maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsआंतरराष्ट्रीयजीवनशैलीज्वेलरीठळक बातम्याप्रदर्शनमहाराष्ट्रव्यवसाय

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई, ५ जानेवारी २०२४: रत्ने आणि दागिने यांच्या वार्षिक ३७ अब्ज अमेरिकन डॉलर निर्यातीमध्ये ७२% वाटा मुंबईचा आहे यामुळे हा उद्योग खऱ्या अर्थाने मुंबईचाच आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय डॉ. देवेंद्र फडणवीस यांनी केले. जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) द्वारे बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IIJS सिग्नेचर अँड IGJME 2024 या दुहेरी प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

प्रथमच नवीन वर्षाचा पहिला सर्वोत्तम डिझाइन केंद्रित ज्वेलरी ट्रेड शो IIJS सिग्नेचर (इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो सिग्नेचर) आणि जोडीला इंडिया जेम अँड ज्वेलरी मशिनरी एक्स्पो (IGJME) मुंबईतील दोन ठिकाणी आयोजित केले जात आहे: बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, नेस्को, गोरेगाव (५-८ जानेवारी) आणि जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी (४-७ जानेवारी).

डॉ.देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय श्री.उदय सामंत या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी DGEP च्या महासंचालक सुश्री रेश्मा लखानी, डी बिअर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री पॉल रॉली; रिलायन्स ज्वेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील नायक; GJEPC अध्यक्ष श्री विपुल शहा; GJEPC उपाध्यक्ष श्री किरीट भन्साळी; श्री. नीरव भन्साळी (संयोजक, राष्ट्रीय प्रदर्शन, GJEPC); श्री सब्यसाची रे (ED, GJEPC) यांच्यासह आंतरराष्ट्रीय आणि भारतीय हिरे, रत्न आणि दागिने क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित होते.

IIJS सिग्नेचरमध्ये बोलताना डॉ. फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी २०३० पर्यंत रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीसाठी ७५ अब्ज अमेरिकन डॉलरचे उद्दिष्ट ठेवले आहे. GJEPC या सर्वोच्च संस्थेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे हे शक्य होईल. भारताला जागतिक रत्न आणि दागिने उद्योगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय घटकांपैकी एक बनवण्यात GJEPC ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सरकारने SEEPZ येथे नवीन कॉमन फॅसिलिटी सेंटर (CFC) अवघ्या १७ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी GJEPC सोबत जवळून काम केले आहे आणि यामुळे रत्न आणि दागिने निर्यातदार विशेषत: एमएसएमईंना त्रासमुक्त शिपमेंट, कागदपत्रांची पूर्तता आणि सुलभ पद्धतीने व्यवसाय करणे शक्य होईल. महाराष्ट्र सरकार आणि GJEPC यांनी नवी मुंबई येथील न्यू इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी सहयोग केला आहे आणि या उपक्रमामुळे निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यातही मदत होईल. ज्वेलरी पार्क रत्ने आणि दागिने उद्योगातील नवीन परिसंस्था निर्माण करेल आणि त्यामध्ये महाराष्ट्र एक प्रमुख निर्यातदार म्हणून आपला लौकिक टिकवून ठेवेल तसेच रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातीत नवीन विक्रम प्रस्थापित करेल. कालचक्रामध्ये भारतीय दागिने पूर्वापार जागतिक व्यापाराचा भाग आहेत. पण हा केवळ आर्थिक व्यवहार नसून त्यात भावनिक गुंतवणूकही असते. जसजसा भारत समृद्ध होत आहे आणि अर्थव्यवस्था आणि उद्योग विस्तारत आहे तसतसा महाराष्ट्र नवीन गुंतवणूक करण्यात अग्रेसर राहील. महाराष्ट्र शासन रत्न आणि दागिने उद्योजकांना व्यवसाय करण्यास सुलभता आणि व्यवसायातील खर्च यासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये मदत करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राने १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले असताना आम्ही GJEPC सोबत एकमेवाद्वितीय परिसंस्थेचे प्रतीक असलेल्या भारत डायमंड बोअर्स सारख्या वैशिष्ट्यपूर्ण संस्था निर्माण करण्यासाठी सहकार्य करत राहू. आणि GJEPC ला कोणतीही नवीन परिसंस्था तयार करायची असेल तेव्हा त्यांची नैसर्गिक आणि पहिली पसंती महाराष्ट्र असावी.”

महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी GJEPC ला ग्रामीण भारतात स्वदेशी रत्न आणि दागिने उद्योग विकसित करण्याचे आवाहन केले.

