maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फेडएक्स डिजिटल कौशल्‍य उपक्रमाच्‍या माध्‍यमातून तरूणांना सक्षम करणार

मुंबई, २१ जुलै २०२४: फेडेक्‍स एक्‍स्‍प्रेस ही फेडएक्स कॉर्पोरेशनची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्‍स्‍प्रेस परिवहन कंपनीने भारतातील डिजिटल कौशल्‍यांमधील तफावत व रोजगारक्षमतेमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाचा जवळपास ४०० विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (एसटीईएम) विद्यार्थ्‍यांना अपस्किल करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे हैदराबादमधील वंचित समुदायांतील महिला पदवीधरांच्‍या नोंदणीला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. हा उपक्रम टेक टॅलेंटला अधिक निपुण करण्‍याच्‍या भारत सरकारच्‍या धोरणात्‍मक पुढाकाराला पाठिंबा देतो.  

या तरूणांना अग्रगण्‍य क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग व सहाय्यक तंत्रज्ञानांमध्‍ये हस्‍तांतरणीय जीवन आणि रोजगारक्षम कौशल्‍यांसह अपस्किल करण्‍यासाठी ७५-दिवसांचा अभ्‍यासक्रम डिझाइन करण्‍यात आला आहे. क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग आघाडीचे तंत्रज्ञान ट्रेण्‍ड आहे, ज्‍याचा झपाट्याने व्‍यवसायांमध्‍ये अवलंब केला जात आहे, ज्‍यामुळे हे इन-डिमांड कौशल्‍य आहे. 

”फेडएक्समध्‍ये आम्‍हाला भारतातील तरूणांमधील व्‍यापक क्षमता आणि भविष्‍याला आकार देण्‍यामध्‍ये त्‍यांची महत्त्वपूर्ण भूमिका माहित आहे,” असे फेडएक्सचे मिडल ईस्‍ट इंडियन सबकॉन्टिनण्‍ट व आफ्रिकामधील मार्केटिंग आणि एअर नेटवर्कचे उपाध्‍यक्ष नितीन नवनीत ताटीवाला म्‍हणाले. ”कुशल व्‍यावसायिकांचा समूह विकसित करणे नाविन्‍यता व विकासाला गती देण्‍यासाठी आवश्‍यक आहे. आमचा पाठिंबा तरूणांना रोजगार संधींसाठी सक्षम करण्‍यासोबत आजच्‍या स्‍पर्धात्‍मक व्‍यावसायिक क्षेत्रात प्रगती करण्‍यास आवश्‍यक असलेली अनुकूलता व ज्ञान आत्‍मसात करण्‍यास मदत देखील करतो. हा उपक्रम आमचा विश्‍वास दृढ करतो की तरूणांना कुशल करत आम्‍ही भावी प्रमुख व नवप्रवर्तक घडवत आहोत, ज्‍यामधून शाश्‍वत प्रगती व विकासाची खात्री मिळते.”

तज्ञ टेक्निकल व लाइफ स्किल्‍स प्रशिक्षकांकडून वैयक्तिक सत्रांच्‍या माध्‍यमातून हा अभ्‍यासक्रम देण्‍यात येईल, जेथे समूह क्रियाकलाप व टीमवर्कच्‍या माध्‍यमातून सहयोगात्‍मक अध्‍ययन अनुभव देण्‍यात येईल. डिजिटल कौशल्‍य उपक्रमामध्‍ये उद्योग व क्षेत्रातील तज्ञांसोबत नियतकालिक नियोक्‍ता सहभाग सत्रांचा समावेश आहे, ज्‍यामुळे तरूणांना विविध एण्‍ट्री-लेव्‍हल आयटी/आयटीईएस रोजगारांबाबत व्‍यावहारिक माहिती मिळेल. हा उपक्रम तरूणांना त्‍यांचे व्‍यावसायिक प्रोफाइल्‍स प्रबळ करण्‍यासाठी आणि मुलाखतीची तयारी करण्‍यासाठी मार्गदर्शन करतो. उद्योग-संबंधित प्रकल्‍प आणि सहभागींना आत्‍मसात केलेली कौशल्‍ये व ज्ञान दाखवण्‍यासाठी जागतिक प्रमाणन मिळवण्‍याच्‍या संधीसह या अभ्‍यासक्रमाचे समापन होते. अभ्‍यासक्रम पूर्ण झाल्‍यानंतर सहभागींना आयटी/आयटीईएस क्षेत्रात एण्‍ट्री-लेव्‍हल रोजगारांसाठी प्‍लेसमेंट साह्य आणि पोस्‍ट-प्‍लेसमेंट सपोर्ट मिळतो, ज्‍यामधून दीर्घकाळापर्यंत रोजगार समाधान आणि कामाच्‍या ठिकाणी उत्तम कामगिरीची खात्री मिळते.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे ग्‍लोबल सीईओ जयंत रस्‍तोगीम्‍हणाले, ”आम्ही वंचित समुदायांमधील तरूणांना आमच्‍या डिजिटल कौशल्‍य उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सक्षम करण्‍यासाठी, तसेच त्‍यांना संपन्‍न आयटी/आयटीईएस क्षेत्राकरिता सुसज्‍ज करण्‍यासाठी फेडएक्ससोबत आमच्‍या संयुक्‍त दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. हा सहयोग भविष्‍यासाठी सुसज्‍ज कर्मचारीवर्ग घडवण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्‍यामुळे हे तरूण सर्वसमावेशक रोजगार बाजारपेठेसाठी सुसज्‍ज असण्‍याची खात्री मिळेल. जीवन व रोजगारक्षम कौशल्‍यांसह सुसज्‍ज करत आमचा त्‍यांना आर्थिक सक्षमीकरणाच्‍या दिशेने त्‍यांच्‍या प्रवासामध्‍ये सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.”

Related posts

टाटा मोटर्सने २५० फास्‍ट-चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यासाठी डेल्‍टा इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि थंडरप्‍लस सोल्‍यूशन्‍ससोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

Shivani Shetty

आयएचसीएल ठाण्यामध्ये सुरु करणार जिंजर हॉटेल

Shivani Shetty

टाटा मोटर्सने पॅसेंजर इलेक्ट्रिक वेईकल्‍सची श्रेणी प्रदान करण्‍याकरिता केंद्रीय पोलिस भंडारसोबत केला सहयोग

Shivani Shetty

Leave a Comment