मुंबई, २९ मे २०२४: जगातील आघाडीच्या बँका व विमा कंपन्यांना सेवा आणि उत्पादने प्रदान करणारी, क्लाउड-नेटिव्ह, भविष्यासाठी तयार, बहु-उत्पादन फिनटेक कंपनी, इंटेलेक्ट डिझाईन एरिना लिमिटेड ने आयसीपीएक्स (कॉर्पोरेट प्रोक्योरमेंट एक्सचेंज) आणि आयएपीएक्स (अकाउंट पेएबल एक्सचेंज) हे दोन अत्याधुनिक एआय समर्थित प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. यासाठी सर्वात मोठा, सर्वात व्यापक आणि अभिनव ओपन फायनान्स प्लॅटफॉर्म ईमॅक.एआय चा वापर करण्यात आला आहे. हे क्रांतिकारी प्लॅटफॉर्म इंटेलेक्टच्या स्वतःच्या पर्पल फॅब्रिक एआय प्लॅटफॉर्मवर एम्बेडेड जेनएआय सोबत ‘फर्स्ट प्रिन्सिपल्स थिंकिंग’ चा वापर करतात. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी प्रोक्युअरमेंट आणि अकाउंट्स पेयेबल ऑपरेशन्समध्ये परिवर्तन आणून कॉमर्स इकोसिस्टममध्ये इंटलेक्टचे स्थान मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे.
आयसीपीएक्स हा पहिला उद्देशाला धरून पुढे जाणारा आणि मुक्त एपीआय आधारित सोर्स-टू-पे प्लॅटफॉर्म आहे. कॉर्पोरेट प्रोक्योरमेंट इकोसिस्टममध्ये नवीन बदल घडवून आणणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आयसीपीएक्स एपीआय अर्थव्यवस्थेला चालना देत तज्ञ एआय एजंट्सना सहजपणे एम्बेड करते आणि जगभरातील व्यवसायांना अतुलनीय कार्यक्षमता, धोरणात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी व खर्चाचे पुरेपूर मूल्य मिळवण्यासाठी सक्षम बनवते. स्पेसिफिकेशननुसार आणि कॅटलॉगनुसार अशा दोन्ही प्रकारच्या प्रोक्युअरमेंटला समर्थन देण्याबरोबरीनेच, यात १००+ प्रोक्युअरमेंट मोड आहेत. १११ एपीआय आणि १७ मायक्रोसर्व्हिसेस यांसारख्या प्री-बिल्ट असेट्ससह, आयसीपीएक्स ग्राहकांना त्यांची स्वतःची विशेष प्रोक्युअरमेंट सोल्यूशन्स त्वरीत तयार करण्याची क्षमता प्रदान करते. आयसीपीएक्सला इंटेलेक्टच्या गेल्या ६ वर्षांहून अधिक काळापासून जगातील सर्वात मोठ्या खरेदी बाजारांपैकी एक तयार आणि व्यवस्थापित करण्याच्या अनुभवाचा फायदा होतो.
आयएपीएक्स हा जगातील सर्वात व्यापक पेटंट एआय आधारित अकाउंट्स पेयेबल प्लॅटफॉर्म, अकाउंट्स पेयेबल प्रक्रियेत अभूतपूर्व अचूकता आणि कार्यक्षमता प्रदान करते. सीडीगी (कॉग्निटिव्ह डेटा ग्राफ) तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आणि १२ जागतिक पेटंट अल्गोरिदम आणि ७ तज्ञ एजंट्सद्वारे संचालित,आयएपीएक्स पावत्यांमधील डुप्लिकेशन आणि विसंगती ९८% पर्यंत दूर करते. संज्ञानात्मक निर्णय घेणे, ज्यांना उशीर लागतो अशी पुन्हा-पुन्हा करावयाची कामे आणि कन्टेन्ट जनरेशन स्वयंचलित करून आयएपीएक्स व्यवसायांच्या वेळ, खर्च आणि अनुपालनसंबंधी चिंता कमी करते.
इंटलेक्ट ही उत्पादने त्यांची नव्याने तयार करण्यात आलेली बिझनेस लाइन, इंटलेक्ट डिजिटल टेक्नॉलॉजी फॉर कॉमर्स (आयटीडीसी) द्वारे जागतिक पातळीवर पुढे नेईल.
आयटीडीसीचे सीईओ श्री देबांजन कुमार म्हणाले, “आमच्या ईमॅक.एआयवर तयार केलेल्या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे, आयसीपीएक्स आणिआयएपीएक्स कॉर्पोरेट प्रोक्योअरमेन्ट कार्यक्षमतेत आणि फायनान्स प्रक्रियांमध्ये बदल करण्यात आघाडीवर असतील. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाला सहजपणे एकीकृत करण्यासाठी, उत्पादनक्षमता, खर्चाचे पुरेपूर मूल्य मिळवण्यासाठी आणि धोरणात्मक चपळता मिळवण्यासाठी जागतिक स्तरावरील व्यवसायांना सशक्त बनवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”