maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

२०४७ पर्यंत पूर्णत: सक्रिय भारतीयांमुळे जीडीपीमध्‍ये वार्षिक १५ ट्रिलियन रूपयांपेक्षा जास्‍त वाढ होऊ शकते: स्‍पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्‍हीटी (एसएपीए) बाबत डालबर्ग अहवाल

मुंबई, ५ सप्‍टेंबर २०२४: आज, स्‍टेट ऑफ स्‍पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्‍हीटी (एसएपीए)च्‍या लाँचप्रसंगी डालबर्गने निदर्शनास आणले की, किमान १५५ दशलक्ष भारतीय प्रौढ व्‍यक्‍ती आणि ४५ दशलक्ष किशोरवयीन शारीरिक क्रियाकलाबाबत डब्‍ल्‍यूएचओच्‍या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करण्‍यामध्‍ये अयशस्‍वी ठरले आहेत. ओमीड्यार नेटवर्क इंडिया व अजित इसाक फाऊंडेशन यांच्‍या पाठिंब्‍यासह स्‍पोर्टस् अँड सोसायटी अॅक्‍सेलेरेटरसोबत सहयोगाने विकसित करण्‍यात आलेला हा अहवाल क्रीडा व शारीरिक क्रियाकलापावर त्‍वरित फोकस आणि सहभाग घेण्‍याची त्‍वरित गरज निदर्शनास आणतो, तसेच त्‍यांचे फायदे दाखवतो आणि त्‍यासंदर्भात येणाऱ्या आव्‍हानांवर मात करण्‍यासाठी मार्गांना प्रकाशझोतात आणतो.

भारत चिंताजनकपणे निष्क्रिय स्थितीत आहे
एसएपीए अहवालामधून निदर्शनास येते की, भारताला सक्रिय देश बनण्‍यासाठी अजून लांबचा पल्‍ला गाठायचा आहे. शारीरिक व्‍यायाम करत असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या व्‍यायाम पद्धतींमध्‍ये वैविध्‍यता नाही. डेटामधून निदर्शनास येते की ऑफिस व घरातील कामांव्‍यतिरिक्‍त प्रौढ व्‍यक्‍ती फक्‍त चालणे हा व्‍यायाम प्रकार करतात, जे लाभदायी आहे, पण पुरेसे नाही. देशातील फक्‍त १० टक्‍के प्रौढ व्‍यक्‍ती खेळ खेळतात. नियमितपणे खेळ खेळणाऱ्या व्‍यक्‍तींची आकडेवारी यापेक्षाही कमी आहे. अधिकाधिक किशोरवयीन (६६ टक्‍के) नियमितपणे खेळ खेळत असले तरी त्‍यांच्‍या खेळाच्‍या निवडीमध्‍ये मर्यादित विविधता आहे. पन्‍नास टक्‍के मुले क्रिकेट खेळतात, तर इतर खेळ खेळण्‍याचे प्रमाण खूपच कमी आहे.
एसएपीएमध्‍ये सामील होण्‍याच्‍या भारतीयांच्‍या पद्धतीतील लिंग-विभाजन स्‍पष्‍ट आहे – सरासरी, मुले व महिला मुले व पुरूषांच्‍या तुलनेत दर आठवड्याला एसएपीएमध्‍ये ५ ते ७ तास कमी (जवळपास २० टक्‍के कमी) वेळ व्‍यतित करतात. शहरी भागांमधील आकडेवारी पाहता ही तफावत अधिक वाढत जाते, जेथे मुलींना सर्वाधिक धोका आहे. किमान एक-तृतीयांश मुली व महिला शारीरिक क्रियाकलापासंदर्भातील डब्‍ल्‍यूएचओच्‍या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करत नाहीत.

विशेषत: निष्क्रियतेचा शहरी महिलांवर अधिक परिणाम झाला आहे
शहरी महिला ग्रामीण महिलांच्‍या तुलनेत सक्रियतेसंदर्भात दर आठवड्याला ३८५ मिनिटे कमी वेळ व्‍यतित करतात आणि शहरी पुरूषांच्‍या तुलनेत दर आठवड्याला २४९ मिनिटे कमी वेळ व्‍यतित करतात. या तफावतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत जसे पायाभूत सुविधेचा अभाव, सुरक्षितता आणि उपलब्‍धता, ज्‍यामुळे सार्वजनिक ठिकाणी एसएपीएमध्‍ये २० टक्‍के कमी महिला सामील होतात. याव्‍यतिरिक्‍त, मासिक पाळी व गर्भधारणेदरम्‍यान एसएपीए धोकादायक आहे, असे गैरसमज या तफावतीमध्‍ये अधिक भर करतात.

