मुंबई – १२ फेब्रुवारी २०२४: बोल्ड केअर या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या सेक्स्युअल हेल्थ अॅण्ड वेलनेस ब्रॅण्डने बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंगसोबत सहयोगाने त्यांची अद्वितीय व कुशल मोहिम #TakeBoldCareOfHer च्या लाँचची घोषणा केली आहे. रणवीर सिंग ब्रॅण्डसोबत सह-संस्थापक म्हणून सामील झाला आहे, तसेच वर्षभरापासून त्यांच्यासोबत पडद्यामागून काम करत आहे. या मोहिमेसह बोल्ड केअरचा पुरूषांच्या लैंगिक आरोग्याबाबत गैरसमजांना दूर करण्याचा उद्देश आहे. बोल्ड केअरच्या या उत्साहवर्धक दृष्टिकोनाचा समाज पुरूषांच्या लैंगिक आरोग्य समस्यांबाबत करणाऱ्या चर्चेच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याचा आणि या समस्या सामान्य असण्यासोबत त्यांचे सहजपणे निराकरण करता येऊ शकते हे दाखवून देण्याचा मनसुबा आहे.
या मोहिमेमध्ये प्रसिद्ध इंटरनेट व्यक्तिमत्त्व जॉनी सिन्स हे देखील सामील आहेत, जे पहिल्यांदाच भारतीय ब्रॅण्डसाठी जाहिरातीमध्ये दिसणार आहेत. ब्रॅण्डची जाहिरात सामान्य भारतीय टेलिव्हिजन ड्रामाचा विनोदी उपहास आहे, जी प्रेक्षकांना अचंबित करेल. ही जाहिरात कुशलपणे विनोदी सीक्वेन्सेसच्या माध्यमातून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते, तसेच वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित सोल्यूशन सादर करते. तन्मय भट, देवय्या बोपान्ना आणि त्यांच्या टीमचे लेखन असलेल्या या जाहिरातीचे दिग्दर्शन अयप्पा केएम यांनी केले आहे. तन्मय आणि अयप्पा यांनी यापूर्वी अनेक यशस्वी जाहिरात मोहिमांवर एकत्र काम केले आहे, जसे राहुल द्रविड x क्रेड जाहिरात. देशातील आघाडीचे अॅड प्रॉडक्शन हाऊस अर्लीमॅन फिल्म्सने ब्रॅण्ड जाहिरातीची निर्मिती केली आहे.
बोल्ड केअरचे सह-संस्थापक रजत जाधव या मोहिमेच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाबाबत मत व्यक्त करत म्हणाले, ”#TakeBoldCareofHer सह आमचा भारतातील पुरूषांच्या लैंगिक आरोग्याबाबत गैरसमज दूर करण्याचा मनसुबा आहे. तसेच, आमचा या क्षेत्रात कॅटेगरी क्रिएटर असण्याचा आणि लैंगिक आरोग्याबाबत खुल्यामनाने चर्चा सुरू करण्याचा उद्देश आहे. आम्ही पुरूषांना विज्ञानाचे पाठबळ असलेले सोल्यूशन्स प्रदान करत त्यांच्या लैंगिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यास मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.”
बोल्ड केअरचे सह-संस्थापक रणवीर सिंग म्हणाले, ”माझ्या प्रभावाचा उपयोग करत जागरूकता पसरवण्याचा आणि सकारात्मक परिणाम घडवून आणण्याचा माझा मनसुबा आहे. बोल्ड केअर मोहिम चर्चेचा विषय बनण्यासह मिशन आहे, जिच्याशी मी दृढपणे संलग्न आहे आणि मी पुरूषांच्या लैंगिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी या मोहिमेमध्ये सामील झालो आहे. या मोहिमेचा देशभरातील अशा समस्यांनी पीडित लाखो व्यक्तींना सर्वोत्तम सोल्यूशन्स देण्याचा मनसुबा आहे.”
Video link – https://www.youtube.com/watch?v=wHQcuVnmi58&t=3s