मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३: भारतामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्राला नवा आकार प्रदान करेल असे लक्षणीय पाऊल उचलत लेक्ट्रिक्स ईव्ही या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील एका दिग्गज कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटी, अँप, डिलिव्हरी सोल्युशन्स पुरवणाऱ्या आघाडीच्या झिप इलेक्ट्रिकसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. झिपच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेत ही भागीदारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात १ लाखांहून जास्त वाहनांची वाढ करण्याची कंपनीची योजना आहे.
एसएआर ग्रुपमधील इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी लेक्ट्रिक्स ईव्ही आपल्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक दुचाकींसाठी नावाजली जाते. या धोरणात्मक भागीदारीमध्ये लेक्ट्रिक्स ईव्ही आपली नैपुण्ये व संसाधनांचा वापर झिपच्या विस्तारत असलेल्या लास्ट-माईल डिलिव्हरी बिझनेसच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेली कस्टमाइज्ड इलेक्ट्रिक वाहने पुरवण्यासाठी करेल. ही वाहने पर्यावरणस्नेही आहेत, तसेच त्यामध्ये फेम II योजनेचेही पालन करण्यात आले आहे, अधिक शुद्ध व पर्यावरणस्नेही वाहतूक पर्यायांचा वापर करण्याच्या भारत सरकारच्या उद्धिष्टाचे यामध्ये पुरेपूर पालन होत आहे.
लेक्ट्रिक्स ईव्हीचे एमडी आणि सीईओ श्री. के विजय कुमार यांनी सांगितले, “झिपच्या गरजांनुसार तयार करण्यात आलेल्या कस्टमाइज्ड इलेक्ट्रिक दुचाकी पुरवण्याची लेक्ट्रिक्स ईव्हीची सुसज्जता इलेक्ट्रिक मोबिलिटी उद्योगातील बी२बी (बिझनेस टू बिझनेस) यूज केसबद्दलची त्यांची सखोल समज दर्शवते. बाउन्स आणि मूविंग यासारख्या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसोबत करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या भागीदारींमधून ही समज अधिकाधिक प्रगल्भ केली जात आहे. या भागीदारींमधून मिळालेल्या मौल्यवान इन्साईट्समुळे लेक्ट्रिक्स ईव्ही ही कंपनी सक्षम व पर्यावरणानुकूल लास्ट-माईल डिलिव्हरी सोल्युशन्स ज्यांना हवे आहेत अशा उद्योगांसाठी सुयोग्य भागीदार बनली आहे. लेक्ट्रिक्स ईव्ही आणि झिप यांच्या दरम्यानची भागीदारी आकारास येत असताना व्यापारी उद्देशांसाठी इलेक्ट्रिक दुचाकींचा स्वीकार केला जाण्याचा वेग वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे भारतात पर्यावरणानुकल व सक्षम लास्ट-माईल डिलिव्हरी सोल्युशन्ससाठी एक नवा मापदंड तयार केला जाईल.”
लेक्ट्रिक्स ईव्हीकडून झिपला पुरवली जाणार असलेली सर्व वाहने १००% भारतात बनवली जाणार असून, फेम II मंजुरी दिली गेलेली असणार आहेत, हे या भागीदारीचे एक खास वैशिष्ट्य आहे. देशांतर्गत उत्पादन करण्याप्रती ही बांधिलकी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्याचे आणि ईव्ही उद्योगक्षेत्रात आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्याचे या दोन्ही कंपन्यांचे व्हिजन दर्शवते. ही भागीदारी संपूर्ण भारतीय ईव्ही इकोसिस्टिममध्ये सकारात्मक प्रभाव घडवून आणेल, त्यामुळे रोजगार संधींमध्ये वाढ होईल तसेच तंत्रज्ञान प्रगतीला चालना मिळेल.