maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड

राष्‍ट्रीय, मार्च, २०२४, मुंबई – एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड (बीएसई: ५४३४५१ व एनएसई: AGSTRA), डिजिटल पेमेंट्स ब्रॅण्‍ड Ongo यांनी ओपन-लूप कोब्रॅण्‍डेड प्रीपेड कार्ड्स लॉंच करण्‍यासाठी भारतातील आघाडीचे समूह पतंजली आयुर्वेद लिमिटेडसोबत सहयोग केला आहे. भारतातील Rupay नेटवर्कवरील कोणत्‍याही डिवाईसवर या प्रीपेड कार्डचा स्‍वीकार करता येऊ शकतो.

पतंजली आयुर्वेद लि.चे सह-संस्‍थापक व व्‍यवस्‍थापकीय संचालक आचार्य बाळकृष्‍ण म्‍हणाले, ”आम्‍हाला Ongo सोबत सहयोगाने ओपन-लूप कोब्रॅण्‍डेड कार्डस् लाँच करत आमच्‍या निष्‍ठावान ग्राहकांना उत्‍साहपूर्ण शॉपिंग अनुभव देण्‍याचा आनंद होत आहे. पतंजली-Ongo कार्डससह आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांना पतंजली स्‍टोअर्समधील पतंजलीची उत्‍पादने व सेवांच्‍या विविध श्रेणीमध्‍ये विशेष फायदे मिळतील. तसेच, या कार्डससह ते आता देशभरातील सर्व Rupay अक्‍सेप्‍टन्‍स पॉइण्‍ट्सवर अद्वितीय सोयीसुविधेचा अनुभव घेऊ शकतात.”
एजीएस ट्रान्‍सॅक्‍ट टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. रवी बी गोयल म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या Ongo प्‍लॅटफॉर्मवर ओपन-लूप कोब्रॅण्‍डेड प्रीपेड कार्डस् लाँच करण्‍यासाठी देशातील आघाडीचा समूह पतंजली आयुर्वेदसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमचा पतंजलीच्‍या व्‍यापक ग्राहकवर्गाला अद्वितीय सोयीसुविधा प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक व्‍यवहार कार्यक्षमपणे व सुलभपणे होण्‍याची खात्री मिळेल. तसेच, या सहयोगामधून ग्राहकांना त्‍यांच्‍या डायनॅमिक जीवनशैलींची पूर्तता करणाऱ्या सोईस्‍कर सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करत त्‍यांच्‍या पेमेंट अनुभवामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेची पुष्‍टी मिळते.”
पतंजली-Ongo कोब्रॅण्‍डेड कार्ड वापरकर्ते या कार्डसच्‍या माध्‍यमातून पतंजली उत्‍पादनांच्‍या खरेदीवर रिवॉर्डस् मिळवू शकतात. तसेच, ते शॉपिंग, डायनिंग, फ्यूएलिंग आणि ईकॉमर्स अशा इतर विविध पेमेंट्ससाठी या कार्डसचा वापर करू शकतात. याव्‍यतिरिक्‍त, या कार्डमध्‍ये एनसीएमसी वैशिष्‍ट्य आहे, जे ग्राहकांना देशभरातील एनसीएमसी सक्षम मेट्रो, बसेस, टोल आणि पार्किंग अशा परिवहन सेवा वापरण्‍याची सुविधा देईल. यासंदर्भात ग्राहक प्‍लेस्‍टोअर व अॅप स्‍टोअरवर उपलब्‍ध असलेल्‍या Ongo अॅपवर किंवा जवळच्‍या पतंजली स्‍टोअर्सना भेट देत नोंदणी करू शकतात.
Ongo कडे आरबीआयकडून प्राप्‍त पीपीआय परवाना आहे, ज्‍यामुळे ते प्रीपेड कार्डस् व वॉलेट्स यांसारखे ओपन-लूप प्रीपेड इन्‍स्‍ट्रूमेंट्स जारी करू शकतात.

Related posts

ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या महसूलात वाढ

Shivani Shetty

IMDb द्वारे आजवरच्या सर्वोत्तम 250 भारतीय चित्रपटांची नावे जाहीर

Shivani Shetty

व्हिएतजेटकडून भारतातील नेटवर्कमध्‍ये वाढ; अहमदाबाद ते दा नांगपर्यंत नवीन विमानमार्ग लाँच

Shivani Shetty

Leave a Comment