एसएपीए भारताच्‍या विकसित भारतप्रती महत्त्वाकांक्षेमध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकते
भारत निष्क्रिय स्थितीत राहिला तर आपल्‍याला सर्व घटकांबाबत तणाव वाढण्‍याचा धोका आहे. २०४७ पर्यंत, निष्क्रिय भारत स्थितीमुळे २०० दशलक्षहून अधिक प्रौढ व्‍यक्‍तींना असंसर्गजन्‍य आजार (एनसीडी) असेल, ४५ दशलक्षहून अधिक किशोरवयीन व्‍यक्‍ती लठ्ठ असतील आणि आजच्‍या तुलनेत आरोग्‍यसेवेवर अतिरिक्‍त ५५ ट्रिलियन रूपयांहून अधिक वार्षिक खर्च होईल. तसेच, भारत सध्‍या कमी कर्मचारी उत्‍पादकतेचा सामना करत आहे, जे जागतिक सरासरीच्‍या जवळपास निम्‍मे आहे, आरोग्‍य-संबंधित समस्‍यांमुळे अनुपस्थितीचे प्रमाण जास्‍त आहे आणि कामामध्‍ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कमी आहे.
एसएपीएमधील उच्‍च सहभागामध्‍ये या चित्राला पूर्णत: कलाटणी देण्‍याची क्षमता आहे. या अहवालानुसार, एसएपीए व्‍यक्‍तींना मोठ्या प्रमाणात फायदे देऊ शकते, तसेच व्‍यक्‍तींना उत्तम सामाजिक व राष्‍ट्रीय प्रगती करण्‍यासाठी सक्षम करू शकते. जगभरातील देशांना एसएपीएमधील वाढत्‍या गुंतवणूकीमधून फायदा मिळाला आहे, जेथे चीनने रूग्‍णाच्‍या हॉस्पिटलायझेशन खर्चामध्‍ये ४० टक्‍के घट व आरोग्‍यसेवा खर्चांमध्‍ये ३० टक्‍के घट नोंदवली आहे आणि यूकेने सामाजिक-आर्थिक मूल्‍यामध्‍ये ७२ बिलियन पौंडचा महसूल निर्माण केला आहे. अशी इतर अनेक उदाहरणे आहेत.
एसएपीए अहवाल भारतासाठी या निष्‍पत्तींच्‍या परिणामांना दाखवतो, तसेच साध्‍य करता येणारे लक्ष्‍य सादर करतो, जे देशाला खालील मार्गांद्वारे मदत करू शकतात:

1. आर्थिक प्रगती: २०४७ पर्यंत सर्व लोक सक्रिय राहिल्‍यास एसएपीए भारताचे जीडीपी वार्षिक १५ ट्रिलियन रूपयांहून अधिकपर्यंत वाढवू शकते. तसेच, कमी सिक लिव्‍ह आणि आजाराच्‍या कारणास्‍तव अनुपस्थिती यामुळे उत्‍पादकतेसंबंधित नुकसान २.५ ट्रिलियन रूपयांनी (३० बिलियन अमेरिकन डॉलर्स) होण्‍याला प्रतिबंध होऊ शकते.
2. आरोग्‍य व मृत्‍यूचे परिणाम: २०४७ पर्यंत एसएपीए जवळपास ११० दशलक्ष प्रौढ व्‍यक्‍तींना एनसीडी होण्‍याला प्रतिबंध करू शकते, ज्‍यामुळे ३०,००० कमी आत्‍महत्‍या होऊ शकतात आणि लठ्ठपणा, हृदयसंबंधित आजार व मानसिक आरोग्‍य समस्‍या कमी करत आरोग्‍यसेवा खर्चांमध्‍ये जवळपास ३० ट्रिलियन रूपयांची बचत होऊ शकते.
3. लिंग तफावत दूर करा: २०४७ पर्यंत एसएपीए ११ दशलक्ष मुलींना खेळाची निवड करण्‍यास प्रेरित करू शकते, ज्‍यामुळे त्‍यांचे मनोबल व आत्‍मविश्‍वास उंचावेल आणि शक्‍यतो ६००,००० अतिरिक्‍त महिला उद्योजक व प्रमुख घडतील.
4. क्रीडा देश म्‍हणून निपुण व्‍हा: एसएपीएच्‍या माध्‍यमातून आपण २०४७ पर्यंत क्रीडा उद्योगात वार्षिक ४.५ ट्रिलियन रूपये खर्च करू शकतो. क्रीडा क्षमता वाढवल्‍याने भारताची ऑलिम्पिक्‍सचे आयोजन करण्‍याची क्षमता देखील दृढ होऊ शकते, अधिकाधिक खेळांमध्‍ये विजय संपादित करता येऊ शकतात आणि आपली जागतिक क्रीडा फूटप्रिंट वाढवता येऊ शकते.

