maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interestमहाराष्ट्र

कोका-इंडिया आणि अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशन यांच्‍यामधील दीर्घकालीन सहयोग महिला अॅथलीट्सना सक्षम करत आहे ~ कोका-कोला इंडिया सरावासाठी मोठे मैदान आणि दर्जात्‍म‍क

नवी दिल्‍ली, मार्च ५, २०२४: क्रीडाप्रती आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत कोका-कोला इंडिया आपल्‍या फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशनसोबतच्‍या तीन-वर्षाच्‍या सहयोगाचा भाग म्‍हणून देशातील अॅथलीट्सना आवश्‍यक सुविधा आणि ट्रेनिंग इक्विपमेंटसह पाठिंबा देत आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन अंजू बॉबी जॉर्ज यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत फाऊंडेशन प्रसिद्ध लॉंग जम्‍पर शाली सिंग यांच्‍यासह महिला अॅथलीट्सच्‍या भावी पिढीला निपुण करत आहे. हा सहयोग कोका-कोला इंडियाच्‍या #SheTheDifference मोहिमेशी संलग्‍न आहे, जी मूल्‍यतत्त्वांच्‍या माध्‍यमातून महिलांना प्रशंसित, प्रगत करण्‍यासह पाठिंबा देते. या सहयोगाचा भाग म्‍हणून कोका-कोला इंडिया महिला अॅथलीट्सना क्रीडा व लैंगिक समानता स्थितीमध्‍ये सकारात्‍मक बदल घडवून आणण्‍यासाठी सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.
कोका-कोला इंडियाने आपल्‍या फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून ऑलिम्पिक्‍समध्‍ये भारतीय महिला अॅथलीट्सचे प्रतिनिधीत्‍व वाढवण्‍यामध्‍ये लक्षणीय प्रयत्‍न केले आहेत. कंपनीने चार शिपिंग कंटेनर्सना फिजियोथेरपी रूम, स्‍टोरेज सुविधा, पॅण्‍ट्री व रेस्‍टरूममध्‍ये बदलले आहे. कंपनीने उच्‍च-स्‍तरीय जिम इक्विपमेंटची सुविधा देखील दिली आहे आणि शाश्‍वत पाण्‍याच्‍या वापरासाठी पावसाचे पाणी साठवणारे टँक्‍स असलेले एैसपैस सरावाचे मैदान बनवण्‍यामध्‍ये मदत केली आहे. पायाभूत सुविधांचा विकास करण्‍याव्‍यतिरिक्‍त कोका-कोलाने तीन वर्षांसाठी अकॅडमीच्‍या भाडेदरासह मदत केली आहे, ज्‍यामधून स्थिर कार्यरत फाऊंडेशनची खात्री मिळाली आहे.
देशातील लहान शहरे व गावांमधील अनेक महिला अॅथलीट्सना प्रशिक्षण सुविधा, प्रशिक्षणाची कमी उपलब्‍धता व कमी प्रमाणात आर्थिक साह्य अशा समस्‍यांचा सामना करावा लागतो. म्‍हणून या सहयोगाचा या समस्‍यांचे निराकरण करण्‍याचा मनसुबा आहे. पीडब्‍ल्‍यूसी अहवालामधून टोकियो ऑलिम्पिक्‍समधील लैंगिक संतुलनामध्‍ये मोठा बदल निदर्शनास येतो, जेथे ऑलिम्पिक्‍समध्‍ये सहभाग घेतलेल्‍या भारतीयांमध्‍ये ४४ टक्‍के महिला अॅथलीट्स होत्‍या.
या सहयोगाबाबत मत व्‍यक्‍त करत कोका-कोला इंडिया व साऊथवेस्‍ट एशिया (आयएनएसडब्‍ल्‍यूए) साठी सीएसआर आणि सस्‍टेनेबिलिटीचे संचालक राजेश अयपिल्‍ला म्‍हणाले, “कोका-कोला इंडियामध्‍ये आमचा समुदायांना प्रेरित, सक्षम करण्‍यासह एकत्रित आणण्‍यासाठी क्रीडाच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे. अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशनसोबतचा आमच्‍या दीर्घकालीन सहयोगामधून भारतीय महिला अॅथलीट्सच्‍या भावी पिढीला घडवण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. दोन्‍ही संस्‍था क्रीडाला अधिक प्राधान्‍य देत असल्‍यामुळे अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून आम्‍ही अॅथलीट्स प्रगती करू शकतील असे सहाय्यक वातावरण निर्माण करण्‍याप्रती समर्थित आहोत. आम्‍हाला शाली सिंग सारख्‍या प्रतिभावान व्‍यक्‍तींना स्‍पॉन्‍सर करण्‍याचा अभिमान वाटतो, ज्‍यामुळे क्रीडामध्‍ये महिलांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती आणि जागतिक स्‍तरावरील त्‍यांच्‍या यशासाठी योगदान देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होते.”
“मला कोका-कोला इंडिया सारख्‍या ब्रॅण्‍डसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटत आहे. ते आमच्‍या कार्याला पाठिंबा देण्‍यामध्‍ये प्रथम होते आणि त्‍यांचे योगदान भारतातील बेंगळुरू येथील अंजू बॉबी हाय परफॉर्मन्‍स सेंटरमध्‍ये जागतिक दर्जाच्‍या प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिले आहे. आज, आमच्‍याकडे उच्‍च दर्जाचे ट्रॅक व फिल्‍ड इक्विपमेट, काही दर्जात्‍मक जिम इक्विपमेट आहेत आणि आमचे अॅथलीट्स भारताला ऑलिम्पिक पदक जिंकण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी या सुविधांना लाभ घेत आहेत. मला स्‍वत:ला भारतासाठी पहिले वर्ल्‍ड चॅम्पियनशीप पदक जिंकू शकतो असे वाटते. या तरूण महिलांना माझे ज्ञान व अनुभव शेअर करणे हे माझे कर्तव्‍य आहे, ज्‍यामुळे भारताच्‍या यशस्‍वी कामगिरीप्रती योगदान देता येईल,” असे अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशनच्‍या संस्‍थापक अंजू बॉबी जॉर्ज म्‍हणाल्‍या.
या उपक्रमाचा सामाजिक प्रभाव क्षेत्रातील वैयक्तिक उपलब्‍धींच्‍या पलीकडे दिसून येतो. महिला अॅथलीट्सना सक्षम करत फाऊंडेशन कोका-कोला इंडियासोबत सहयोगाने भावी लीडर्सना निपुण करत आहे, जे प्रशिक्षक, ट्रेनर्स, थेरपीस्‍ट्स व प्रशासक म्‍हणून क्रीडा समुदायाप्रती योगदान देतील.

Related posts

स्वयंचलित निदानप्रक्रियेला वेग देत अॅबॉटने भारतातील प्रयोगशाळांसाठी आणली आहे GLP सिस्टीम्स ट्रॅक यंत्रणा

Shivani Shetty

विद्यार्थ्यांना शिकवून घरी जाताना शिक्षिकेला रस्त्यातच मृत्यूने गाठलं; डंपरखाली चिरडून गमावले प्राण

cradmin

कॉन्सेन्सिसतर्फे मेटामास्क स्नॅप्स सार्वजनिक करत असल्याची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment