maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एल्‍गीकडून डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजी एस.पी.ए., इटलीसोबत बहुवार्षिक तंत्रज्ञान परवाना कराराची घोषणा

भारत, फेब्रुवारी, २०२४: एल्‍गी इक्विपमेंट्स (बी.एस.ई: ५२२०७४ एनएसई: ELGIEQUIP) या जागतिक आघाडीच्‍या एअर कॉम्‍प्रेसर उत्‍पादक कंपनीने आज डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजी एस.पी.ए., इटलीसोबतच्‍या सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत भारतात डी.व्‍ही.पी.ची प्रोप्रायटरी व्‍हॅक्‍यूम उत्‍पादनांची निर्मिती, असेम्‍बल, चाचणी व विक्री करण्‍यात येईल. या करारासह एल्‍गी व्‍हॅक्‍यूम उत्‍पादनांचा समावेश करण्‍यासाठी आपल्‍या उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये वाढ करेल. व्‍हॅक्‍यूम पंपांची उत्‍पादक डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्नॉलॉजी एस.पी.ए.ला भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या बाजारपेठेत उपस्थिती निर्माण करण्‍यासाठी एल्‍गीची प्रबळ उत्‍पादन क्षमता आणि भारतातील व्‍यापक विक्री व सेवा उपस्थितीमधून फायदा मिळेल.
”व्‍हॅक्‍यूम सहक्रियाशील आणि कॉम्‍प्रेस्‍ड एअरशी संलग्‍न आहे, तसेच एअर कॉम्‍प्रेसर्सच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. आमचा उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍यासाठी, उच्‍च विकसित बाजारपेठांपर्यंत आमची पोहोच वाढवण्‍यासाठी आणि अर्थपूर्ण तंत्रज्ञान, उत्‍पादन व विपणन समन्‍वयांचा फायदा घेण्‍यासाठी हे धोरणात्‍मक पाऊल आहे. आम्‍ही प्रथम भारतात आमचा व्‍यवसाय स्‍थापित करू आणि त्‍यानंतर जागतिक स्‍तरावर विस्‍तार करू. आम्‍हाला १९७३ पासून व्‍हॅक्‍यूम व्‍यवसायामध्‍ये असलेली कुटुंब-मालकीची कंपनी डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजीसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. डी.व्‍ही.पी. मधील टीमची मूल्‍ये आमच्‍यासारखीच आहेत आणि त्‍यांची उत्‍पादने कार्यक्षमता व दर्जासाठी प्रसिद्ध आहेत,” असे एल्‍गी इक्विपमेंट्स लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. जयराम वरदराज म्‍हणाले.
डी.व्‍ही.पी. व्‍हॅक्‍यूम टेक्‍नॉलॉजी एस.पी.ए.चे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी रॉबर्टो झुचिनी म्‍हणाले, ”हा करार डी.व्‍ही.पी.ला अत्‍यंत स्‍पर्धात्‍मक भारतीय व्‍हॅक्‍यूम बाजारपेठेत प्रवेश करण्‍याची, तसेच एल्‍गीच्‍या उत्‍पादन संरचना व वितरण नेटवर्कचा फायदा घेण्‍याची संधी देईल. याव्‍यतिरिक्‍त, कम्‍पोनण्‍ट्सच्‍या समन्‍वयात्‍मक एक्‍स्‍चेंजसाठी महत्त्‍वपूर्ण संधी आहेत, परिणामी परस्‍पर व्‍यवसाय विकास सक्षम होण्‍याची शक्‍यता आहे.”
६० वर्षांपासून एल्‍गीच्‍या अग्रणी उत्‍पादनांनी आणि कम्‍प्रेस्‍ड एअर सोल्‍यूशन्‍सनी १२० हून अधिक देशांतील उद्योगांमधील उत्‍पादन ते अन्‍न व पेये, बांधकाम, फार्मास्‍युटिकल्‍स व टेक्‍सटाइल्‍स अशा उद्योगांमधील विविध उपयोजनांमध्‍ये सेवा दिली आहे. ४०० हून अधिक उत्‍पादनांचा पोर्टफोलिओ असण्‍यासोबत तीन खंडांमध्‍ये असलेली एल्‍गीची अत्‍याधुनिक जागतिक उत्‍पादन केंद्रे कार्बन न्‍यूट्रॅलिटी, जलसंवर्धन आणि चक्रिय कचरा व्‍यवस्‍थापनाप्रती कटिबद्ध आहेत.

Related posts

टाटा मोटर्सने प्रगत गतीशीलता सोल्‍यूशन्‍स दाखवण्‍यासाठी लाँच केला अद्वितीय ग्राहक सहभाग उपक्रम – ‘ट्रक उत्‍सव’

Shivani Shetty

इझमायट्रिपद्वारे ईट्रॅव्‍ह टेकचे संपादन

Shivani Shetty

कोटक आणत आहे महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी ‘स्मार्ट चॉइस’ सुवर्णकर्ज ०.८८ टक्के इतका निश्चित मासिक व्याजदर, त्याच दिवशी वितरण, फोरक्लोजिंगच्या पर्यायांचीही ऑफर एका मल्टिमीडिया जाहिरात अभियानाद्वारे कर्ज उत्पादन बाजारात आणली जात आहे

Shivani Shetty

Leave a Comment