दिल्ली, मार्च २०२४: कोका-कोला इंडियाला त्यांच्या ‘ए रेसिपी फॉर मॅजिक’ या जागतिक मोहिमेअंतर्गत भारतात कोका-कोला फूडमार्क्सच्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. संस्कृतीमधून प्रेरित आणि रिअल मॅजिक ऑफ कोका-कोलासह निर्माण करण्यात आलेले ‘कोका-कोला फूडमार्क्स’ जागतिक ‘फूड लँडमार्क्स’ना साजरे करते. हे परफेक्ट मोमेण्ट, परफेक्ट मील आणि आइस-कोल्ड कोका-कोला या तीन प्रमुख घटकांच्या रेसिपीचा समावेश असलेले गंतव्य व अनुभव आहेत. कोका-कोला परफेक्ट मोमेण्ट्स, मील्स आणि कोका-कोलाच्या रिफ्रेशिंग टेस्टचा आनंद देण्याचा प्रवास सुरू करत आहे, ज्याचा लवकरच भारतातील अधिकाधिक शहरांमध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये आनंद घेतला जाईल.
जागतिक सादरीकरणाचा भाग म्हणून भारतातील लाँच इव्हेण्ट दिल्लीमधील कॅनॉट प्लेस येथील प्रतिष्ठित गंतव्य एम्बेसी रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आला, जेथे उपस्थितांनी एकत्र येत हिंदी सिनेमाच्या सदाबहार काळाचा आनंद घेतला. प्रतिष्ठित बॉलिवुड व्यक्तिमत्त्व जान्हवी कपूर, करिष्मा कपूर यांनी उपस्थिती दर्शवत या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसेच त्यांनी दिग्गज राज कपूर यांना मानवंदना दिली. या इव्हेण्टची खासियत म्हणजे दोन आयकॉन्स राज कपूर आणि बॉटल ऑफ कोक यांना एकाच फ्रेममध्ये कॅप्चर करण्यात आले.
राज कपूर यांच्या सेटवरील मील मोमेण्ट्सना उजाळा देण्यात आला, जेथे ए.आय.चा वापर करत टेक फॉरवर्ड परस्परसंवादी क्षणांसह सर्वोत्तम फिल्म सेटच्या माध्यमातून उपस्थितांना १९५० च्या दशकातील बॉलिवुडच्या सुवर्ण युगाचा आनंद देण्यात आला. फिल्मी सजावटीपासून खास फोटो पार्श्वभूमीपर्यंत, सिताऱ्यांच्या पोस्टर्सपासून संगीतमय स्टेअरवेपर्यंत अतिथींना इंटरअॅक्टिव्ह कोका-कोला अनुभव देण्यात आला. विंटेज कारमध्ये कपूर खानदानातील सिताऱ्यांच्या शाही प्रवेशाने या इव्हेण्टमध्ये अधिक मोहकतेची भर घातली. कोका-कोला फूडमार्क्सच्या मॅजिकचा अनुभव घेण्यासाठी स्थानिक प्रभावक आणि मान्यवर देखील उपस्थित होते.
या इव्हेण्टमध्ये राज कपूर यांना आवडणा-या दाल मखनीसह आइस-कोल्ड कोका-कोलाला दाखवण्यात आले, ज्यामधून त्यांचा कालातीत स्वाद आणि परंपरांना मानवंदना देण्यात आली. ही जोडी नवी दिल्लीमधील एम्बेसीमध्ये मेन्यूचा भाग असेल आणि रेस्टॉरंटमध्ये येणारे अतिथी ऑफरिंग म्हणून या जोडीचा आस्वाद घेऊ शकतात.
”आम्हाला संपन्न पाककला वारसा आणि वैविध्यपूर्ण फूड संस्कृतीसाठी ओळखला जाणारा देश भारतात कोका-कोला फूडमार्क्स लाँच करण्याचा आनंद होत आहे,” असे कोका-कोला आयएनएसडब्ल्यूएच्या मार्केटिंगचे वरिष्ठ संचालक कौशिक प्रसाद म्हणाले. ”कोका-कोला फूडमार्क्समध्ये कोकचे तत्त्व समाविष्ट आहे, जे एकत्रित व्यतित केलेले क्षण, सांस्कृतिक बारकावे आणि पाककला सर्वोत्तमतेच्या रिअल मॅजिकला प्रसारित करते. आम्हाला ग्राहकांसाठी ही ऑफरिंग सादर करण्यासोबत त्यांना संस्मरणीय आठवणी निर्माण करत फ्लेवर्सचा आस्वाद घेण्याची संधी देण्याचा आनंद होत आहे.”