ध्‍येयापर्यंत पोहोचणे: एसएपीएला प्रेरित करण्‍यासाठी सार्वजनिक-खाजगी सहयोग आणि हस्‍तक्षेपांना चालना देणे
निर्धारित करण्‍यात आलेल्‍या लक्ष्‍यांमधून देशभरात शारीरिक क्रियाकलाप पातळ्यांना मोठ्या प्रमाणात गती देण्‍यासाठी धोरण, पायाभूत सुविधा आणि सामुदायिक उपक्रमांमध्‍ये धोरणात्‍मक हस्‍तक्षेपांची गरज दिसून येते. या अहवालामध्‍ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्र कंपन्‍यांच्‍या भूमिकेवर भर देण्‍यात आला आहे, जेथे सरकार, शाळा प्रमुख, शहर नियोजक, उद्योजक आणि नागरी समाज संस्‍था यांच्‍यासाठी कृतीशील उपाययोजनांची गरज आहे.
• कव्‍हर्ड एलीव्‍हेटेड बाइक हायवे, सार्वजनिक उद्यानांमध्‍ये ओपन-एअर डान्‍स फ्लोअर्स, मंच व म्‍युझिक सिस्‍टम्‍स अशा वेदर-प्रूफ ट्रान्झिट सोल्‍यूशन्‍सपासून नाविन्‍यपूर्ण एसएपीए-केंद्रित पायाभूत सुविधा निर्माण केल्‍याने शारीरिक क्रियाकलापांना चालना मिळू शकते.
• शाळा शारीरिक सवयी बिंबवण्‍यामध्‍ये पायाभूत भूमिका बजावतात, ज्‍यामुळे शाळा प्रमुखांनी शारीरिक क्रियाकलापांना प्राधान्‍य देणाऱ्या मॉडेल स्‍कूल्‍स डिझाइन केले पाहिजे, तसेच विद्यार्थ्‍यांना एसएपीएची वैविध्‍यपूर्ण श्रेणी देण्‍यासाठी, पीई (शारीरिक शिक्षण) शिक्षकांना प्रशिक्षित व सक्षम करण्‍यासाठी पुरेशी संसाधने दिली पाहिजेत. शारीरिक शिक्षणाचे शिक्षक व प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आणि सक्षमीकरणामध्‍ये गुंतवणूक या प्रयत्‍नाच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाया ठरेल.
• शहरी नियोजक भावी सार्वजनिक स्‍थळांच्‍या बांधकामाचे नियोजन करू शकतात, ज्‍यामधून खात्री मिळेल की सर्वांना घरापासून अवघ्‍या १५ मिनिटांमध्‍ये (हरित) जागा उपलब्‍ध आहे.
• समुदाय सहभाग सक्षम केल्‍याने दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकते, जसे शहर-व्‍यापी एसएपीए इव्‍हेण्‍ट्सचे आयोजन, समाजाच्‍या सर्व स्‍तरांमध्‍ये क्रीडाला चालना देणे आणि सर्व स्‍तरातील (सामान्‍यांपासून उच्‍चभ्रूपर्यंत) आणि क्षमता असलेल्‍या व्‍यक्‍तींना सामावून घेण्‍याच्‍या संधी तयार करणे.
• उद्योजकांना बिझनेस मॉडेल्‍स तयार करण्‍याची संधी आहे, जे वापरकर्त्‍यांना एसएपीएमध्‍ये अधिक सामील होण्‍यासाठी प्रेरित करतील, त्‍यावर देखरेख ठेवतील आणि प्रशिक्षण देतील. उदाहरणार्थ, ते एसएपीए डेटावर देखरेख ठेवणारे राष्‍ट्रीय अॅप विकसित करण्‍यास मदत करू शकतात, जे वैयक्तिकृत आव्‍हाने आणि सहयोगात्‍मक प्रगतीची भावना जागृत करण्‍यासाठी रिवॉर्ड्स देईल.
• आपण करणाऱ्या प्रत्‍येक गोष्‍टीमध्‍ये लिंगावर प्रोग्रामॅटिक फोकस देण्‍याची गरज आहे, जसे लिंग-सर्वसमावेशक पायाभूत सुविधा व उपक्रम तयार करणे, गैरसमजांना दूर करण्‍यासोबत महिलांना एसएपीए घेण्‍यास प्रेरित करणाऱ्या मीडिया मोहिमा डिझाइन करणे आणि तळागाळापासून एसएपीए सहभागाची भावना बिंबवण्‍यासाठी शाळांमधील मुलींमध्‍ये उत्‍साह व कौशल्य विकसित करणे.