पाठबळ आणि दूरदृष्टी याबद्दल डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानताना GJEPC चे अध्यक्ष श्री. विपुल शाह म्हणाले, “आता, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने नवी मुंबईत ज्वेलरी पार्क येत असल्याने, आमचा उद्योग परदेशातून अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी सज्ज होत आहे. ज्वेलरी पार्क आपल्यासोबत अनेक शासन समर्थित लाभ घेऊन येत आहे. प्रक्रिया सुलभ आणि जलद बनवत मैत्री धोरणांतर्गत सरकारी मंजुरीसाठी सिंगल विंडो क्लीयरन्ससह हे वन-स्टॉप-शॉप आहे. जोडीला, राज्य सरकारने इतर लाभांमध्ये ऊर्जा टेरिफ वीज शुल्क यात सवलत देऊ केली आहे. पार्कमध्ये एक समृद्ध वातावरण निर्माण करायला चालना देत कार्यक्षमता आणि कामकाज खर्च कमी करण्याची खात्री करून हे उपक्रम व्यवसायांसाठीचा मार्ग लक्षणीयरीत्या सुलभ करतात.”

मुंबईतील SEEPZ मधील मेगा CFC बद्दल बोलताना श्री. शाह म्हणाले, “GJEPC ने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने मुंबईतील SEEPZ येथे एक मेगा CFC ची स्थापना केली असून ते लवकरच सुरू होईल. उद्योगक्षेत्राची उत्पादन क्षमता उंचावणे, तांत्रिक प्रगतीला चालना देणे आणि कौशल्य विकासाच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणे हे या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.”

शाह म्हणाले, “२०३० पर्यंत ५ ट्रिलियन अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे आणि २०४७ पर्यंत विकसीत राष्ट्र बनण्याचे आपल्या प्रिय पंतप्रधानांचे स्वप्न भारतीय रत्न आणि दागिने उद्योगाचेही आहे. विकसीत भारत होण्याच्या त्या संकल्पात भाग घेण्यासाठी २०३० पर्यंत ७५ अब्ज अमेरिकन डॉलर निर्यात आणि २०४७ पर्यंत १०० अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे. भारतीय रत्न उद्योगामध्ये महाराष्ट्र आधीपासूनच आघाडीवर आहे आणि मला खात्री आहे की आम्ही उच्च उद्दिष्टे ठेवल्यामुळे महाराष्ट्र देशातून निर्यातीत आघाडीवर राहील.”

GJEPC च्या IIJS सिग्नेचरच्या १६ व्या सत्रात ८०० भारतीय शहरे आणि ६० देशांमधून ३०,००० हून अधिक अभ्यागत (आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसह) येतील. या शोमध्ये १,५०० हून अधिक प्रदर्शकांचे १.२५ लाख चौ.मी. प्रदर्शन क्षेत्रात ३,००० हून अधिक स्टॉल्स आहेत.

GJEPC चे उपाध्यक्ष श्री किरीट भन्साळी यांनी डॉ. देवेंद्र फडणवीस यांना GJEPC च्या इंडिया ज्वेलरी पार्कजवळ कामगारांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी जमिनीच्या याचिकेवर आणि देशातील पहिल्यावहिल्या जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ याबद्दल विचार करण्याची विनंती केली.

“एकट्या IIJS सिग्नेचर शोमुळे तब्बल ३५,००० कोटी रुपयांचा व्यवसाय होत आहे. तिन्ही IIJS शोच्या एकत्रित परिणामाचा विचार केल्यास निर्माण होणारा एकूण व्यवसाय १.२५ लाख कोटी रुपये इतका प्रभावशाली असेल. यामुळे जागतिक रत्न आणि दागिने उद्योगात IIJS खरोखरच अतुलनीय व्यासपीठ म्हणून प्रस्थापित होते,” असे GJEPC चे राष्ट्रीय प्रदर्शनांचे निमंत्रक नीरव भन्साळी म्हणाले.

 

Related posts

मुंबईतील प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल यांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरी टोकाचं पाऊल

cradmin

टाटा मुंबई मॅरेथॉन, काळा घोडा कला महोत्सव व इतरांची मुंबई फेस्टिव्हल 2024 सह भागीदारी

Shivani Shetty

आयडीपी एज्‍युकेशनचे बोरीवली येथे भारतातील त्‍यांच्‍या ७७व्‍या कार्यालयाचे उद्घाटन

Shivani Shetty

Leave a Comment