maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गेम्‍सक्राफ्टकडून रम्‍मीकल्‍चरसाठी ट्रस्‍ट रिपोर्ट जारी, ज्‍यामधून निष्‍पक्ष व जबाबदार गेमिंगप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते

बेंगळुरू, फेब्रुवारी २१, २०२४: उल्‍लेखनीय व अग्रणी पुढाकार घेत भारतातील आघाडीच्‍या स्‍वदेशी स्किल ऑनलाइन गेम्‍स कंपनी गेम्‍सक्राफ्टने त्‍यांचे प्रख्‍यात ऑनलाइन रम्‍मी व्‍यासपीठ रम्‍मीकल्‍चरसाठी ट्रस्‍ट रिपोर्ट जारी केला आहे, ज्‍यामधून व्‍यासपीठाच्‍या निष्‍पक्ष पद्धती, प्‍लेअर सपोर्ट उपाययोजना आणि सुरक्षित अंमलबजावणीबाबत सर्वसमावेशक माहिती मिळते. हा अद्वितीय रिपोर्ट व्‍यासपीठावर खेळल्‍या जाणाऱ्या विविध श्रेणींबाबत आकडेवारी देतो आणि वापरकर्त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी घेतलेल्‍या प्रतिक्रियांबाबत सविस्‍तर माहिती देतो.