डालबर्ग अॅडवायजर्स येथील ग्‍लोबल मॅनेजिंग पार्टनर गौरव गुप्‍ता म्‍हणाले, “आपण नियंत्रण ठेवू शकणारी बाब म्‍हणजे आपल्‍या स्‍वत:ची काळजी घेणे. आपले शारीरिक आरोग्‍य व स्‍वास्‍थ्‍याचा जीवनाचा दर्जा आणि समाजाप्रती योगदानांवर परिणाम होतो. एक देश म्‍हणून आपण आपल्‍या संपूर्ण क्षमता ओळखण्‍यापासून खूप दूर आहोत. याचे कारण म्‍हणजे आपण आपल्‍या आरोग्‍यावर पुरेसे लक्ष केंद्रित करत नाही आणि शारीरिक व्‍यायाम करत नाही. म्‍हणून, व्‍यक्‍तींना एसएपीए सहभागासाठी प्रेरित करण्‍याकरिता बाह्य प्रेरक, हस्‍तक्षेप आणि उत्तम उपलब्‍धतेची गरज आहे. तळागाळापासून आपल्‍याला उत्तम शाळा, अधिक खेळाचे मैदान आणि पर्यायी किंवा अभ्‍यासेत्तर क्रियाकलाप म्‍हणून नाही तर आवश्‍यक असलेल्‍या शारीरिक क्रियाकलपांना प्राधान्‍य देणाऱ्या नवीन दृष्टिकोनाची गरज आहे.”

स्‍पोर्टस् अँड सोसायटी अॅक्‍सेलरेटरचे सह-संस्‍थापक नंदन कामत म्‍हणाले, “या अहवालामधून सर्वोत्तम प्रभाव दिसून येतो, जो स्‍पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्‍हीटी (एसएपीए) आर्थिक विकास व उदरनिर्वाहाला चालना देण्‍यापासून शारीरिक व मानसिक आरोग्‍य वाढण्‍यापर्यंत आणि विविध सामाजिक-आर्थिक बाबींना चालना देण्‍यापर्यंत आपल्‍या देशाच्‍या कल्‍याणावर परिणाम करू शकतो. आपण आपला डेमोग्राफिक फायदा सानुकूल करण्‍यासाठी आणि क्रीडा-अग्रणी देश बनण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाच्‍या टप्‍प्‍यावर आहोत. आपण या संधीचा फायदा घेऊन भविष्‍य घडवले पाहिजे, जेथे एसएपीए प्रत्‍येक भारतीयाच्‍या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असेल.”

Related posts

MobilTM प्रथमच साजरा करत आहे MotoGP™️ भारत पॉवरिंगद्वारे रेड बुल केटीएम फॅक्टरी रेसिंग टीम

Shivani Shetty

सिक्‍युराइट एक्‍सडीआरला मिळाले एव्‍ही-टेस्‍ट सर्टिफिकेशन

Shivani Shetty

मेलोराकडून नवीन लाइटवेट ज्‍वेलरीचे अनावरण

Shivani Shetty

Leave a Comment