टीव्हीसीसाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=nEp9WFoUaig
राष्ट्रीय, मार्च: थम्स अप या कोका-कंपनीच्या भारतातील स्वदेशी बेव्हरेज ब्रँडला आयसीसी टी२० वर्ल्ड कप निमित्त नवीन मोहिम ‘वर्ल्ड कप का तूफानी टूर’चा भाग म्हणून ‘तूफान: थम्स अप ब्राण्डेड एक्सक्लुसिव्ह चार्टर्ड प्लेन’ लॉन्च करण्याचा आनंद होत आहे. आयसीसी टी२० वर्ल्ड कपसाठी ऑफिशियल बेव्हरेज पार्टनर म्हणून थम्स अप चाहत्यांच्या सहभागाला नव्या उंचीवर नेत आहे, तसेच क्रिकेटप्रेमींना खेळाचा अद्वितीय अनुभव देण्यासाठी नवीन बेंचमार्क्स स्थापित करत आहे.
यंदा, थम्स अप क्रिकेटप्रेमींना विशेष थम्स अप प्लेनमधून वेस्ट इंडिजमधील जीवनातील अमूल्य साहसी प्रवासावर घेऊन जात आहे, ज्यामधून अभूतपूर्व व उत्साहवर्धक अनुभवाची खात्री मिळते. या मोहिमेला भारतातील लोकप्रिय क्रिकेट-जोडी: युवराज सिंग व विरेंदर सेहवाग यांचे पाठबळ मिळाले आहे, जे ग्राहकांना थम्स अप पॅक स्कॅन करत तूफानमध्ये सीट जिंकण्याची संधी मिळवण्यास प्रेरित करत आहेत. १ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत ग्राहक https://tu-icc24.coke2home.com/ येथे नोंदणी करत वेस्ट इंडिजमधील आयसीसी टी२० वर्ल्ड कपसाठी ट्रिप जिंकण्याची संधी मिळवू शकतात. निवडक थम्स अप पॅक्समध्ये उपलब्ध असलेल्या या संधीसह ग्राहक २ महिने चालणाऱ्या डेअली लकी ड्रॉमध्ये प्रवेश मिळण्याची संधी जिंकू शकतात, जेथे दररोज एक सीट दिली जाईल.
ऑलिम्पिक्स, पॅरालिम्पिक्स, आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप अशा स्पोर्टिंग इव्हेण्ट्ससोबतच्या दीर्घकालीन सहयोगाला अधिक दृढ करत या टूरमधून क्रिकेटच्या उत्साहाला अधिक आनंदित करण्याप्रती ब्रँडची समर्पितता दिसून येते.
तूफानी टूरसोबत थम्स अप टीम इंडियाला उत्साहपूर्ण पाठिंबा देणाऱ्या क्रिकेटप्रेमींना दरतासाला भारतीय संघाची जर्सी, तसेच आकर्षक बक्षीसे देईल. ५०० मिली व त्यावरील आकाराच्या सर्व पॅक्सवर या मोहिमेचा प्रचार करण्यात येईल, ज्यामधून लाइव्ह क्रिकेट क्षणांच्या आनंदासह अद्वितीय अनुभव मिळेल.
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत विरेंदर सेहवाग म्हणाले, ”मला थम्स अपसोबतच्या सहयोगाचा आनंद होत आहे. प्रत्येक सरत्या वर्षासह थम्स अप चाहत्यांच्या सहभागामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करत आहे, ज्यामधून क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाची पूर्तता करण्याप्रती त्यांची अविरत कटिबद्धता दिसून येते. ‘वर्ल्ड कप का तूफानी टूर’ क्रिकेटप्रेमींना थम्स अप चार्टर्ड प्लेनमधून वेस्ट इंडिजमध्ये घेऊन जात अद्वितीय अनुभव देते, तसेच वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी२० वर्ल्ड कपचा थरार पाहण्याची संधी देते.”
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत युवराज सिंग म्हणाले, ”मला थम्स अपसोबतचा सहयोग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे. हा ब्रँड क्रीडाप्रती दीर्घकाळापासून कटिबद्ध आहे. यंदा ‘वर्ल्ड कप का तूफानी टूर’ क्रिकेटप्रेमींना उत्साहवर्धक अनुभव देतो, तसेच विशेष थम्स अप चार्टर्ड प्लेनमधून वेस्ट इंडिजला जाण्याची संधी देखील देतो. मी तेथील उत्साह व ऊर्जा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. हा प्रवास जगभरातील क्रिकेटप्रेमींना आयसीसी टी२० वर्ल्ड कपसाठी एकत्र आणेल.”
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया व साऊथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सचे सीनियर कॅटेगरी डायरेक्टर टिश कोन्डेनो म्हणाले, ”आम्हाला वेस्ट इंडिजमधील आगामी आयसीसी टी२० वर्ल्ड कप येथे क्रिकेटप्रेमींच्या अनुभवाला उत्साहित करण्यासाठी ‘वर्ल्ड कप का तूफानी टूर’ला लॉन्च करण्याचा आनंद होत आहे. विशेष थम्स अप ब्रॅण्डेड प्लेनच्या लॉन्चसह आम्ही क्रीडा उत्साह व सहभागाला नव्या उंचीवर नेण्याप्रती आमच्या प्रयत्नाला अधिक दृढ करत आहोत, ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना अद्वितीय आठवणींचा अनुभव मिळेल.”
ही मोहिम क्रिकेटप्रमी भारतीयांच्या पॅशनला साजरे करते, संपूर्ण स्पर्धेदरम्यान संबंध, सक्षमीकरण व सहयोगात्मक आनंदाला अधिक उत्साहित करते. थम्स अप पल्स व स्टम्प कॅम यांसारख्या संस्मरणीय, नाविन्यपूर्ण मोहिमांच्या वारसासह थम्स अप आयसीसी अनुभवाला नव्या उंचीवर नेत उत्साहित करण्यास सज्ज आहे, ज्यामधून जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्साहपूर्ण अनुभवाची खात्री मिळते.