गेम्‍सक्राफ्ट त्‍याच्‍या रम्‍मीकल्‍चर वेबसाइटवर दरमहिन्‍याला सविस्‍तर माहिती देणारा हा रिपोर्ट जारी करण्‍याप्रती कटिबद्ध आहे.
स्किल रिअल मनी गेमिंग (आरएमजी) उद्योगामधील अग्रणी ऑपरेटर रम्‍मीकल्‍चरचा रिपोर्ट महत्त्वाचा असून क्षेत्राच्‍या क्षमतेला सादर करतो. अनेक वर्षांपासून नियामक अनिश्चितता, गंभीर बाजारपेठ स्थिती आणि नकारात्‍मक भावनेमुळे आरएमजी कंपन्‍यांना वापरकर्त्‍यांच्‍या कमी विश्‍वासाचा सामना करावा लागत असल्यामुळे ट्रस्‍ट रिपोर्ट जनतेमध्‍ये प्रबळ आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासह गैरसमजांना दूर करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल आहे, ज्‍यामुळे व्‍यापक कौशल्‍य आधारित ऑनलाइन गेम्‍स समुदायाशी संलग्‍न सामान्‍य गैरसमजांना दूर करण्‍यास मदत होईल.
रम्‍मीकल्‍चर ट्रस्‍ट रिपोर्टची काही ठळक वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे: (डेटा डिसेंबर २०२३ पर्यंतचा आहे)
● फेअर प्‍ले
o फेअरप्‍लेचे उल्‍लंघन करण्‍यासाठी ब्‍लॉक करण्‍यात आलेल्‍या खेळाडूंची संख्‍या: १,४८४
o फेअरप्‍लेचे उल्‍लंघन केल्‍यामुळे रद्द करण्‍यात आलेल्‍या गेम्‍सची संख्‍या: ९०० पेक्षा कमी.
o खेळाडूंकडून फेअरप्‍लेसंदर्भात करण्‍यात आलेल्‍या उल्‍लंघनांची संख्‍या: ८८
⮚ कार्यवाही करण्‍यासाठी वैध ठरलेले रिपोर्ट्स: १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी.
⮚ फेअरप्‍लेसंदर्भात उल्‍लंघनांचे निराकरण करण्‍यासाठी टर्नअराऊंड वेळ: १ तासापेक्षा कमी
● जबाबदार गेमिंग
o ‘युअर दोस्‍त’ (स्‍वतंत्र थर्ड पार्टी ऑनलाइन समुपदेशक आणि इमोशनल वेलनेस पार्टनर) मदत मिळालेल्‍या खेळाडूंची संख्‍या: ३६
● सपोर्ट
o कस्‍टमर सपोर्टसाठी करण्‍यात आलेल्‍या कॉल्‍सची संख्‍या: ५६,७४२
⮚ समस्‍यांचे निराकरण करण्‍याची टक्‍केवारी: ९५ टक्‍के समस्‍या ३० मिनिटांपेक्षा कमी वेळेत निराकरण करण्‍यात आल्‍या.
⮚ कस्‍टमर सपोर्ट सॅटिस्‍फॅक्‍शन स्‍कोअर (सीएसएटी): ९५
● विद्ड्रॉअल
⮚ विद्ड्रॉअल प्रक्रिया करण्‍यासाठी सरासरी वेळ – ४ सेकंद
रम्‍मीकल्‍चरच्‍या युजर सेवा जसे वापरकर्त्‍यांना गेम इनसाइट्स देणे, ज्‍यामुळे त्‍यांना खेळाडू म्‍हणून त्‍यांची कौशल्‍ये विकसित होण्‍यास मदत होते, अशा सेवांनी ब्रॅण्‍डचा देशातील विश्‍वसनीय रम्‍मी अॅप म्‍हणून दर्जा दृढ केला आहे. या प्रबळ ग्राहक-केंद्रित पैलूमध्‍ये युजर अनुभवाला प्राधान्‍य देणाऱ्या प्रबळ कार्यक्षमतांमुळे अधिक वाढ झाली आहे. शिस्‍तबद्ध प्‍लेअर टेबल प्रोटोकॉल्‍सपासून खेळाडूंना अनफेअर फायदे न मिळण्‍याची खात्री देणाऱ्या सर्वोत्तम अल्‍गोरिदम्‍सपर्यत व्‍यासपीठ पारदर्शक असण्‍यासाठी उद्योग-अग्रणी पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करते. रम्‍मीकल्‍चरचा फेअर प्‍ले उल्‍लंघनांप्रती झीरो-टोलेरन्‍स दृष्टिकोन देखील आहे, जेथे उल्‍लंघनांना ओळखण्‍यासाठी आणि गुन्‍हेगारांवर कायमची बंदी घालण्‍यासाठी अॅण्‍टी-चीट यंत्रणांचा वापर केला जातो.
गेम्‍सक्राफ्टच्‍या सह-संस्‍थापकीय सदस्‍य दिव्‍या अलोक म्‍हणाल्‍या, ”आमचा ट्रस्‍ट रिपोर्ट आमच्‍या वापरकर्त्‍यांसोबत असलेल्‍या दृढ संबंधांना सार्थ ठरवतो, तसेच त्‍यांच्‍या हितांचे संरक्षण करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेची पुष्‍टी देतो. हा रिपोर्ट जारी करण्‍यासह आम्‍ही स्किल ऑनलाइन गेमिंगप्रती पारदर्शकता व सुलभता वाढवण्‍याची, आम्‍ही कार्यान्वित करणाऱ्या सिस्‍टम्‍स, प्रक्रिया व तंत्रज्ञानांमध्‍ये विश्‍वास निर्माण करण्‍याची आशा करतो. आम्‍ही आमच्‍या उत्‍पादनांच्‍या वापर करणाऱ्या व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या विश्‍वासाला महत्त्व देतो, तसेच सर्वोत्तम अनुभव देतो याची खात्री देणे हे क्षेत्राच्‍या भविष्‍यासाठी महत्त्वाचे आहे.”
रम्‍मीकल्‍चरची खेळाडूंच्‍या सुरक्षिततेप्रती सातत्‍यपूर्ण कटिबद्धता त्‍यांचे शिस्‍तबद्ध थर्ड-पार्टी ऑडिट्स व सर्टिफिकेशन्‍समधून दिसून येते. अॅप ISO 9001:2015 प्रमाणित, एसएसएल सुरक्षित आणि आरएनजी प्रमाणित आहे. तसेच, अॅपमध्‍ये नो-बोट सिस्‍टम आहे आणि व्‍यापक प्रमाणात खेळाडूंची हाताळणी करताना त्‍वरित पेआऊट्स देते. अॅपची टेक्निकल क्षमता २०२० मध्‍ये जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रम्‍मी टूर्नामेंट – गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड आयोजित केल्‍यानंतर प्रकर्षाने दिसून आली.
संपूर्ण रिपोर्टसाठी कृपया भेट द्या: https://www.rummyculture.com/

Related posts

एचसीसीबी महाराष्‍ट्रातील ५,५०० व्‍यक्‍तींना अपस्किल करण्‍यासह १४ गावांमध्‍ये सामुदायिक प्रकल्‍प राबवणार

Shivani Shetty

फिजिक्सवालाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल ५१,००० विद्यार्थ्यांची फी माफ केली

Shivani Shetty

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Shivani Shetty

Leave a Comment