जलदपणे एआयचा अवलंब करण्‍यास मदत करण्‍याला धोरणात्‍मक प्राधान्‍य देत आहेत. पण, योग्‍य कौशल्‍ये असलेल्‍या टॅलेंटचा शोध घेणे अजूनही आव्‍हानात्‍मक आहे.

*भारतातील ५ पैकी जवळपास ३ रिक्रूटर्सना एआय व मानवी कौशल्‍याचे योग्‍य संयोजन शोधणे आव्‍हानात्‍मक आहे*
लिंक्‍डइन संशोधनामधून निदर्शनास येते की, भारतातील ६४ टक्‍के एचआर प्रोफेशनल्‍स सांगतात की त्‍यांना मिळालेल्‍या अर्जांपैकी फक्‍त अर्धे किंवा अर्ध्‍याहून कमी रोजगारासाठी केलेले अर्ज सर्व आवश्‍यक व प्राधान्‍य पात्रतांची पूर्तता करतात. योग्‍य टेक्निकल (६१ टक्‍के) व सॉफ्ट स्किल्‍स (५७ टक्‍के) असलेले उमेदवार शोधणे त्‍यांच्‍यासाठी सर्वात मोठे हायरिंग आव्‍हान आहे. भारतात सापडणे आव्‍हानात्‍मक असलेल्‍या कौशल्‍यांमध्‍ये टेक्निकल/आयटी कौशल्‍यांचा समावेश आहे, जसे सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट, इंजीनिअरिंग (४४ टक्‍के), एआय कौशल्‍ये (३४ टक्‍के) आणि कौशल्‍ये, जसे कम्‍युनिकेशन व समस्‍या निवारण (३३ टक्‍के).

*कंपन्‍या २०२५ मध्‍ये ‘निवडक हायरिंग’ला प्राधान्‍य देत आहेत*
भारतातील एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, त्‍यांना पदासाठी योग्‍य नसलेल्‍या उमेदवारांकडून (४१ टक्‍के) अनेक अर्ज (४७ टक्‍के) मिळतात आणि २०२५८ मध्‍ये अधिक बारकाईने हायरिंग करत आहेत. भारतातील अर्ध्‍याहून अधिक एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की ते रोजगारासाठी आवश्‍यक पात्रतांपैकी ८० टक्‍के किंवा त्‍याहून अधिक पात्रतांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांशी संपर्क साधण्‍याचा (५५ टक्‍के) त्‍यांना हायर करण्‍याचा (५४ टक्‍के) विचार करतील.

*लिंक्‍डइनच्‍या टॅलेंट अँड लर्निंग सोल्‍यूशन्‍सच्‍या भारतातील कंट्री हेड रूची आनंद* (Ruchee Anand, India Country Head, Talent & Learning Solutions, LinkedIn) म्‍हणाल्‍या, “एआय आमच्‍या हायर करण्‍याच्‍या आणि टॅलेंटला निपुण करण्‍याच्‍या पद्धतींना नवीन आकार देत आहेत, पण एआयचा अवलंब करणे पुरेसे नाही, तर व्‍यवसायासाठी ते कामी येणे देखील महत्त्वाचे आहे. अनेकदा, कंपन्‍या त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्‍यासाठी योग्‍य टॅलेंट नसताना देखील एआय टूल्‍समध्‍ये संसाधनांचा उपयोग करतात, ज्‍यामुळे गेम-चेंजिंग संधी चुकते. या चक्राला मोडण्‍यासाठी व्‍यवसायांनी स्किल्‍स-फर्स्‍ट मानसिकतेसह हायरिंगचा विचार केला पाहिजे, कारण एआय टूल नाविन्‍यता, मानवी कौशल्‍ये जसे सर्जनशीलता, कम्‍युनिकेशन व सहयोग यांना अनलॉक करेल, ज्‍यामुळे कंपन्‍यांना परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यास मदत होईल.”

