मुंबई, भारत – मार्च 22, २०२४ – सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स येथील डिवाईस ईएक्स्पेरिअन्स (डीएक्स) डिव्हिजनचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख जाँग-ही (जेएच) हॅन यांनी जिओ वर्ल्ड प्लाझा, मुंबई येथील सॅमसंग बीकेसी स्टोअरला सुरूवात झाल्यापासून पहिल्यांदाच भेट दिली. या स्टोअरमधून तंत्रज्ञान-प्रेमी ग्राहकांना एआय व हायपर कनेक्टीव्हीटी सेवा देत भारतातील बाजारपेठेप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते. त्यांनी ग्राहकांना टेलिव्हिजन्स व डिजिटल अप्लायन्सेसपासून स्मार्टफोन्सपर्यंत कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील सॅमसंगच्या नवीन एआय इनोव्हेशन्सचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित देखील केले.
”एआय पार्श्वभूमीमध्ये राहत व्यक्तींचे दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी कनेक्टेड तंत्रज्ञान सक्षम करेल. खुल्या सहयोगाच्या आमच्या मॉडेलसह आमची सर्व ग्राहकांसाठी एआय व हायपर-कनेक्टीव्हीटी सेवा लाँच करण्याची इच्छा आहे. भारत एआयसाठी भावी मोठी बाजारपेठ आहे आणि आमचे फ्लॅगशिप सॅमसंग बीकेसी स्टोअर आमच्या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाला सादर करते, तसेच ‘वन सॅमसंग’ला दाखवेल. स्टोअरच्या विविध झोन्समध्ये ग्राहक वास्तविकतेमधील आमचे एआय दृष्टिकोन पाहू शकतात आणि स्मार्टर, सर्वोत्तम एक्स्पेरिअन्सेस आपल्या जीवनाला कशाप्रकारे नव्या उंचीवर घेऊन जातील, याचा अनुभव घेऊ शकतात,” असे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स येथील डिवाईस ईएक्स्पेरिअन्स (डीएक्स) डिव्हिजनचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रमुख जाँग-ही (जेएच) हॅन म्हणाले.
या वर्षाच्या सुरूवातीला हॅन यांनी सीईएस येथे सॅमसंगच्या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाला सादर केले, ज्यामधून एआय व्यक्तींना अधिक सोईस्करपणे व सर्वोत्तमपणे त्यांच्या डिवाईसेसचा अनुभव घेण्यास सक्षम करेल हे दिसून येते. कंपनीच्या ‘एआय फॉर ऑल’ दृष्टिकोनाचा भाग म्हणून सॅमसंगने जानेवारीमध्ये त्यांच्या नवीन गॅलॅक्सी एस२४ स्मार्टफोन सिरीजमध्ये गॅलॅक्सी एआय लाँच केले.
हॅन म्हणाले की, भारत जागतिक स्तरावरील सर्वात मोठी व झपाट्याने विकसित होणारी बाजारपेठ आहे आणि सॅमसंगसाठी मोठी संधी देते.
”भारतात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान-प्रेमी तरूण ग्राहक आहेत, जे आम्हाला नाविन्यता आणण्यास प्रेरित करतात. हजारो तरूण व उद्योजक तरूण जगामध्ये एआय सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी आमच्या आरअँडडी सेंटर्समध्ये काम करतात,” असे हॅन म्हणाले.
सॅमसंगने नुकतेच कनेक्टेड लाइफस्टाइल एक्स्पेरिअन्स स्टोअर सॅमसंग बीकेसीचे उद्घाटन केले, जेथे ग्राहक ‘वन सॅमसंग’चा अनुभव घेऊ शकतात. यामधून सॅमसंगचे आधुनिक एआय इनोव्हेशन्स आणि ते कंपनीच्या कनेक्टेड डिवाईसेस इकोसिस्टमला कशाप्रकारे साह्य करतात हे दिसून येते.
कंपनी २८ वर्षांपासून भारतात कार्यरत आहे, जेथे १९९५ मध्ये कार्यसंचालनांना सुरूवात झाली होती. सॅमसंग दोन अत्याधुनिक उत्पादन प्लांट्स, तीन आरअँडडी सेंटर्स आणि एका डिझाइन सेंटरसह भारतासाठी दृढतेने कटिबद्ध आहे आणि यांच्या सर्व केंद्रांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत आहेत.
