Link to TVC: https://www.youtube.com/watch?v=4SiV-jnlJxs
कोका-कोला इंडियाचा स्वदेशी वारसा ब्रँड लिम्का या भारतातील लोकप्रिय लेमनी फ्लेवर्ड ड्रिंकने नवीन उत्साहवर्धक मोहिम #TravelWithLimca लाँच केली आहे. लिम्का गर्ल म्हणून तृप्ती डिमरीला लाँच करत ही मोहिम जगभरातील व्यक्ती आपल्या सभोवतालच्या भागांमधील गोष्टींचा शोध घेण्याची वाट पाहत आहेत या संकल्पनेवर निर्माण करण्यात आली आहे. #TravelWithLimca मोहिम व्यक्तींना त्यांच्या शहरांमधील नवीन हॉटस्पॉट्सचा शोध घेण्यास प्रेरित करते.
स्टुडिओ एक्स यांची संकल्पना असलेली मोहिमेची जाहिरात प्रेक्षकांना तृप्ती डिमरीसोबत उत्साहपूर्ण प्रवासावर घेऊन जाते, जेथे ती बस राइडवर जाते, जी तिला उत्साहवर्धक शहराचा शोध घेण्याच्या प्रवासावर घेऊन जाते. रस्त्यांमधून बस राइड करत असताना अल्टिमेट थर्स्ट क्वेन्चर लिम्काचा पहिला सिप तिच्यामध्ये उत्साह व उत्सुकतेची भावना जागृत करतो. रिफ्रेशिंग टेस्टसह ऊर्जा मिळालेल्या तृप्तीचा प्रवास रोमांचक वळणावर जातो, जेथे तिला शहरातील अद्वितीय गंतव्यांचा अनुभव मिळतो. गजबजलेल्या बाजारपेठांपासून रस्त्यावरील स्नॅक शॉप्सपर्यंत तिला उत्साहवर्धक अनुभव मिळतो आणि ती ग्राहकांना रिफ्रेशिंग लिम्कासह शहरामध्ये फेरफटका मारण्याचे आवाहन करते.
लिम्का परिवारामध्ये सामील होण्याबाबत आपला आनंद व्यक्त करत तृप्ती डिमरी म्हणाल्या, ”मला लिम्काचा भाग असण्याचा आनंद होत आहे. मला नवीन गंतव्यांचा शोध घेण्यासोबत विविध संस्कृतींचा अनुभव घ्यायला आवडतो. मला इतरांना देखील तसे करण्यास प्रेरित करण्याचा आनंद होत आहे. लिम्कासोबत सहयोगाने मी नवीन गंतव्यांचा शोध घेण्याचा हा उत्साहवर्धक प्रवास सुरू करण्यास उत्सुक आहे.”
कोका-कोला कंपनीमधील इंडिया व साऊथ-वेस्ट एशिया ऑपरेटिंग युनिटच्या हायड्रेशन, स्पोर्टस् अँड टी कॅटेगरीच्या मार्केटिंगच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, ”लाइम व लेमनी क्रेडेन्शियल्सच्या वारसासह लिम्का ५ दशकांपासून आपल्या अद्वितीय टेस्टसह ग्राहकांना उत्साहित करत आहे. आम्हाला #TravelWithLimca मोहिम लाँच करण्याचा आनंद होत आहे, ज्यामध्ये आमचा नवीन लिम्का चेहरा तृप्ती डिमरी आहे. या मोहिमेसह आम्ही व्यक्तींना त्यांच्या स्वत:च्या शहरामधील मोहक गंतव्यांचा शोध घेण्यास आणि थंडगार लिम्कासह रिफ्रेश होण्यास प्रेरित करण्याची आशा करतो.”
स्टुडिओ एक्सचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर मुकुंद व्हीएमएल म्हणाले, ”आपल्या स्वत:च्या शहरामध्ये अनेक गंतव्य आहेत, ज्यांचा अजूनही शोध घेणे बाकी आहे. #TravelWithLimca मोहिम शहरातील गंतव्यांचा उत्साहात शोध घेण्यास प्रेरित करते. जाहिरातीमध्ये बस स्टॉपचे नाव, वर्णन अशा शहरातील विविध गोष्टींना दाखवण्यात आले आहे. उत्साही असलेल्या तृप्तीसोबत काम करणे उत्तम होते, तसेच ती परिपूर्ण लिम्का गर्ल देखील आहे.”
या मोहिमेचा भाग म्हणून ब्रँड ३० जूनपर्यंत प्रमोशनल ऑफर राबवणार आहे, जेथे ग्राहकांना डीएमआरसी, इझमायट्रिपकडून ट्रॅव्हल वाऊचर्स जिंकण्याची संधी मिळेल, ज्यासाठी लिम्का बॉटलवरील कोड स्कॅन करण्याची गरज आहे. नवनवीन गंतव्यांचा शोध घेण्याचा आनंद घ्या आणि www.travelwithlimca.coke2home.com वर प्रवासाशी संबंधित अनेक कन्टेन्टना अनलॉक करा.
#TravelWithLimca मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी आणि अॅडव्हेन्चरमध्ये सामील होण्यासाठी लिम्काला Instagram येथे फॉलो करा किंवा www.travelwithlimca.coke2home.com येथे भेट द्या.