*प्रमुख त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाचे अपस्किलिंग करण्‍यावर अधिक भर देत आहेत*
भारतातील १० पैकी ८ हून अधिक (८४ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की नियोक्‍त्‍यांनी २०२५ साठी नवीन कौशल्‍ये निर्माण करण्‍याला प्राधान्‍य दिले पाहिजे, जेथे एआय (८४ टक्‍के) आणि आवश्‍यक सॉफ्ट स्किल्‍स जसे कम्‍युनिकेशन व सहयोग (८२ टक्‍के) यामध्‍ये अपस्किल करण्‍यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. भारतातील सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या सर्व (१०० टक्‍के) एलअँडडी प्रोफेशनल्‍सनी या भावनेप्रती सहमती दाखवली आहे, तसेच त्‍यांनी मान्‍य केले की सॉफ्ट स्किल्‍स (जसे सर्जनशीलता, जिज्ञासूपणा व कम्‍युनिकेशन) टेक्निकल कौशल्‍याइतकेच महत्त्वपूर्ण बनत आहेत. भारतातील जवळपास अर्धे (४८ टक्‍के) प्रमुख म्‍हणतात की, एआय प्रशिक्षणासाठी अध्‍ययन व विकासामध्‍ये गुंतवणूक करणे अवलंबतेला चालना देण्‍यासाठी महत्त्वाचे असेल.

*लिंक्‍डइन रिक्रूटर्सना त्‍यांच्‍या सर्वात प्रभावी कामावर अधिक वेळ व्‍यतित करण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन एआय-समर्थित टूल्‍स लाँच करत आहे*
कंपन्‍या जबाबदार आर्थिक लँडस्‍केपचा सामना करत असताना लिंक्‍डइन रिक्रूटर्सना त्‍यांच्‍या रोजगाराकरिता सर्वात धोरणात्‍मक, कर्मचारी-केंद्रित कामांवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत करण्‍यासाठी नवीन एआय-समर्थित टूल्‍स लाँच करत आहे:

● भारतातील ५ पैकी जवळपास २ (३७ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स दररोज १ ते ३ तास रोजगारासाठी केलेल्‍या अर्जांची तपासणी करतात आणि ५ पैकी ३ हून अधिक (६४ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍सचा विश्‍वास आहे की, एआय-समर्थित टूल्‍स हायरिंग प्रक्रिया जलद व सोपी करू शकतात. लिंक्‍डइनचे नवीन हायरिंग असिस्‍टण्‍ट (LinkedIn’s new Hiring Assistant) रिक्रूटर्सना सतत करावे लागणारे, वेळखाऊ काम सोपे करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांच्‍या सर्वात प्रभावी कामावर अधिक वेळ व्‍यतित करू शकतील, जसे हायरिंग मॅनेजर्सना सल्‍ला देणे, उमेदवारांशी कनेक्‍ट होणे आणि उमेदवारांना अपवादात्‍मक अनुभव देणे. “मला पात्र उमेदवारांची जलद होणारी निवड प्रक्रिया उत्तम वाटते आणि विश्‍वास आहे की, लिंक्‍डइनचे हायरिंग असिस्‍टण्‍ट टीमच्‍या उत्‍पादकतेमध्ये अधिक सुधारणा करत राहिल,” असे आयबीएमचे ग्‍लोबल टॅलेंट अॅट्रॅक्‍शन लीडर सचिन बोर्डे (Sachin Borde, Global Talent Attraction Leader, IBM) म्‍हणाले.

● भारतातील १० पैकी ७ (७१ टक्‍के) एचआर प्रोफेशनल्‍स खास डिझाइन केलेली लर्निंग संसाधने उपलब्‍ध होण्‍यामध्‍ये अडथळा येत असल्‍याचे सांगतात. लिंकडइन लर्निंगचे नवीन एआय-समर्थित कोचिंग वैशिष्‍ट्य लर्नर्सना मजकूर किंवा आवाजाचा उपयोग करत परस्‍परसंवादी, वास्‍तविक विश्‍वातील स्थितींच्‍या माध्‍यमातून सॉफ्ट स्किल्‍स अवगत करण्‍यास मदत करते. हे वैशिष्‍ट्य त्‍यांना कामगिरीचे पुनरावलोकन व अभिप्रायाबाबत चर्चा अशा कामाच्‍या ठिकाणी केलेल्‍या जाणाऱ्या संवादांमध्‍ये आत्‍मविश्‍वास मिळवण्‍यास मदत करते आणि लर्नर्सना प्रत्‍येक सराव सत्राच्‍या शेवटी कृतीशील, वैयक्तिकृत अभिप्राय मिळतो. येथे (here) अधिक माहिती वाचा.

Related posts

टाटा मोटर्स ने अपनी मिड-एसयूवी कर्व को 9.99 लाख रुपये में लॉन्‍च किया

Shivani Shetty

टाटा पॉवर रिन्‍यूएबल एनर्जी आणि टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक व्‍यावसायिक वाहनांकरिता २०० फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स उभारण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केल्‍या

Shivani Shetty

कोटक अॅक्टिव्‍हमनीकडून #SalaryKoJagao मोहिम लाँच

Shivani Shetty

Leave a Comment