maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

आंतरराष्ट्रीय ऑन्कोलॉजिस्टना ‘प्रोटॉन बीम थेरपी’ प्रशिक्षण देणारा भारत पहिला देश

नवी मुंबई, २२ मार्च २०२४: अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर (एपीसीसी) हे दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वेतील पहिले आणि सर्वात मोठे प्रोटॉन थेरपी केंद्र असून आता जागतिक आरोग्य सेवेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. बेल्जियम-स्थित आयबीए च्या सहकार्याने, जगात प्रोटॉन थेरपीमध्ये अग्रगण्य असलेल्या एपीसीसी ने पीबीटी वरील प्रशिक्षण कार्यक्रमांच्या मालिकेत, इंडोनेशिया आणि व्हिएतनाममधील प्रख्यात डॉक्टरांच्या पहिल्या बॅचला प्रशिक्षण देण्याचे कार्य नुकतेच पूर्ण केले. अभिमानाची बाब म्हणजे, या उपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय ऑन्कोलॉजिस्टसाठी विशेष प्रोटॉन बीम थेरपी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणारा भारत हा दक्षिणपूर्व आशियातील पहिला देश ठरला आहे. पीबीटी मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणारे पहिले भारतीय कर्करोग केंद्र असल्याने, एपीसीसी सहयोगी-कर्करोगाच्या उपचारात एक नवीन अध्याय रचत आहे आणि ज्ञानाची देवाणघेवाण करत आहे, कझाकस्तान, मलेशिया, स्लोव्हेनिया आणि फिलीपिन्समधील कर्करोग तज्ञांसाठी तत्सम प्रशिक्षण लवकरच प्रदान करण्यात येणार आहे.

एच.ई.श्री.डिडिएर वॅन्डरहॅसेल्ट, बेल्जियमचे भारतातील राजदूत, कार्यक्रम प्रमुख पाहुणे, या प्रसंगी म्हणाले,“बेल्जियम आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर, आरोग्य सेवेत अग्रगण्य प्रगती झाली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की यामध्ये आमचे मोलाचे सहकार्य आहे. कर्करोगाच्या उपचारांमध्ये नावीन्य आणि उत्कृष्टता निर्माण करणाऱ्या उपक्रमांना पाठिंबा देताना बेल्जियमला आनंद वाटत आहे.” सोबतच प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ.गुयेन थी मिन्ह ह्यू, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, चो रे हॉस्पिटल, व्हिएतनाम, डॉ.फेब्रिओनो बसुकी राहर्जो, एचओडी-रेडिएशन ऑन्कोलॉजी, धर्माईस नॅशनल कॅन्सर सेंटर, इंडोनेशिया आणि डॉ.प्रीथा रेड्डी, कार्यकारी उपाध्यक्षा, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस लिमिटेड उपस्थित होत्या.

Related posts

HMD ग्लोबल तर्फे आकर्षक डिझाइन आणि यूपीआय पेमेंट सुविधेसह ९९९ रुपयांपासून नोकिया 105 क्लासिक सादर

Shivani Shetty

सॅमसंगकडून ११ किग्रॅ एआय इकोबबलTM फुली ऑटोमॅटिक फ्रण्‍ट लोड वॉशिंग मशिन्‍सची नवीन श्रेणी लाँच, जी जवळपास ७० टक्‍क्‍यांपर्यंत वीजेची बचत करते, ५० टक्‍के कमी वॉश टाइम आणि ४५.५ टक्‍के सर्वोत्तम फॅब्रिक केअर देते

Shivani Shetty

एल्‍गीचा मियामी, फ्लोरिडामधील एअरलॅब फिटनेसच्‍या सिम्‍युलेटेड हाय-अॅल्टिट्यूड फिटनेस प्रशिक्षण सुविधेला पाठिंबा

Shivani Shetty

Leave a Comment