ठाणे, १८ जुलै २०२४: सिंघानिया क्वेस्ट+ ने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स (लंडन, यूके) च्या सहकार्याने भारतातील पहिली आणि सर्वात मोठी राष्ट्रीय कोडिंग स्पर्धा ‘गो कोडर्ज’ सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. संगणक प्रोग्रामिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय कौशल्य प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने चालवली जाणारी ही अशा प्रकारची पहिली कोडिंग स्पर्धा आहे. तीन महिने चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील शाळा त्यांच्या इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकतात. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांची प्रतिभा पारखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विनामूल्य कोडिंग मास्टरक्लास देखील लावला जाईल. स्पर्धेच्या शेवटी, विजेत्यांना ₹ १ लाख किमतीच्या गौतम सिंघानिया कोडिंग शिष्यवृत्तीसह विविध बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. सिंघानिया क्वेस्ट+ ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आधीच १० राज्यांमधून १५,००० प्रवेशिका मिळाल्या आहेत.
डॉ. ब्रिजेश कारिया, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, सिंघानिया क्वेस्ट म्हणाले,“पारंपारिक शिक्षण पद्धती बदलत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाचा शुभारंभ हे त्याचे स्पष्ट द्योतक आहे. आमचा उपक्रम ‘गो कोडर्ज’ पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळी वाट धरण्यासाठी आणि संगणक प्रोग्रामिंग क्षेत्रामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे.”
या उपक्रमामध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांच्या समस्या निवारण करण्याची क्षमता, तार्किक विचार, कोडिंग संकल्पना, अल्गोरिदमिक विचार आणि प्रोग्रामिंग कौशल्ये यांची पारख करण्यासाठी कोडिंग आव्हानांच्या दोन फेऱ्या असतील. पहिल्या फेरीत, विद्यार्थी त्यांच्या गटांमध्ये कोडिंग प्रकल्पांवर काम करतील आणि सिंघानिया क्वेस्ट पोर्टलवर त्यांचे काम जमा करतील. निकाल लगेच घोषित केले जातील आणि सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्रे दिली जातील. सहभागाच्या स्तरानुसार, सहभागी शाळांना एंगेजमेंट पुरस्कार देखील दिले जातील. पहिल्या फेरीपासून, प्रत्येक शाळेतील पहिले २५% विद्यार्थी पुढील फेरीत जातील. या २५% विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या कोडिंग प्रकल्पांच्या गटानुसार दुसऱ्या फेरीत मदत करण्यासाठी विशेष ऑनलाइन मास्टर क्लास लावले जातील. स्पर्धेच्या शेवटी, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना शिष्यवृत्ती आणि बक्षिसे दिली जातील. यामध्ये प्रतिष्ठित गौतम सिंघानिया कोडिंग स्कॉलरशिपचा देखील समावेश आहे.
इच्छूक शाळा या स्पर्धेसाठी इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकता नोंदणीसाठी लिंक वापरा: https://questplus.in/go-coderz/
लिंक १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत खुली राहील.