टीव्हीसीसाठी लिंक:
https://youtu.be/-F9Wc7iHSUs?si=PJ0APF1awAcBGS_X
राष्ट्रीय, ७ मार्च: चार्ज्ड बाय थम्स अप या कोका-कोला कंपनीच्या नवीन बेव्हरेज ब्रॅण्डने नवीन मोहिम ‘माइण्ड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’ लाँच केली आहे, ज्यामध्ये आमिर खान आणि दर्शील सफारी आहेत.
नवीन पॅकेजिंग व फ्लेवरसह नवीन चार्ज्ड अद्वितीय पेय अनुभवाची खात्री देते, जो ग्राहकांचे तन-मन उत्साहित करतो.
ओगील्व्हीची संकल्पना असलेल्या नवीन चार्ज्ड जाहिरातीमधील व्हिज्युअली लक्षवेधक कथानकामध्ये आमिर खान व दर्शील सफारी आहेत, जेथे संपूर्ण जाहिरातीमध्ये आमिर जीवनातील विविध स्थितींशी संबंधित विविध अवतारांना सादर करतात. या सर्जनशीलतेमधून शारीरिक चपळता व मानसिक अवधानाची आवश्यकता असलेले अशक्य व मोठे यश संपादित करण्यासाठी चार्ज्ड कशाप्रकारे मदत करते हे दाखवण्यात आले आहे. ही मोहिम उत्पादनाच्या उत्साहवर्धक परिणामांना दाखवते, ज्यामुळे जनरेशन झेड जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासह त्यावर मात करण्यास सक्षम होतात.
या मोहिमेबाबत मत व्यक्त करत कोका-कोला इंडिया आणि साऊथ-वेस्ट एशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्सचे सीनियर कॅटेगरी डायरेक्टर टिश कोन्डेनो म्हणाले, ”चार्ज्ड बाय थम्स अपच्या नवीन स्ट्रॉबेरी व्हेरिएण्टच्या सादरीकरणासह आमचा सातत्याने नाविन्यता आणण्याचा, ग्राहकांना उत्साहवर्धक अनुभव देण्याचा मनसुबा आहे. या मोहिमेसह आम्हाला १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा कोका-कोला कुटुंबामध्ये चार्ज्डच्या साराचे प्रतीक दिग्गज आमिर खान आणि जुन्या आठवणी व उत्साहपूर्ण भावनेला सादर करणारे दर्शील सफारी यांचे स्वागत करताना आनंद होत आहे.”
आमिर खान या मोहिमेसोबतच्या सहयोगाबाबत मत व्यक्त करत म्हणाले, ”ही निश्चितच धमाल स्क्रिप्ट आहे आणि मी संकल्पना पाहून ‘चार्ज्ड’ झालो. मी ही जाहिरात करताना खूप धमाल केली. मला थम्स अप/कोक कुटुंबाचा भाग असण्याचा आनंद होत आहे. मी ही मोहिम जनतेपर्यंत पोहोचताना आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यास खूप उत्सुक आहे.”
दर्शील सफारी या सहयोगाबाबत म्हणाले, ”दिग्गज आमिर खान यांच्यासोबत चित्रपट ‘तारे जमीन पर’मध्ये काम केल्याच्या १७ वर्षांनंतर पुन्हा एकदा काम करताना सन्माननीय वाटत आहे. तरूण व्यक्ती म्हणून मला चार्ज्डच्या उत्साहाला सादर करण्याचा, तसेच इतरांना या पेयाप्रमाणे साहस व पॅशनसह जीवन जगण्यास प्रेरित करण्याचा आनंद होत आहे.”
ओगील्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, ”माइण्ड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड ही संभाव्यतांची अँथेम आहे. आमिर खान आणि दर्शील यांनी १७ वर्षांनंतर एकत्र येत सर्वकाही व काहीही करण्याच्या क्षमतेला जागृत केले आहे. आमिर यांच्यासोबत सहयोग करण्याचा आनंद झाला आणि त्यांनी टीमला अशक्य गोष्टीच्या पलीकडे जाण्यास प्रेरित केले. ते स्वत: टीममधील प्रत्येक सदस्यासोबत चर्चेला बसले आणि प्रत्येक भूमिकेला परिपूर्णपणे रचले. दिग्दर्शक अद्वैत चंदन यांना सलाम, ज्यांनी असा दर्जा व पॅशनसह त्यांच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणले. ‘माइण्ड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’ प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या संपूर्ण टीमचे देखील मनापासून आभार.”
चार्ज्ड अप थम्स अप सतत मर्यादांना दूर करत आहे, तसेच त्यांच्या ऑफरिंग्ज ग्राहकांच्या बदलत्या पसंतींनुसार असण्याची खात्री घेत आहे. ही मोहिम टीव्ही, डिजिटल आणि सोशलवर सादर करण्यात येईल.