(मुंबई, २ फेब्रुवारी २०२४)– व्हिएटजेट एव्हिएशन जॉइंट स्टॉक कंपनीने(HOSE: VJC) २०२३ सालात उत्तम व्यावसायिक कामगिरीची घोषणा केली असून, त्याद्वारे जागतिक विमानप्रवास उद्योगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व स्थितीस्थापक कंपन्यांपैकी एक म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. कंपनीने आपले आंतरराष्ट्रीय जाळे अविश्रांतपणे विस्तारले आहे आणि त्यायोगे आशिया–पॅसिफिक भागात पर्यटन पूर्वपदावर आणणे तसेच त्याचा विकास, गुंतवणूक व व्यापार यांना वेग दिला आहे. विकासास वेग दिला आहे.
२०२३ सालात व्हिएटजेटने १३३,००० विमानसेवा चालवल्या आणि २५.३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली (व्हिएटजेट थायलंड वगळून). मागील वर्षाच्या तुलनेत ही १८३ टक्के वाढ आहे. यापैकी ७.६ दशलक्षांहून अधिक प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील होते. गेल्या वर्षात व्हिएटजेटने आपल्या विमानसेवेच्या नेटवर्कमध्ये वाढ केली. ३३ नवीन आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत मार्गांवर विमाने सुरू केली आणि आपल्या एकूण मार्गांची संख्या १२५ वर नेली. यामध्ये ८० आंतरराष्ट्रीय तर ४५ देशांतर्गत मार्गांचा समावेश होतो. यापैकी काही दखलपात्र मार्ग म्हणजे हो चि मिन्ह सिटी– शांघाय, हो चि मिन्ह सिटी– व्हिएटिआने, हनोई–सिएम रीप, हनोई– हाँगकाँग, फु कोक– ताईपेई आणि फु कोक–बुसान.
व्हिएटजेट ही व्हिएतनाम व भारत यांच्यात सेवा देणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. व्हिएतनामला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, कोची व तिरुचिरापल्ली याशहरांशी जोडणारी विमानसेवा ही कंपनी देते. सध्या या दोन देशांमध्ये आठवडाभरात ३५ राउंड–ट्रिप्स केल्या जातात. व्हिएतनामला सिडनी, मेलबर्न, पर्थ, अॅडलेड आणि ब्रिस्बेन या ऑस्ट्रेलियातील पाच सर्वांत मोठ्या शहरांशी जोडणारी व्हिएटजेट ही पहिली एअरलाइन कंपनी ठरली आहे. व्हिएटजेटने या वर्षात ८१,५०० टन मालाची वाहतूक केली आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ७३ टक्के अधिक आहे.
व्हिएटजेटने २०२३ मध्ये सुमारे २.१८ अब्ज डॉलर्स एवढ्या स्वतंत्र उत्पन्नाची तसेच सुमारे २.५५ अब्ज डॉलर्स एकत्रित उत्पन्नाची नोंद केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत उत्पन्नांमध्ये अनुक्रमे ६२ आणि ५६ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या स्वतंत्र व एकत्रित करोत्तर नफ्याचे आकडे अनुक्रमे सुमारे २८.५ दशलक्ष डॉलर्स व १४ दशलक्ष डॉलर्स एवढे होते.
केवळ २०२३च्या चौथ्या तिमाहीत, स्वतंत्र व एकत्रित उत्पन्न सुमारे ६०९.४७ दशलक्ष आणि सुमारे ७६८.८६ दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचले होते, मागील वर्षाच्या तुलनेत हे आकडे अनुक्रमे ८९ टक्के व ४९ टक्के अधिक आहेत. तिमाहीत स्वतंत्र व एकत्रित करोत्तर नफ्याचे आकडेही अनुक्रमे सुमारे २.८५ दशलक्ष डॉलर्स आणि सुमारे ६.२१ दशलक्ष डॉलर्स एवढे आहेत.
पूरक आणि मालवाहतूक उत्पन्न सुमारे ७७३.०८ दशलक्ष डॉलर्स असून,मागील वर्षाच्या तुलनेत त्यात तब्बल ४६ टक्के वाढ झाली आहे. एअरलाइन कंपनीच्या एकूण विमान वाहतूक उत्पन्नात या उत्पन्नाचा वाटा ४० टक्के आहे.
