गुरूग्राम, भारत – जुलै २२, २०२४: भारत जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे आणि सॅमसंगसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, असे साऊथ कोरियन प्रमुख कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे वरिष्ठ कार्यकारी म्हणाले. भारतात विक्री करण्यात आलेल्या जवळपास ८० टक्के स्मार्टफोन्सची किंमत ३०,००० रूपयांपेक्षा कमी आहे, पण अधिकाधिक ग्राहक प्रीमियम स्मार्टफोन्सचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे फोल्डेबल्स सारख्या सर्वोत्तम उत्पादनांच्या विकासाला गती मिळत आहे.
“भारतीय बाजारपेठ फोल्डेबल्स अपवादात्मकरित्या वाढत असलेल्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामध्ये गॅलॅक्सी फोल्डेबल्सना अधिक प्राधान्य दिले जात आहे. आम्हाला यंदा बाजारपेठेत मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, तसेच आम्हाला भारतातील ग्राहक नवीन गॅलॅक्सी झेड फ्लिप६ आणि गॅलॅक्सी झेड फोल्ड६ चा अवलंब करण्याची देखील अपेक्षा आहे, जेथे या स्मार्टफोन्समध्ये गॅलॅक्सी एआयचा समावेश करण्यात आला आहे, जे फोल्डेबल्ससाठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाइल एक्स्पेरिअन्स बिझनेसचे अध्यक्ष व प्रमुख टीएम रोह म्हणाले.
सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच केले, ज्यांना भारतात उत्तम सुरूवात मिळाली आहे, जेथे फक्त २४ तासांमध्ये फोल्डेबल्सच्या मागील जनरेशनच्या तुलनेत ४० टक्के उच्च प्री-ऑर्डर्सची नोंद झाली आहे. सिक्स्थ जनरेशन गॅलॅक्सी फोल्डेबल्समध्ये सॅमसंगचे एआय टूल्सचे सूट गॅलॅक्सी एआयची शक्ती आहे, जे संवादांमधील व्यत्ययांना दूर करण्यास मदत करते आणि ग्राहकांची सर्जनशीलता व उत्पादनक्षमतेला नव्या उंचीवर घेऊन जाते.
टीम रोह म्हणाले, सॅमसंग मोठ्या पद्धतीने मोबाइल एआयचे लोकशाहीकरण करत आहे आणि या वर्ष अखेरपर्यंत २०० मिलियन गॅलॅक्सी डिवाईसेसमध्ये गॅलॅक्सी एआयचा समावेश करण्याची योजना आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ सुधारित फोल्डेबल डिझाइन्स व ऑप्टिमाइज केलेले गॅलॅक्सी एआय असलेले सर्वात शक्तिशाली गॅलॅक्सी एआय फोल्डेबल्स आहेत, असे ते म्हणाले.
सॅमसंगने डिस्प्लेला अधिक प्रबळ केले आहे आणि नवीन फोल्डेबल्ससह टिकाऊपणाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. तसेच सॅमसंगने सर्वोत्तम गेमिंग अनुभव व अधिक बॅटरी क्षमतेसाठी हिट डिसिपेशन रचना देखील सुधारली आहे, ज्यामुळे नवीन झेड फ्लिप६ एका चार्जमध्ये दीर्घकाळापर्यंत कार्यरत राहू शकतो.
सॅमसंगने नवीन स्मार्टवॉचेस् आणि टीडब्ल्यू डिवाईसेस – गॅलॅक्सी बड्स३ व बड्स३ प्रो देखील लाँच केले आहेत, ज्यामध्ये नवीन डिझाइन आहे.
“या वर्षी, पहिल्यांदाच आमही गॅलॅक्सी एआयच्या अनुभवाला आरोग्यसेवेमध्ये विस्तारित केले. नवीन गॅलॅक्सी वॉच अल्ट्रा आणि वॉच७ मध्ये नवीन बायोअॅक्टिव्ह सेन्सर आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या आरोग्य-संबंधित सूचकांवर देखरेख ठेवू शकतात आणि आरोग्यदायी व सर्वोत्तम जीवन जगू शकतात,” असे टीएम रोह म्हणाले.
त्यांनी सॅमसंगच्या नोएडा व बेंगळुरू आरअॅण्डडी सेंटर्सचे देखील कौतुक केले. ते म्हणाले, भारतातील इंजीनिअर्सनी गॅलॅक्सी एआय आणि प्रमुख उत्पादनांच्या विकासासाठी योगदान दिले आहे.