maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsLaunchNew bikePublic Interestठळक बातम्यामहाराष्ट्र

PURE EV ने 201 KM रेंजसह ePluto 7G MAX लाँन्च

Pure EV ने ePluto 7G Max नावाची इलेक्ट्रिक स्कूटर लाँन्च केली आहे, ज्याची रेंज 201 KM आहे. रिव्हर्स मोड असलेली स्कूटर म्हणून यात अनेक फीचर्स असल्याचा कंपनी दावा आहे.

इलेक्ट्रिक मोटर कनेक्शनसह Pure EV – ePluto 7G Max, इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय खास राइडिंग अनुभव देते. रेट्रो-थीम असलेली इलेक्ट्रिक स्कूटर, व्यतिरिक्त कंपनीने इतर अनेक विशेष वैशिष्ट्ये देखील सादर केली आहेत.

Pure EV कंपनी ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सोडत आहे. यात काळा, लाल, राखाडी, पांढरा या चारही रंगांमध्ये उपलब्ध असेल. त्याची एक्स-शोरूम किंमत फक्त रु. 1,14,999 /- असणार आहे. या स्कूटरचे बुकिंग देशभरात सुरू झाले आहे. ज्यांनी ePluto 7G max स्कूटरचे बुकिंग केले आहे, त्यांना येणाऱ्या सणापासून डिलिव्हरी दिली जाईल.

रेट्रो-थीम असलेली इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून डिझाइन केलेली, ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जवर 201 किलोमीटर नॉन-स्टॉप चालू शकते. इतकेच नाही तर या ईव्हीमध्ये इतरही अनेक मनोरंजक वैशिष्ट्ये आहेत.

यात हिल-स्टार्ट असिस्ट, डाउनहिल असिस्ट, कोस्टिंग रीजन आणि रिव्हर्स मोड देखील आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ बॅटरी आयुष्यासाठी स्मार्ट AI सारखी वैशिष्ट्ये आहेत.

या स्कूटरला जोडलेल्या इलेक्ट्रिक मोटरसाठी 3.5 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक स्थापित करून, ते 3.21 bhp ची कमाल उर्जा निर्माण करते. या AIS-156-प्रमाणित बॅटरी पॅकमध्ये, कृत्रिम बुद्धिमत्तेसह स्मार्ट बॅटरीची क्षमता सर्वात महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. यासोबत कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही स्कूटर भारतीय रस्त्यावर चांगली कामगिरी करेल.

रायडिंगचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी, यात तीन रायडिंग मोड्स असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय ही EV स्कूटर ला 60 हजार किलोमीटरची बॅटरी वॉरंटी उपलब्ध आहे. कंपनीच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की 70 हजार किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देखील उपलब्ध आहे.

तर, “बाईक प्रेमीनों .. राइड घ्या .. गर्वाने मिरवा .. ePluto 7G Max च्या मालक होऊन .. जास्तीत जास्त अनुभव घ्या..” ही त्यांची घोषणा आहे.

Related posts

भजी खाताना क्षुल्लक कारणावरुन वाद, मग त्याने ऑम्लेटच्या दुकानातून चाकू उचलला अन् मित्राचा अंत

cradmin

नीरज पांडे आणि मनोज वाजपेयी वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीसह परत एकदा चाहत्यांची आवडती फ्रँचायजी ‘सीक्रेटस’ सोबत एकत्र येणार: ‘सीक्रेटस ऑफ द बुद्धा रेलिक्स’

Shivani Shetty

पेटीएम ७६ टक्‍के वापरासह मर्चंट पेमेंट्समध्‍ये अग्रस्‍थानी’; मर्चंट पेमेंट्ससाठी पेमेंटला सर्वाधिक पसंती

Shivani Shetty

Leave a Comment