maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

लिव्‍हप्‍युअरची पहिल्‍या सहामाहीत ७० टक्‍के वाढीची नोंद

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३: लिव्‍हप्‍युअर या भारतातील होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्‍ट्समधील आघाडीच्‍या ब्रॅण्‍डने आर्थिक वर्ष २४ च्‍या पहिल्‍या सहामाहीदरम्‍यान ई-कॉमर्स क्षेत्रात उल्‍लेखनीय ७० टक्‍के वाढीची अभिमानाने घोषणा केली आहे. यासह सर्वोत्तम ब्रॅण्‍डेड वॉटर प्‍युरिफायर्समधील अग्रणी म्‍हणून ब्रॅण्‍डचे स्‍थान अधिक दृढ झाले आहे. या उल्‍लेखनीय वाढीमधून लिव्‍हप्‍युअरची सर्वोत्तमता व ग्राहक समाधानाप्रती अविरत कटिबद्धता दिसून येते.

उत्‍सवी उत्‍साहासह लिव्‍हप्‍युअरने आर्थिक वर्षाच्‍या पहिल्‍या सहामाहीदरम्‍यान ५० टक्‍क्‍यांची प्रबळ वाढ केली, ज्‍यामधून बाजारपेठेतील ब्रॅण्‍डची स्थिरता व प्रबळता दिसून येते. वॉटर प्‍युरिफायर्स व निद्रा-संबंधित उत्‍पादनांचा समावेश असलेल्‍या ई-कॉमर्स क्षेत्रातील या उल्‍लेखनीय उपलब्‍धीमधून दर्जेदार सोल्‍यूशन्‍सचा शोध घेत असलेल्‍या ऑनलाइन ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यामधील लिव्‍हप्‍युअरची क्षमता निदर्शनास येते.

जनरल ट्रेडने देखील प्रबळ ४० टक्‍के वाढीसह घवघवीत यश संपादित केले, ज्‍यामुळे लिव्‍हप्‍युअरचे व्‍यापक अपील अधिक दृढ झाले आहे. तीन महिन्‍यांपूर्वी लाँच करण्‍यात आलेल्‍या चिमनी श्रेणीने फ्लिपकार्टवरील अव्‍वल चार श्रेणींमध्‍ये स्‍थान मिळवले, यामधून ग्राहकांकडून या श्रेणीला मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिसून येतेा.

लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल म्‍हणाले, “सणासुदीचा काळ आमच्‍यासाठी नेहमी महत्त्वाचा राहिला आहे आणि यंदा ई-कॉमर्स क्षेत्रात उल्‍लेखनीय ७० टक्‍क्‍यांच्‍या वाढीमधून ग्राहकांचा लिव्‍हप्‍युअरवर असलेला विश्‍वास सार्थ ठरला आहे. दर्जेदार वॉटर प्‍युरिफायर्स व संबंधित उत्‍पादने वितरित करण्‍यावरील आमच्‍या धोरणात्‍मक फोकसला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, ज्‍यामधून विविध विभागांमधील आमची प्रबळ कामगिरी दिसून येते.”

लिव्‍हप्‍युअरची नाविन्‍यता, दर्जा व ग्राहक समाधानाप्रती कटिबद्धता बाजारपेठेत कंपनीच्‍या प्रगतीला चालना देत आहे. ब्रॅण्‍ड आपला उत्‍पादन पोर्टफोलिओ वाढवण्‍यासह विविध माध्‍यमांवरील आपली उपस्थिती प्रबळ करत असताना लिव्‍हप्‍युअर ग्राहकांना विश्‍वसनीय वॉटर प्‍युरिफिकेशन सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

Related posts

रिषभ पंतच्‍या गाथेने सुरक्षित भविष्‍यासाठी एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम लाँच

Shivani Shetty

चौथ्‍या तिमाहीत हायरिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा: टीमलीज स्‍टाफिंग

Shivani Shetty

“ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेड: OOH जाहिरात उद्योगाचे भविष्य उजळवत”

Shivani Shetty

Leave a Comment