नवी मुंबई, 27 मे 2024: अत्यंत अभिमानाने अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई (AHNM) महाराष्ट्रासाठी अत्याधुनिक 5G कनेक्टेट ॲम्ब्युलंस सेवा सादर करीत आहेत, याची सुरुवात जागतिक आपत्काल दिवस, म्हणजेच 27 मे 2024 रोजी होणार आहे. हा फक्त तांत्रिकदृष्ट्या नवल आहे असे नाही, तर हा मदतीचा हात आहे. याने अत्यंत महत्त्वाच्या वेळी, जेव्हा प्रत्येक क्षण जीवन आणि मृत्यूमधील फरक म्हणवला जातो, अशा वेळी अधिक जलद, रीअल-टाइममध्ये मेडिकल मदत मिळू शकेल.
आपत्कालीन प्रतिक्रियेचे रूपांतरण:- AHNM यांच्या 5G ॲम्ब्युलंसमध्ये अत्याधुनिक मेडिकल उपकरणे, रुग्णांची निगा ठेवण्यासाठी मॉनिटरिंग ॲप्लिकेशन आणि टेलीमेट्रीची उपकरणे आहेत जी रीअल-टाइम मध्ये आरोग्यासंबंधी महत्त्वाचा डेटा हॉस्पिटलला पाठवतात. या ॲम्ब्युलंसमध्ये अतिशय जलद 5G नेटवर्कसोबत कनेक्ट असेलेला कॅमेरा असतो ज्याने डॉक्टर रुग्णांना पाहू शकतात आणि रस्त्यामध्ये काय प्रक्रिया करायच्या हे पॅरामेडिक्सना सांगू शकतात.
5G ॲम्ब्युलंस सेवेची प्रमुख वैशिष्ट्ये: अतिशय जलद अशा 5G नेटवर्कमुळे ॲम्ब्युलंस आणि हॉस्पिटलच्या कमांड सेंटरच्या दरम्यान सतत संवाद सुरू असतो. अशाने रुग्णाच्या आरोग्यासंबंधी माहिती रीअल-टाइममध्ये हॉस्पिटलला मिळत असते ज्याने डॉक्टर वेळीच योग्य निर्णय घेऊ शकतात आणि रुग्णाच्या आगमनाची तयारी करू शकतात. रीअल-टाइम कॅमेरा फीडमुळे हॉस्पिटलच्या ईआरमधील तज्ञ डॉक्टर पॅरामेडिक्सना लांबूनच निर्देश देऊ शकतात ज्याने रस्त्यामध्ये करता येणाऱ्या प्रक्रिया लगेच केल्या जाऊ शकतात.
सामुदायिक उपक्रम आणि प्रशिक्षण:- सामुदायिक आरोग्यासाठी आणि आपत्कालीन तयारी असण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. AHNM यांनी 500 पेक्षा अधिक स्थानिक समुदायांसोबत काम केलेले असून दर वर्षी साधारण 150 गतिविधी आम्ही करत असतो, ज्यात ईआर जागरूकतेचे 15 कार्यक्रम आहेत. आमचे हॉस्पिटल आपत्कालीन नंबर 1066 याचा प्रचार करते आणि 30 किलोमीटरच्या परिसरात विनामूल्य ॲम्ब्युलंस सेवा देते.
डॉ. नितिन जगासिया, क्षेत्रीय संचालक-आपत्कालीन (पश्चिम क्षेत्र), अपोलो हॉस्पिटल्स यांनी सांगितले,“अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई येथील आपत्कालीन मेडिकल सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन विचार वापरून सर्वोत्कृष्ट आपत्कालीन सेवा देण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. ही 5G कार्डियॅक ॲम्ब्युलंस यासाठीच असलेले नवीनतम उपकरण आहे. ॲम्ब्युलंसमध्ये रुग्णाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करून आमच्या हॉस्पिटलमध्ये असलेले तज्ञ कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, ट्रॉमा सर्जन आणि त्यांच्या टीमचे सदस्य हॉस्पिटलमध्ये आल्यावर रुग्णाच्या व्यवस्थापनासाठी नक्की काय करायचे याची तयारी करू शकतात. या नवीन सेवेमुळे आनंदी आणि निरोगी असण्याकडे रुग्णाची वाटचाल अधिक जलद आणि सुखकर होईल.”
श्री गौरव म्हात्रे, गोल्डन अवर हीरो, यांनी सांगितले, “तो दिवस इतर दिवसांसारखाच सुरू झाला, पण त्या दिवशी मला नवी मुंबईमध्ये एक मोठा अपघात दिसला ज्यात 2.5 वर्षांचे बाळ आणि बाळाचे आई-वडील असे सर्व होते. जीव वाचवण्याचे मूलभूत प्रशिक्षण मिळाले असल्यामुळे मला कळले की मला त्या बाळाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले पाहिजे. आता ते बाळ रिकव्हर झाले आहे कारण अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जलद आणि फार चांगला उपचार दिला. या अनुभवामुळे जीव वाचवण्याच्या प्रशिक्षणाचे महत्त्व कळते. मी तर सगळ्यांनाच आग्रह करेन की हे प्रशिक्षण सर्वांनी घ्यावे; आपण सर्व मिळून बदल घडवून आणू शकतो आणि अधिक जीव वाचवू शकतो. आपत्कालीन उपचाराबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी अपोलो हॉस्पिटलने जे प्रयत्न केले आहेत ते फार चांगले आहेत.”
संतोष मराठे, क्षेत्रीय सीईओ-पश्चिमी क्षेत्र, अपोलो हॉस्पिटल यांनी सांगितले,“अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई यांनी समुदायाला नेहमीच जागतिक दर्जाची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये दर वर्षी साधारण 25,000 रुग्ण आपत्कालीन विभागातून दाखल होतात. आमची 5G ॲम्ब्युलंस हॉस्पिटलच्या रस्त्त्यात असतानाच उपचार सुरू करून गोल्डन अवरच्या काळाचा वापर फार प्रभावीपणे करते. आमची 30 किलोमीटरच्या आतील विनामूल्य ॲम्ब्युलंस सेवा लक्षात घेता, या उपक्रमामुळे सर्वांनाच चांगला उपचार मिळू शकतो. ईआरमधील आमचे लहान मुलांचे आणि मोठ्यांचे बेड आणि अतिशय कार्यक्षण नर्सिंग स्टाफ, प्रशिक्षित आपत्कालीन डॉक्टर्स आणि रॉयल कॉलेज ऑफ लंडन यांच्यासोबत संलग्नतेमुळे प्रोटोकॉल-आधारित आपत्कालीन प्रतिसाद दिला जातो.”