मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉमचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी यांनी जिओसिनेमावर प्रसारित होणारा शो इंडियन एंजल्सच्या तिसऱ्या व चौथ्या एपिसोडमध्ये रिग्रिप, शक्ती वीअरेबल्स व वास्तू घी या तीन उल्लेखनीय स्टार्टअप्समध्ये लक्षणीय गुंतवणूका केल्या आहेत. १३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसारित करण्यात आलेल्या तिसऱ्या व चौथ्या एपिसोड्समध्ये त्यांच्या धोरणात्मक गुंतवणूका दाखवण्यात आल्या. तिसऱ्या एपिसोडमध्ये श्री. रिकांत पिट्टी यांनी रिग्रिपमध्ये २५ लाख रूपयांची गुंतवणूक केली आणि शक्ती वीअरेबल्समध्ये आणखी २५ लाख रूपयांची गुंतवणूक केली. चौथ्या एपिसोडमध्ये वास्तू घी या स्टार्टअपने श्री. रिकांत पिट्टी आणि इतर चार एंजल गुंतवणूकदारांकडून आर्थिक साह्य सुनिश्चित केले.
या हेतुपूर्वक केलेल्या गुंतवणूकांमधून श्री. रिकांत पिट्टी यांची नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांना व उत्कट व्यक्तींना यशाकडे घेऊन जाण्यास प्रेरित करण्यासाठी अविरत पाठिंबा व मार्गदर्शन प्रदान करण्याप्रती समर्पितता दिसून येते. यापूर्वीच्या एपिसोड्समध्ये रिकांत यांनी अटपटा बाय टेस्टमध्ये १० लाख रूपयांची आणि हॅप्पी कर्व्ह्जमध्ये १० लाख रूपयांची गुंतवणूक केली होती, ज्यामुळे चौथ्या एपिसोडमधील सर्वोच्च गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून त्यांचे स्थान अधिक दृढ झाले आहे.
इझमायट्रिपचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, “मी व्यवसाय मॉडेल्सना, तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या व मोठे यश संपादित करण्याचे धैर्य व दृढनिश्चय असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. तीन उद्यम – रिग्रिप, शक्ती वीअरेबल्स व वास्तू घी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडले आणि समकालीन मार्गांपेक्षा वेगळा असलेला मार्ग निवडला. ते त्यांची अपवादात्मक उत्पादन श्रेणी, थोर कार्याला पाठिंबा देण्यासह ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच त्यांचा विकासाचा प्रबळ दृष्टिकोन आहे. मला त्यांच्यासोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. मी त्यांना त्यांच्या व्यवसायाची ध्येये संपादित करण्यामध्ये मदत करण्यासाठी त्सुक आहे.”
या आर्थिक योगदानांव्यतिरिक्त रिकांत शोमधील महिला-केंद्रित व्यवसायांना किंवा महिलांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उद्योगांना सक्रियपणे पाठिंबा देत आहेत, ज्यामधून त्यांच्या प्रभावांतर्गत महिलांचे सक्षमीकरण करण्याप्रती आणि हा विश्वास सतत दृढ करण्याप्रती स्थिर कटिबद्धता दिसून येते.