maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एचडीएफसी लाइफने ९९.५० टक्‍के क्‍लेम सेटलमेंट रेशिओ संपादित केला आणि आर्थिक वर्ष २४ साठी क्‍लेम्‍समध्‍ये १,५८४ कोटी रूपये देय दिले

मुंबई, जुलै २०२४: एचडीएफसी लाइफ या भारतातील आघाडीच्‍या आयुर्विमा कंपनीने सातत्‍याने उच्‍च क्‍लेम सेटलमेंट रेशिओसह पॉलिसीधारकांप्रती आपली कटिबद्धता कायम ठेवली आहे.
जीवन विमा (Life insurance) ही दीर्घकालीन कटिबद्धता आहे, जी पॉलिसीधारकाच्‍या मृत्‍य‍ूनंतर त्‍याच्‍या प्रियजनांना आर्थिक सुरक्षिततेची खात्री देते. जीवन विमा कंपनीची विश्‍वासार्हता म्‍हणजे खरे क्‍लेम्‍स त्‍वरित व कार्यक्षमपणे सेटल करण्‍याची तिची क्षमता. जीवन विमा कंपनीची निवड करताना ग्राहक कंपनीची विश्‍वासार्हता जाणून घेण्‍यासाठी अनेकदा क्‍लेम सेटलमेंट रेशिओ पाहतात.
एचडीएफसी लाइफ या क्षेत्रातील तिच्‍या कार्यक्षमतेसाठी खाजगी जीवन विमा कंपन्‍यांमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. आर्थिक वर्ष २४ मध्‍ये एचडीएफसी लाइफने एकूण ९९.५० टक्‍के* क्‍लेम सेटलमेंट रेशिओ (claim settlement ratio) संपादित केले, जेथे १९,३३८ पॉलिसींसाठी १,५८४ कोटी रूपये वितरित करण्‍यात आले. रिटेल क्‍लेम्‍समध्‍ये आर्थिक वर्ष २२ मधील ९८.६६ टक्‍के आणि आर्थिक वर्ष २३ मधील ९९.३९ टक्‍के इतके रेशिओज संपादित केल्‍यानंतर हा सर्वोच्‍च रेशिओ संपादित करण्‍यात आला आहे.
*आर्थिक वर्ष २४ साठी लेखापरीक्षित वार्षिक आकडेवारीनुसार पॉलिसींच्‍या संख्‍यांना अनुसरून वैयक्तिक मृत्‍यू क्‍लेम सेटमेंट रेशिओ.
क्‍लेम सबमिशनची सुविधा देण्‍यासाठी एचडीएफसी लाइफ प्रबळ यंत्रणा देते, ज्‍यामुळे दावेदारांना विविध मीडिया/टचपॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून आवश्‍यक कागदपत्रे विनंती करण्‍यासोबत सबमिट करता येतात, तसेच अशा सेवा आवश्‍यकतांसाठी प्रत्‍यक्ष शाखेला भेट देण्‍याची गरज भासत नाही. एचडीएफसी लाइफ ग्राहकांना आरोग्‍यासंदर्भात संपूर्ण प्रकटीकरणाचे महत्त्व आणि क्‍लेम प्रक्रियेवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्‍याही प्रत्‍यक्ष माहितीबाबत जागरूक देखील करते. पॉलिसी सुरू झाल्‍याच्‍या तारखेपासून तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्‍या वैयक्तिक क्‍लेम्‍ससाठी कंपनी सेम-डे सेटलमेंट सेवा देते, ज्‍यासाठी सर्व आवश्‍यक कागदपत्रे सादर करावी लागतात आणि कोणतीही अधिक चौकशी केली जात नाही.
याबाबत मत व्‍यक्‍त करत एचडीएफसी लाइफच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विभा पडळकर म्‍हणाल्‍या, ”क्‍लेम सेटलमेंट आमच्यासाठी महत्त्वपूर्ण सर्विस डिफरेन्शिएटर आहे. आम्‍ही प्रत्‍येक पॉलिसीधारकाला क्‍लेम्‍स सुलभपणे व कार्यक्षमपणे सेटल होण्‍याचे वचन देतो. आम्‍ही पॉलिसी जीवनचक्राच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर उच्‍च दर्जाची सेवा देण्‍याप्रती समर्पित आहोत, ज्‍यामधून भारतीयांना आर्थिकदृष्‍ट्या सुरक्षित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
या वर्षाच्‍या सुरूवातीला एचडीएफसी लाइफने आपल्‍या एप्रिल २०२४ बोर्ड मीटिंगदरम्‍यान सहभागी प्‍लॅन्‍सवर ३,७२२ कोटी रूपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्‍च बोनस जाहीर केला. हा बोनस मॅच्‍युरिटी बेनीफिट्स किंवा कॅश बोनससाठी पात्र असलेल्‍या पॉलिसींमध्‍ये, तसेच भविष्‍यात पॉलिसी मॅच्‍युरिटी, मृत्‍यू किंवा सरेंडरनंतर देय असलेल्‍या पॉलिसींमध्‍ये विभागण्‍यात आला आहे.

Related posts

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Shivani Shetty

कौशल्यवाढीसाठी मोंडेलेझ इंडियाचाएनएसडीसीसोबत करार

Shivani Shetty

शार्क टँक: फ्लेक्‍झीफायमीने १ कोटी रूपयांची गुंतवणूक संपादित केली

Shivani Shetty

Leave a Comment