maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इझमायट्रिपची इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक

मुंबई, २९ डिसेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन टेक ट्रॅव्‍हल प्‍लॅटफॉर्मने नुकतेच बीएसई सूचीबद्ध कंपनी इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्‍ये जवळपास १३ टक्‍क्‍यांचा हिस्‍सा संपादित केला आहे.

इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेड हॉटेल व आदरातिथ्‍य उद्योगामध्‍ये कार्यरत आहे आणि इझमायट्रिपच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍याप्रती कटिबद्धतेशी संलग्‍न आहे. या धोरणात्‍मक गुंतवणूकीचा मुख्‍य उद्देश अल्‍पसंख्‍यांकांचे हित संपादित करण्‍याचा आणि आदरातिथ्‍य क्षेत्रात पर्यावरणास अनुकूल पद्धतींना चालना देण्‍याचा आहे. येथे नमूद करता येऊ शकते की इको हॉटेल्‍सद्वारे संचालित सर्व हॉटेल्‍स कार्बन निव्‍वळ शून्‍य हॉटेल्‍स असतील.

हा सहयोग दोन्‍ही कंपन्‍यांमध्‍ये समन्‍वय स्‍थापित करण्‍याच्‍या संधी देखील देतो. दोन्‍ही कंपन्‍या सहकार्याच्‍या विविध क्षेत्रांवर चर्चा करत आहेत. हॉटेल कार्यसंचालन व्‍यवसायाव्‍यतिरिक्‍त इको हॉटेल्‍स इझमायट्रिप डॉटकॉमच्‍या व्‍यासपीठावरील ग्राहकांसाठी आणि त्‍यांच्‍या उपकंन्‍यांसाठी एअर व नॉन-एअर व्‍यवसायाचे देखील कार्यसंचालन पाहू शकतात.

इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी निशांत पिट्टी म्‍हणाले, “आम्‍हाला आमच्‍या सहयोगाची आणि इको हॉटेल्‍स अँड रिसॉर्ट्स लिमिटेडमध्‍ये भागभांडवल गुंतवणूक करण्‍याच्‍या धोरणात्‍मक निर्णयाची घोषणा करताना आनंद होत आहे. यामधून इझमायट्रिपची शाश्‍वतता आणि जबाबदार व्‍यवसाय पद्धतींप्रती कटिबद्धता दिसून येते. भागभांडवलांमध्‍ये गुंतवणूक करण्‍याचा आमचा निर्णय पर्यावरणास अनुकूल व हरित हॉटेल्‍सच्‍या विकासामध्‍ये सकारात्‍मक योगदान देण्‍याप्रती आमच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. ही गुंतवणूक आमच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये विविधता आणण्‍यासाठी आणि आम्‍ही ग्राहकांना देणाऱ्या प्रवास अनुभवामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी आमच्‍या प्रवासामधील आणखी एक महत्त्वाचा टप्‍पा आहे. पर्यावरणदृष्‍ट्या जागरूकता उपक्रमांना चालना देत आमचा प्रवास व आदरातिथ्‍य उद्योगाच्‍या भवितव्‍याला सकारात्‍मकपणे आकार देण्‍याचा मनसुबा आहे.”

Related posts

दूरसंचार उद्योगामध्ये मनुष्यबळ वाढीचा दर मंदावला: टीमलीज

Shivani Shetty

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Shivani Shetty

हाऊसिंगडॉटकॉम इझीलोनमध्‍ये गुंतवणूक करणार

Shivani Shetty

Leave a Comment