maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कॉन्सेन्सिसतर्फे मेटामास्क स्नॅप्स सार्वजनिक करत असल्याची घोषणा


मुंबई, १३ सप्टेंबर २०२३: कॉन्सेन्सिस या आघाडीच्या ब्लॉकचेन व वेब३ सॉफ्टवेअर कंपनीने, आज, मेटामास्क स्नॅप्सची पहिली पुनरावृत्ती सार्वजनिक स्तरावर आणली. वापरकर्त्यांना अभूतपूर्व नियंत्रण व कस्टमायझेशनच्या शक्यता खुल्या करून देऊन, मेटामास्क हा जगातील आघाडीचा सेल्फ-कस्टडी वेब३ प्लॅटफॉर्म हाताळण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यास मेटामास्क स्नॅप्स सज्ज आहे. स्नॅप्स या भारतीय डेव्हलपर्ससह त्रयस्थ डेव्हलपर्सद्वारे तयार करण्यात आलेल्या नवीन सुविधा व कार्यात्मकता आहेत. त्या जगभरातील मेटामास्क वापरकर्ते थेट त्यांच्या वॉलेटमध्ये स्थापित करू शकतात.

मेटामास्क स्नॅप्स सार्वजनिक स्तरावर आणल्या जाणे हा मेटामास्कच्या एक वॉलेट म्हणून होत असलेल्या उत्क्रांतीतील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. जगभरातील त्रयस्थ विकासकांनी विकसित केलेल्या साधनांचा नवीन संच वापरकर्त्यांना पुरवून, मेटामास्क स्नॅप्स व्यक्तींना त्यांच्या वेब३ अनुभवाला, व्यक्तीनुरूप गरज व पसंतीनुसार, नव्याने आकार देण्याची क्षमता प्रदान करतील. प्रथम उपलब्ध होणारे स्नॅप्स स्थापित कसे करायचे याची माहिती कुशल मेटामास्क वापरकर्ते अधिकृत वेबसाइटवरून उपलब्ध करून घेऊ शकतात. प्रारंभिक पुनरावृत्तींचा भर अनुभवी मेटामास्क वापरकर्त्यांना मेटामास्क स्नॅप्स वापरून बघण्यास उत्तेजन देण्यावर तसेच त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवून घेण्यावर असेल. त्याचवेळी मेटामास्क टीम आपले अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने विकासात्मक प्रवास सुरू ठेवेल.

कॉन्सेन्सिसचे चीफ एथॉस ऑफिसर व मेटामास्कचे सहसंस्थापक डॅन फिनले म्हणाले “अत्यंत कठीण समस्या सोडवण्याच्या दृष्टीने स्वत:चे उपाय घेऊन येण्याचे आमंत्रण समुदायातील तज्ज्ञांना देण्याची मुभा देणारी एक प्रणाली आता आमच्या वॉलेटच्या केंद्रस्थानी आहे, हा स्नॅप्स कथेचा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आहे. व्यवहारांच्या सुरक्षिततेचे भवितव्य कसे असेल याबद्दल माझ्याकडे काही मोठ्या कल्पना आणि मते आहे. मात्र, म्हणून केवळ एकच कल्पना पडताळून बघण्याची आवश्यकता नाही. वितरित कम्प्युटिंगचा एक नवीन नमुना उदयाला आणण्यात आम्ही मदत करत आहोत आणि सर्जनशील उपायांच्या शोधातील अनेक प्रश्नही आहेत. म्हणून नवीन गोष्टी वापरून बघण्यातील अडथळे आणि खर्च कमी करण्यावर माझा भर आहे. कठीण समस्यांवर चांगले उपाय शोधण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी हे महत्त्वाचे ठरू शकते. हे केवळ तंत्रज्ञानाचा वेग वाढवणे नाही, तर आपल्या पद्धतींमध्ये सुधारणा शोधण्याचे मार्ग आहेत.”

Related posts

डॉर्बीचे “व्हेस्टा” कलेक्शन

Shivani Shetty

आयथिंक लॉजिस्टिक्सचा इंडिया पोस्टसोबत सहयोग

Shivani Shetty

व्हिएतजेट अॅडलेड आणि पर्थला व्हायब्रंट हो ची मिन्ह सिटीशी जोडते, प्रवाशांसाठी रोमांचक संधी उघडते

Shivani Shetty

Leave a Comment