maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

‘लव्ह कनेक्शन’ मोहिमेच्या परतीचा महासोहळा: व्हिएतजेटकडून व्हिएतनाममध्ये ५० भारती जोडप्यांसाठी मोफत फ्लाइट्सची ऑफर

(मुंबई, 11 जानेवारी 2024)भारतातील प्रतिष्ठित गुजरात व्हायब्रंट ग्लोबल समिट २०२४ मधील सहभागाचा आनंद साजरा करताना व्हिएतजेटला आपल्या मौल्यवान ग्राहकांना खास प्रमोशनल ऑफर्स देताना खूप आनंद होत आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील वाढता व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देण्यासाठी ही विमानसेवा फक्त ५,५५५ (*) रूपयांपासून तिकिटे देत आहे. 

आपल्या नातेसंबंध दृढ करून अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही विमानसेवा आपली दुसरी मोहीमलव्ह कनेक्शन २०२४अत्यंत अभिमानाने आणते आहे. या कार्यक्रमातून अविस्मरणीय प्रेमकथा असलेल्या भारतीय जोडप्यांना ५० मोफत फ्लाइट्स दिल्या जाणार आहेत. ही प्रमोशनल तिकिटे vietjetair.comच्या अधिकृत वेबसाइटवर आणि व्हिएतजेट एअर मोबाइल अॅपवर दर बुधवार, गुरूवार आणि शुक्रवारी (जीएमटी+७) खरेदीसाठी उपलब्ध असतील. संपूर्ण २०२४ मध्ये फ्लाइटच्या वेळा लवचिक ठेवून ही विमानसेवा दोन्ही देशामधील सांस्कृतिक आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना सुविधा देईल. 

लव्ह कनेक्शन- फॉल इन लव्ह ऑल ओव्हर अगेन २०२३उपक्रमाच्या पुढे जाऊनलव्ह कनेक्शन २०२४कॅम्पेन भारतीय जोडप्यांच्या प्रेमकथा साजऱ्या करून त्यांच्या गौरवासाठी सज्ज आहे. व्हिएतजेटच्या loveconnection.vietjetair.com या वेबसाइटवर आपल्या गोष्टी आणि प्रवासाच्या महत्त्वाकांक्षा सांगून भारतीय जोडप्यांना २०२४ मध्ये व्हिएतनाममधील सुंदर ठिकाणे पाहण्यासाठी मोफत व्हिएतजेट फ्लाइट मिळणाऱ्या ५० विजेत्यांपैकी एक होण्याची संधी मिळेल. 

त्याचबरोबर आजपासून १६ जानेवारी २०२४ पर्यंत व्हिएतजेटच्या विक्री माध्यमातून ऑनलाइन खरेदी करत असताना “SBBUIN” हा कोड वापरून बिझनेस क्लास आणि स्कायबॉस तिकिटांच्या किमतीत जवळपास २० टक्के सवलत मिळवू शकतात. या प्रमोशनसाठीच्या फ्लाइटचे लवचिक कालावधी १० जानेवारी २०२४ ते ३१ जून २०२४ (जीएमटी+७) (**) हे आहेत.

ही विमानसेवा सध्या दर आठवड्याला ३५ राऊंड ट्रिप्स भारतातील ५ मोठ्या शहरांमध्ये देते- मुंबई, नवी दिल्ली, अहमदाबाद, कोची आणि तिरूचिरापल्ली. ही विमानसेवा तिकिटांचे चार वर्ग देते. त्यात बिझनेस, स्कायबॉस, डिलक्स आणि इकॉनॉमी आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या विविध गरजांसाठी वैविध्यपूर्ण सेवा दिल्या जातात. बिझनेस क्लास तिकिटांमुळे व्हिएतजेटच्या आधुनिक मोठ्या एअरक्राफ्ट ए३३० मध्ये प्रवास करता येतो. त्यात प्रायव्हेट चेक इन काऊंटर्स, बिझनेस लाऊंजेस, प्रायव्हेट केबिन्स, कॉकटेल सेवा आणि फो थिन, बान मी अशा व्हिएतनामी खास डिशेस आणि अनेक शाकाहारी खाद्यपदार्थ व हलाल पर्याय अशा विविध प्रकारच्या खास सुविधा मिळू शकतात.  

(*) सर्व समाविष्ट, वन वे किमती

(**) अटी आणि शर्ती लागू. 

 

Related posts

टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीकडून पहिले प्‍युअर ईव्‍ही आर्किटेक्‍चर – ‘acti.ev’ लाँच

Shivani Shetty

रेव्हफिनची बजाज ऑटोसह धोरणात्मक भागीदारी

Shivani Shetty

इन्शुरन्सदेखोला ग्रेट प्लेस टू वर्कचे प्रमाणपत्र

Shivani Shetty

Leave a Comment