नवी मुंबई, ५ एप्रिल २०२४: अपोलो हॉस्पिटल्सने ‘हेल्थ ऑफ नेशन’ च्या प्रमुख वार्षिक अहवालाच्या नवीनतम आवृत्तीचे अनावरण केले. अहवालात कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांसह भारतातील असंसर्गजन्य रोग (एचसीडी) च्या वाढीवर प्रकाश टाकला आहे, या सर्वांचा देशाच्या एकूण आरोग्यावर लक्षणीय परिणाम होतो. विशेषत: जगाच्या तुलनेत भारतातील कर्करोगाच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब आहे, ज्यामुळे भारत ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ झाला आहे.
अपोलोने भारतातील पहिल्या प्रो-हेल्थ स्कोअरची केली सुरुवात भारतीयांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक आणि निःपक्षपाती माहिती प्रदान करुन सक्षम करण्याच्या प्रयत्नात, अपोलोने ‘प्रो-हेल्थ स्कोअर’ नावाचे भारतातील पहिले डिजिटल आरोग्य जोखीम मूल्यांकन सुरू केले आहे. लोकांना स्वतःसाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी तयार केलेले, प्रो-हेल्थ स्कोअर तुमच्या आरोग्याचे आणि निरोगी जीवनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक साधन आहे. हे फ्री रिस्क स्कोअर कौटुंबिक इतिहास, जीवनशैली आणि वर्तमानातील लक्षणे यासारख्या घटकांचे मूल्यांकन करते, ते तुमच्या आरोग्य स्थितीचे वैयक्तिकृत अंकीय सूचक उत्पन्न करते. तसेच तुमचे आरोग्य चांगले राहावे म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी साधे सुधारात्मक उपाय सुद्धा प्रदान करते.
डॉ. प्रीथा रेड्डी, उपाध्यक्षा, अपोलो हॉस्पिटल्स म्हणाल्या की,“आपल्या देशाच्या विकासात आरोग्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आमच्या हेल्थ ऑफ नेशन अहवालाद्वारे, आम्ही असंसर्गजन्य रोगांच्या सतत वाढणाऱ्या ओझ्याकडे लक्ष वेधण्याचा आणि जागरुकता आणण्याची आशा करतो. तसेच आमचा असा ठाम विश्वास आहे की संपूर्ण आरोग्यसेवा इकोसिस्टीम आणि राष्ट्राने एकत्र येण्याची आणि एकसंध दृष्टीकोन ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून आपण एनसीडीचा खऱ्या अर्थाने सामना करू शकू. आमच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या वाढत्या साथीच्या आजाराशी लढण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी आणि ते पलटवून लावण्यासाठी तत्काळ उपचारांची खूप गरज आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देऊन, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा उपायांना चालना देऊन आणि आरोग्यातील असमानता दूर करून शाश्वत विकासाचा मार्ग देखील मोकळा करू शकतो.”
भारतात झपाट्याने आर्थिक आणि जीवनशैलीत बदल होत असताना, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, श्वसनाचे आजार आणि कर्करोग यांसारख्या असंसर्गजन्य रोगांमध्ये (एनसीडी) वाढ होत आहे, ज्याद्वारे देशातील एकूण मृत्यूंपैकी 63% मृत्यू होतात. 2030 पर्यंत, या आजारांमुळे भारताला आर्थिक उत्पादनात 3.55 ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसेल. तथापि, सक्रिय प्रतिबंधात्मक उपायांमुळे हा प्रभाव कमी होण्यात मदत होऊ शकेल. एनसीडीच्या वाढत्या ओझ्यापासून स्वत:चे, आपल्या कुटुंबांचे आणि आपल्या समुदायांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कृती करणे महत्त्वाचे आहे. या आरोग्याच्या संकटाला कारणीभूत असलेल्या घटकांबद्दल जागरूकता वाढवणे आणि एनसीडीचा लोकांवरील वाढता प्रभाव दूर करण्यासाठी सक्रिय उपाय करणे, हा प्रो-हेल्थ रिस्क स्कोअरचा उद्देश आहे.
हेल्थ ऑफ नेशन २०२४ अहवालातील ठळक मुद्दे
१) भारतात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ आणि सरासरी वयात लक्षणीय घट २) भारतात स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्याचे सरासरी वय 52 आहे, यूएसए आणि युरोपमध्ये ते 63 आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी, निदानाचे सरासरी वय 59 वर्षे आहे, तर पश्चिमेकडील सरासरी वय 70 वर्षे आहे. ३) कोलन कर्करोगाचे 30% रुग्ण 50 वर्षांपेक्षाही कमी वयाचे आहेत.४) भारतात कर्करोग तपासणीचे प्रमाण खूपच कमी आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाच्या स्क्रीनिंगचे प्रमाण 1.9% आहे, तर यूएसए मध्ये 82%, यूकेमध्ये 70% आणि चीनमध्ये 23% आहे. भारतामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी 0.9% आहे, यूएसएमध्ये 73%, युकेमध्ये 70% आणि चीनमध्ये 43% आहे. ५) लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, लठ्ठपणा सर्व क्रॉनिक एनसीडीसाठी सर्वात सामान्य जोखीम घटक म्हणून देखील उदयास येत आहे. ६) लठ्ठपणाचे प्रमाण 2016 मध्ये 9% होते, आता 2023 मध्ये 20% पर्यंत वाढले आहे. ७) 90% स्त्रिया आणि 80% पुरुषांचे हिप रेशो हे प्रमाणापेक्षा जास्त. ८) 3 पैकी 2 भारतीयांना उच्च दाबाचा त्रास आहे, तर 66% प्री-हायपरटेन्सिव्ह अवस्थेत आहेत.९) 10 पैकी 1 व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह आहे आणि 3 पैकी 1 प्री डायबेटिक आहे. १0) भारतीयांना मोठ्या प्रमाणात ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्नियाचा धोका असतो. ११) पुरुषांना ‘ओएसए’ चा दुप्पट धोका (30%) स्त्रियांपेक्षा (15%) अधिक होता. १२) तणावामुळे उच्च रक्तदाबाचा धोका 1.5 पट वाढला. १३) महिलांमध्ये मधुमेहाचा धोका 2 पट आणि पुरुषांमध्ये 3 पट वाढला.