maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

गुवाहाटीने १०० टाटा मोटर्स इलेक्ट्रिक बसेससह स्‍वीकारला हरित मार्ग

गुवाहाटी, जानेवारी 2024: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज आसाम स्‍टेट ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशनला (एएसटीसी) १०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केल्‍याची घोषणा केली. गुवाहाटीच्या रस्त्यावर धावणाऱ्या या ९मीटर, वातानुकूलित टाटा अल्ट्रा इलेक्ट्रिक बसेस सुरक्षित,आरामदायी आणि सोईस्कर आंतरशहरीय प्रवासाचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. या शून्‍य-उत्‍सर्जन बसेस नेक्‍स्‍ट-जनरेशन आर्किटेक्‍चर स्‍वदेशी निर्माण करण्‍यात आल्‍या आहेत, तसेच या बसेसमध्‍ये आधुनिक वैशिष्‍ट्ये आहेत आणि प्रगत बॅटरी सिस्‍टम्‍सची शक्‍ती आहे. १ जानेवारी २०२४ रोजी आसामचे माननीय मुख्‍यमंत्री डॉ. हिमंत बिस्‍वा सरमा यांच्‍या हस्‍ते या बसेस लाँच करण्‍यात आल्‍या. 

 

या घोषणेबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सच्‍या सीव्‍ही पॅसेंजर्सचे उपाध्‍यक्ष व व्‍यवसाय प्रमुख श्री. रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ”सार्वजनिक परिवहन अधिक प्रभावी व कार्यक्षम बनवणे हे आमचे मिशन आहे आणि आम्‍ही इलेक्ट्रिक बसेसच्‍या आधुनिक ताफ्याचा पुरवठा करण्‍याची संधी दिल्‍याबद्दल आसाम राज्‍य सरकार व एएसटीसीचे आभार मानतो. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह निर्माण करण्‍यात आलेल्‍या आणि विविध स्थितींमध्‍ये प्रखरपणे चाचणी करण्‍यात आलेल्‍या या बसेस पर्यावरणास अनुकूल आहेत, तसेच सार्वजनिक परिवहन सुरक्षित, आरामदायी, तंत्रज्ञान संचालित व अधिक कार्यक्षम करतील. आम्‍हाला आमच्‍या टाटा अल्‍ट्रा इलेक्ट्रिक बसेस गुवाहाटीच्‍या रहिवाशांना सेवा देण्‍यासाठी कार्यरत असल्‍याचा आनंद होत आहे.”   

आजपर्यंत, टाटा मोटर्सने भारतातील विविध शहरांमध्‍ये १,५०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे, ज्‍यांनी ९५ टक्‍क्‍यांहून अधिक अपटाइमसह एकूण १० कोटी किलोमीटरहून अधिक अंतर पार केले आहे. टाटा अल्‍ट्रा ईव्‍ही अत्‍याधुनिक ई-बस आहे, जी शहरी प्रवासासाठी नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करते. फुल-इलेक्ट्रिक ड्राइव्‍हट्रेनसह ही अत्‍याधुनिक वेईकल ऊर्जेचा वापर सानुकूल करते, ज्‍यामुळे ऊर्जेचा वापर व कार्यसंचालन खर्च कमी होतो. या वेईकलमध्‍ये सुलभ बोर्डिंग, आरामदायी आसनव्‍यवस्‍था व ड्रायव्‍हर-अनुकूल कार्यसंचालन अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत,ज्‍यामधून शून्‍य उत्‍सर्जनाची खात्री मिळते. इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्‍युशन, एअर सस्‍पेंशन, इंटेलिजण्‍ट ट्रान्‍सपोर्ट सिस्‍टम (आयटीएस) आणि पॅनिक बटनसह इतर प्रगत वैशिष्‍टे असलेली ही वेईकल प्रवाशांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाची खात्री देते. या इलेक्ट्रिक बसमधून शुद्ध सार्वजनिक परिवहनाप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, तसेच ही इलेक्ट्रिक बस शहरातील प्रवाशांच्‍या परिवहन गरजांसाठी योग्‍य निवड आहे.

Related posts

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

श्रेयस शिपिंग डीलिस्टिंग की 400 रुपये प्रति शेयर की काउंटर ऑफर बोली विंडो 17 अक्टूबर 2023 को होगी बंद

Shivani Shetty

डिजिकोअरची अँकर गुंतवणूकदारांकडून निधी उभारणी

Shivani Shetty

Leave a Comment