maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कुहूचा गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोग

मुंबई, १ मे २०२४: कुहू या भारतातील अग्रगण्‍य ऑनलाइन स्‍टुडण्‍ट लोन व्‍यासपीठाने आज देशातील प्रमुख शैक्षणिक संस्‍था गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीसोबत उल्‍लेखनीय सहयोगाची घोषणा केली. या सहयोगाचा कुहूचे प्रगत तंत्रज्ञान आणि लेंडर्सच्‍या (कर्जदाते) नेटवर्कचा फायदा घेत देशभरातील गॅल्‍गोटियास युनिव्‍ह‍िर्सिटी विद्यार्थ्‍यांना किफायतशीर आर्थिक पर्याय उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे.

कुहू शिक्षणाकरिता वित्तपुरवठा करणारी विश्‍वसनीय फॅसिलिटेटर म्हणून उदयास आले आहे, जेथे भारतभरातील ३०० हून अधिक प्रतिष्ठित संस्‍थांसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीचे विद्यार्थी अनेक फाय़द्यांचा आनंद घेऊ शकतील, ज्‍यामुळे कर्ज संपादन प्रक्रिया सुलभ व सुव्‍यवस्थित होईल. मुख्‍य फायदा म्‍हणजे कुहूसह सिंगल ऑनलाइन अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून बँका व एनबीएफसी यांसह १० हून अधिक लेंडर्सकडून कर्ज उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध होईल. हे एक-थांबा सोल्‍यूशन विद्यार्थ्‍यांना विविध पर्यायांचा शोध घेण्‍यासोबत त्‍यांची तुलना करण्‍यास, तसेच व्‍याजदर, परतावा मुदत आणि कर्जाची रक्‍कम यानुसार सर्वोत्तम कर्जाची निवड करण्‍यास सक्षम करते.

तसेच, कुहूचे प्रगत अल्‍गोरिदम्‍स विद्यार्थ्‍यांना वैयक्तिकृत लोन ऑफर्स देतील, ज्‍या त्‍यांच्‍या शैक्षणिक गरजा व आर्थिक स्थितींना अनुसरून असतील आणि सर्वोत्तम कर्ज अनुभवाची खात्री देतील. व्‍यासपीठाचे युजर-अनुकूल इंटरफेस आणि सुव्‍यवस्थित ऑनलाइन अर्ज प्रक्रिया प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणात कमी करतील, डॉक्युमेंट सबमिशन आणि मान्‍यता प्रक्रियांमध्‍ये सुलभता आणतील.

कुहूचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रशांत ए. भोंसलेम्‍हणाले, ”आम्‍हाला दर्जेदार शिक्षण सर्वांना उपलब्‍ध करून देण्‍याचा आमच्‍यासारखाच दृष्टिकोन असलेली प्रतिष्ठित संस्‍था गॅल्‍गोटियास युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगामधून भारतीय विद्यार्थ्‍यांना आर्थिक समस्‍यांबाबत चिंता न करता त्‍यांच्‍या आवडीचा कोर्स करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले सर्वोत्तम स्‍टुडण्‍ट लोन्‍स प्रदान करत आत्‍मनिर्भर करण्‍याप्रती आमची अविरत कटिबद्धता दिसून येते.”   

Related posts

केसांच्या समस्यांवर उपचारासाठी डॉ. बत्रा’जची उत्पादने

Shivani Shetty

नेस्‍ले इंडियाच्‍या ‘बायोडायजेस्‍टर प्रोजेक्‍ट’ने दुग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या शाश्‍वत भविष्‍याचा मार्ग सुकर केला

Shivani Shetty

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट

Shivani Shetty

Leave a Comment