३१ डिसेंबर, २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, व्हिएटजेटची एकूण मालमत्ता सुमारे ३.४६ अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. कंपनीने तीन अत्याधुनिक एथ्री२१निओ एअरक्राफ्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे वर्षाच्या सुरुवातीपासून ती सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे डेट–टू–इक्विटी गुणोत्तर २ असून, ३ ते ५ या सामान्य जागतिक श्रेणीहून ते बरेच कमी आहे. व्हिएटजेटचे रोखता गुणोत्तर १.२४ होते. विमानवाहतूक उद्योगाच्या दृष्टीने ते चांगल्या स्थितीत आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, रोख व तत्सम स्वरूपातील जमा रक्कम सुमारे २०५.३८ दशलक्ष डॉलर्स आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुपटीहून अधिक आहे. त्यामुळे कंपनीची आर्थिक क्षमता भक्कम असल्याची खात्री मिळते. अर्थ मंत्रालयाच्या निकषांनुसार कंपनीची क्रेडिट रेटिंग्जही उत्तम आहेत.
कामकाजाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी व्हिएटजेटने आधुनिक, सुरक्षित व पर्यावरणपूरक ताफ्यामध्ये गुंतवणुकीचे धोरण कायम ठेवले आहे. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी उपलब्ध आकडेवारीनुसार, व्हिएटजेटच्या ताफ्यात १०५ विमाने आहेत. त्यामध्ये ऐसपैस (वाइड–बॉडी) ए330चा समावेश आहे.
व्हिएतनाम व अमेरिका यांच्यातील व्यापारामध्ये योगदान देत, व्हिएटजेटने गेल्या वर्षी बोइंगसोबत एक करार केला. पुढील ५ वर्षे 200 737 मॅक्स विमानांची डिलिव्हरी कायम ठेवण्यासाठी हा करार करण्यात आला. त्याचप्रमाणे कंपनीने परदेशी वित्तीय संस्थांसोबत अब्जावधी डॉलर्सचे विमानांसाठी कर्ज पुरवठ्याचे करारही केले आहेत.
व्हिएटजेटने स्कायजॉय लॉयल्टी कार्यक्रमही सुरू केला आहे. त्यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आमच्या २५० ब्रॅण्ड्च्या सहाय्याने रिवॉर्ड्स रिडीम करण्याची मुभा मिळते. २०२३ मध्ये या कार्यक्रमाने १ कोटी सदस्यांचा टप्पा गाठला. व्हिएटजेटने प्रवाशांसाठी नवीन नवोन्मेष्कारी व सोयीस्कर उत्पादने व सेवा सुरू केल्या आहेत. ‘फ्लाय नाउ पे लेटर’ ही सेवा प्रवाशांना विमानप्रवासासाठी आर्थिक सहाय्य देऊ करते.
व्हिएटजेटला एअरलाइनरेटिंग्जतर्फे सर्वांत सुरक्षित कमी खर्चाचील विमान कंपन्यांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. एअरलाइनरेटिंग्ज ही विमान कंपन्यांच्या सेवेचे व सुरक्षिततेचे मूल्यमापन करणारी एक विश्वासार्ह संस्था समजली जाते.
सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा भाग म्हणून कंपनीने गेल्या वर्षभरात असंख्य परिषदा, प्रशिक्षण वर्ग, सिम्युलेशन्स यांचे आयोजन केले. यामध्ये क्वालिटी अँड सेफ्टी कॉन्फरन्स, इसागो (इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड फॉर ग्राउंड ऑपरेशन्स), सुरक्षितता प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद सिम्युलेशन यांचा समावेश होतो. विमानसेवा कामकाजात संपूर्ण सुरक्षितता व संरक्षण राखण्यासाठी सक्रिय राहण्याचे उद्दिष्ट या सर्व उपक्रमांमागे होते.
पर्यटन, गुंतवणूक, व्यापार व सांस्कृतिक आदानप्रदान यांच्या विकासात लक्षणीय योगदान देत व्हिएटजेटने २०२३ सालात आंतरराष्ट्रीय जाळ्याचा विस्तार व वार्षिक उत्पन्न या क्षेत्रात आपले नवीन विक्रम प्रस्थापित केले.