मुंबई, ७ एप्रिल २०२४: पहिल्या ब्रॅण्ड जाहिरातीला मिळालेल्या भव्य यशानंतर बोल्ड केअर या भारताील पहिल्या क्रमांकाच्या लैंगिक आरोग्य व वेलनेस ब्रॅण्डने त्यांच्या नाविन्यपूर्ण ‘टेकबोल्डकेअरऑफहर’ मोहिमेची दुसरी जाहिरात लाँच केली आहे. बोल्ड केअरचे सर्वाधिक विक्री होणारे उत्पादन एक्स्टेण्ड डिले स्प्रेला दाखवणारी नवीन ब्रॅण्ड जाहिरात पुरूषांना बेडवर दीर्घकाळापर्यंत आनंद घेण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामध्ये बोल्ड केअरचे सह-संस्थापक व भारतीय सुपरस्टार रणवीर सिंग यांनी टेलिशॉपिंग शो होस्टची भूमिका साकारली आहे.
रणवीर आणि प्रसिद्ध इंटरनेट व्यक्तिमत्त्व जॉनी सिन्स यांना पुन्हा एकत्र आणत जाहिरात माहितीपूर्ण कन्टेन्टला विनोदी स्वरूपात सादर करते, ज्यामधून बोल्ड केअरचे मनोरंजन करण्यासोबत माहिती देण्याचे प्रख्यात तत्त्व कायम ठेवण्यात आले आहे. तन्मय भट, देविया बोपान्ना व त्यांच्या टीमच्या सर्जनशील विचारांसह अयप्पा केएम यांनी या ब्रॅण्ड जाहिरातीचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामध्ये बोल्ड केअरच्या पूर्वीच्या सहयोगांनी स्थापित केलेला क्रिएटिव्ह दर्जा कायम राखण्यात आला आहे. जाहिरात प्रॉडक्शन उद्योगामधील लीडर अर्लीमॅन फिल्म्सद्वारे निर्मित ब्रॅण्ड जाहिरात लैंगिग आरोग्याबाबत असलेले गैरसमज दूर करत खुलेपणाने संवादांना चालना देण्याप्रती कटिबद्धता दृढ करते.
बोल्ड केअरचे सह-संस्थापक रजत जाधव म्हणाले, “आमची पहिली ब्रॅण्ड जाहिरात ‘टेकबोल्डकेअरऑफहर’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि रणवीर यांच्या सर्वोत्तमतेसह आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही भारतातील पुरूषांच्या लैंगिक आरोग्य व स्वास्थ्यासंदर्भात समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. या विषयांबाबत चर्चा करणे टाळणाऱ्या समाजामध्ये संवादांना सुरू करण्याचा आमचा मनसुबा होता. आमच्या पूर्वीच्या जाहिरातीला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रेम मिळाले. आता, आम्ही आणखी एका जाहिरातीसाठी पुन्हा एकत्र येत आहोत, ज्यामध्ये पुरूषांच्या लैंगिक आरोग्याबाबत संवादांवरील आमचे कथानक अधिक प्रबळ करण्यासाठी कॉमेडी व जनजागृतीचे सुरेख मिश्रण आहे.”
बोल्ड केअरचे सह-संस्थापक आणि मोहिमेचे स्टार रणवीर सिंग म्हणाले, “बोल्ड केअरची पुरूषांच्या लैंगिक आरोग्याला प्राधान्य देण्याची आणि नाविन्यपूर्ण पद्धतींच्या माध्यमातून अर्थपूर्ण संवादांचा प्रसार करण्याचे मिशन आहे, ज्यामागे जनजागृती निर्माण करण्याचा मनसुबा आहे. पहिल्या ब्रॅण्ड जाहिरातीला मोठे यश मिळाले. यामुळे ब्रॅण्डच्या ऑर्डर्समध्ये १० पट वाढ दिसण्यात आली आणि आम्ही या नवीन जाहिरातीसाठी देखील उत्सुक आहोत.”