मुंबई, २३ नोव्हेंबर २०२२: आशियातील अग्रगण्य हायर एडटेक कंपनी अपग्रॅडने ऑनलाइन हायर एड प्रोग्रामच्या अध्यक्षपदी श्री.अनुज विश्वकर्मा यांची नियुक्ती केली. त्यांच्या या नवीन भूमिकेत श्री.अनुज विश्वकर्मा यांच्यावर दीर्घकालीन धोरण ठरवून व्यवसाय वाढविण्यासाठी सर्वोत्तम पद्धती लागू करून ऑनलाइन हायर-एड वर्टीकलला उभारण्याची जबाबदारी असेल. फीनटेक, ऑनलाइन रिटेल आणि ऑफलाइन रिटेल क्षेत्रात खूप वाढ करणारा ग्राहक व्यवसाय तयार करण्याचा दहा हून अधिक वर्षांचा अनुभव असलेले अनुज विश्वकर्मा हे अत्यंत अनुभवी व सक्षम नेतृत्व आहे. अपग्रॅड मध्ये येण्यापूर्वी मिन्त्रा, पेटीएम आणि ओला सारख्या आघाडीच्या ग्राहक इंटरनेट कंपन्यांसाठी (कनस्यूमर इंटरनेट प्लेयर्स) त्यांनी काम केले आहे. ओला मध्ये महसूल वाढ प्रमुख आणि पेटीएम मध्ये ट्रॅव्हल व्यवसायासाठी वाढ प्रमुख अशा उच्च पदाच्या कामगिरी त्यांनी भूषविल्या आहेत.
नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ चे माजी विद्यार्थी आणि आयआयएम बंगळूर मधून एमबीए ची पदवी मिळविणारे अनुज हे निरंतर वाढीसाठी प्रयत्न करीत असतात आणि शाश्वत वाढीच्या धोरणांमधून मोठे व्यवसाय उभे करणे असा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते अपग्रॅडच्या बंगळूर कार्यालयातून काम करतील आणि त्यांच्या वर्टीकल प्रोग्रामच्या वाढीसाठी संपूर्ण अपग्रॅडच्या वेगवेगळ्या विभागांच्या अनेक टीमस् सोबत सहभागी होतील.
श्री.मयंक कुमार, सह-संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, अपग्रॅड यांनी म्हटले की,“आम्ही आता एका अशा सुवर्ण युगात काम करतो जेथे ऑनलाइन उच्च शिक्षणाची मागणी पुढे वाढत राहील आणि म्हणूनच आम्हाला मजबूत कौशल्यांसह उपायांवर लक्ष्य केंद्रित करणारे नेतृत्व हवे आहे. अनुज विश्वकर्मा हे त्यांच्या क्षेत्रामध्ये सखोल बाजार संशोधन, ग्राहकांशी ओळख आणि वर्टीकलच्या वाढीसाठी सर्वात योग्य आहेत. त्यांचे प्रयत्न आमचा मुख्य व्यवसाय आणखी मजबूत करेल आणि आमच्या देशांतर्गत ‘लाइफ लॉन्ग लर्निंग सूट’ ला देखील वाढवेल.”
श्री अनुज विश्वकर्मा म्हणाले,“प्रगतीसाठी अष्टपैलू नेतृत्व टीमचा एक भाग होताना मला आनंद होत आहे. अपग्रॅडची दृष्टी समन्वयात्मक आहे आणि मी आमच्या भविष्यातील संभाव्य विद्यार्थ्यांच्या करियरला आकार देण्यासाठी एक मजबूत व्यावसायिक पाया बनवायला माझ्या कौशल्यांचा वापर करण्यास उत्सुक आहे. ते मला व्यापक ग्राहकांमध्ये ब्रॅंडच्या प्रतिष्ठेला मजबूत करण्याचे योगदान देण्यात मदत करतील.”