औषधांचे परिवहन करणे हे औषधांच्या पॅकेजेसचा पुरवठा करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. फार्मासीजनी आरोग्यावर होणारे परिणाम टाळण्यासाठी वेळेत योग्य ठिकाणी योग्य औषधांचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक आहे. कमी विकसित क्षेत्रांमध्ये औषधे उपलब्ध नसल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. तापमान-संवेदनशील औषधे, लस व बायोलॉजिक्स यांची परिणामकारता कायम ठेवण्यासाठी आणि रूग्णांकरिता सुरक्षित आणण्यासाठी काळजीपूर्वक हाताळणी केली पाहिजे. महेश कार्गा मूव्हर्स (एमसीएम) ही फार्मास्युटिकल क्षेत्रातील रेफ्रिजरेटेड ट्रान्सपोर्टेशनमधील आघाडीची कंपनी आहे.
श्री. गिरीश बियानी यांच्या नेतृत्वांतर्गत महेश कार्गो मूव्हर्सची स्थापना २८ वर्षांपूर्वी लॉजिस्टिक्स अग्रणी म्हणून करण्यात आली. कंपनी तापमान-नियंत्रित परिवहन व नियामक अनुपालनामध्ये निपुण आहे. कंपनीच्या धोरणात्मक दृष्टिकोनाने विकास व कार्यरत सर्वोत्तमतेला चालना दिली आहे. २५० व्यावसायिक वाहने आणि प्रगत कोल्ड चेन तंत्रज्ञानासह एमसीएम सातत्याने कार्गो प्रवाहाची खात्री देते, भारतभरात दररोज ५०,००० किमीहून अधिक अंतरापर्यंत सुरक्षितपणे परिवहन सेवा देते. महामारी काळादरम्यान एमसीएमने मानवी आरोग्याची काळजी घेण्याकरिता नेपाळ, भूतान व काश्मीर यांसारख्या दुर्गम प्रदेशांपर्यंत औषधांचे वितरण केले. कंपनीच्या समर्पिततेमुळे कंपनीने फार्मास्युटिकल लॉजिस्टिक्समध्ये अद्वितीय ट्रॅक रेकॉर्ड प्राप्त केला आहे.
महेश कार्गो मूव्हर्सच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये कंटेनर सिक्युरिटीसाठी मोबाइल अॅप-नियंत्रित डिजिटल लॉक्स, वार्षिक वॉटर लीक टेस्ट्स, जीपीएस-सुसज्ज वाहने आणि अचूक तापमान देखरेख यांचा समावेश आहे. विविध प्रांतांमध्ये कार्यरत असलेली एमसीएम विश्वसनीयता व तंत्रज्ञान प्रगतीसाठी टाटा मोटर्सवर अवलंबून आहे, जेथे कंपनीच्या ताफ्यामध्ये २०० हून अधिक टाटा व्यावसायिक वाहने आहेत. टाटा मोटर्सच्या तंत्रज्ञानांनी जीपीएस ट्रॅकिंग, ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स आणि फ्यूएल इकॉनॉमीसह परिवहन कार्यक्षमता व सुरक्षिततेमध्ये सुधारणा केल्या आहेत. नाविन्यताप्रती कटिबद्धता आणि ग्राहक समाधानाप्रती समर्पिततेसाठी हे तंत्रज्ञान मान्यताकृत आहे.
टाटा मोटर्सच्या ट्रक्स विभागाचे उपाध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, ”आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहोत. आम्हाला महेश कार्गो मूव्हर्सच्या यशामधील आमच्या भूमिकेचा अत्यंत अभिमान वाटतो, ज्यामधून सर्वोत्तमतेप्रती आमची अविरत समर्पितता दिसून येते. आमच्या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही दर्जाप्रती कटिबद्ध आहोत आणि एमसीएमच्या यशामध्ये आमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आमच्या सर्व वापरकर्त्यांना, विशेषत: ड्रायव्हर्सना प्राधान्य देणे याची आम्ही सर्वाधिक खात्री घेतो. आमचे उच्च उत्पादकता व आरामदायीपणासाठी अपवादात्मक वेईकल्स वितरित करण्याचे अविरत ध्येय आहे. व्यवहारांपलीकडे देखील संबंध निर्माण झाल्याने बहुमूल्य समुदायाला चालना मिळते, जेथे प्रत्येकाला प्रतिष्ठित असल्यासारखे वाटते. सतत ऐकणे, शिकत राहणे आणि नाविन्यता आणणे हे ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाचे असून आमच्या विकासाचे आधारस्तंभ आहे. आमचे यश विश्वासार्ह सहयोगी असण्याप्रती आमच्या कटिबद्धतेमध्ये सखोलपणे सामावलेले आहे.”